"बाबूराव गोविंदराव शिर्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''कोणतीही पार्श्र्वभूमी नसताना, स्वत:च्या जिद्दीच्या साहाय्याने ...
 
No edit summary
ओळ १:
'''बाबूराव गोविंदराव शिर्के''' ([[१ ऑगस्ट]], [[इ.स. १९१८]] - [[१४ ऑगस्ट]], [[इ.स. २०१०]]) हे [[मराठी]] बांधकाम व्यावसायिक होते.
'''कोणतीही पार्श्र्वभूमी नसताना, स्वत:च्या जिद्दीच्या साहाय्याने उद्योग क्षेत्रावर मराठी ठसा ठळकपणे उमटवणारे एक यशस्वी उद्योजक!'''
 
== जीवन ==
अपार जिद्द, प्रामाणिक कष्टाची तयारी, सहनशक्ती, चिकाटी, प्रचंड आत्मविश्र्वास, आशावाद, उत्साह, समाजाविषयी आच व भ्रष्टाचाराची चीड या सर्व गुणांनी संपन्न असे व्यक्तिमत्त्व म्हणजे जागतिक दर्जाचे बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के. या गुणांसह मिळालेल्या वेळेचे काटेकोर नियोजन, हिशेबी-व्यावसायिक वृत्ती आणि कल्पकता यांमुळे ते यशस्वी उद्योजक झाले. महाराष्ट्रातील [[सातारा]] जिल्ह्यातील [[पसरणी]] या छोट्याश्या गावात जन्मलेल्या या मोठ्या उद्योजकाचे पूर्ण नाव [[बाबुराव गोविंदराव शिर्के]].
महाराष्ट्रातील [[सातारा]] जिल्ह्यातील [[पसरणी]] या छोट्याश्या गावात शिर्क्यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी ''कमवा व शिका'' हे तत्त्व आचरत शिक्षण पूर्ण केले. [[६ जून]], [[इ.स. १९४३]] रोजी त्यांनी ''[[स्थापत्य अभियांत्रिकी|स्थापत्य अभियांत्रिकीची]]'' पदवी मिळवली. [[वाई]]-पसरणी परिसरात व शिक्षणाची परंपरा नसणार्‍या स्वतःच्या घराण्यात शिकून अभियंता झालेले ते पहिलेच होते.
 
शिक्षणानंतर नोकरीत अख्खी कारकीर्द घालवण्याऐवजी करण्याऐवजी स्वत:ची कंपनी उभारण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. सुरुवातीला छोट्या-मोठ्या कंपन्यांत नोकरी करत उद्योगाला आवश्यक असा अनुभव त्यांनी मिळविला. [[९ सप्टेंबर]], [[इ.स. १९४४]] रोजी दसर्‍याच्या मुहूर्तावर त्यांनी ''सुप्रीम कन्स्ट्रक्शन'' नावाची कंपनी सुरू केली. कंपनी सुरू केल्यानंतर इ.स. १९४४ च्या सुमारास सैन्याकडून कामे मिळविण्यासाठी ते एका सैनिकी अधिकार्‍याला त्याच्या घरी भेटले होते. सुदैवाने त्या अधिकार्‍यानेही शिर्क्यांची कष्टाची तयारी पाहून त्यांना बांधकामांची कंत्राटे मिळवून दिली. पुढे [[इ.स. १९४५]] साली कोल्हापूर कारागृहाच्या बांधकामाचे मोठे कंत्राट त्यांना मिळाले.
==शिक्षण==
शिक्षणाच्या आवडीने आणि ध्यासाने त्यांनी कमवा व शिका या तत्त्वाचे पालन करून आपले शिक्षण पूर्ण केले. ६ जून, [[१९४३]] रोजी (वयाच्या २६ व्या वर्षी ) सिव्हिल इंजिनियर होण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले. शिक्षणाची कोणतीही परंपरा नसणार्या घरातील बी. जी. शिर्के हे [[वाई]]-पसरणी परिसरातील त्या काळातील पहिले सिव्हिल इंजिनियर होते. सिव्हिल इंजिनियरिंगचा संबंध नैसर्गिक गोष्टी व विकासाशी येतो आणि स्थापत्यशास्त्र ही सर्व उद्योगांची जननी आहे असा विचार करून त्यांनी सिव्हिल इंजिनियर व्हायचे ठरविले होते. बी. जीं.च्या स्पष्टवक्तेपणाचा आणि धाडसी वृत्तीचा त्यांना शिक्षण घेताना (तसेच पुढील व्यवसायातही) खूप फायदा झाला.
 
त्याच सुमारास [[इ.स. १९४७]] साली वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी त्यांनी ''विजया शिंदे'' यांच्याशी लग्न केले. त्यांच्या पत्नीने शिर्क्यांना उद्योगात वेळप्रसंगी सल्ले देऊन उद्योगाच्या उभारणीस हातभार लावला. ''सिपोरेक्स'' कंपनीच्या उभारणीमध्ये सौ. शिर्के यांचा मोठा सहभाग होता. इ.स. १९५३ सालापर्यंत [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातील]] [[रसायनशास्त्र]] विभागाची पहिली मोठी इमारत, [[वीरचे धरण]] अशी कामे त्यांनी केली व या सुमारास त्यांचा व्यवसाय स्थिरावला होता. इ.स. १९६२ ते इ.स. १९८१ सालापर्यंत किर्लोस्कर कंपनीची पुण्यातील सर्व बांधकामे [[शंतनुराव किर्लोस्कर]] यांनी शिर्क्यांना विना-निविदा देऊ करत, त्यांच्या बांधकाम गुणवत्तेवर विश्वास टाकला.
 
 
नोकरी न करता स्वत:ची कंपनी उभारण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. सुरुवातीला छोट्या-मोठ्या कंपनीत काम करून उद्योगाला आवश्यक असा अनुभव त्यांनी मिळविला. ९ सप्टेंबर, [[१९४४]] रोजी दसर्याच्या मुहूर्तावर या शेतकर्याच्या मुलाने, कोणतीही व्यावसायिक परंपरा नसताना, पैशाचे पाठबळ नसताना, केवळ जिद्द आणि ज्ञानाच्या जोरावर सुप्रीम कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी सुरू केली. सुरुवातीस सायकलवरूनच ते सगळीकडे फिरत असत. त्यांच्या आयुष्यात जशी अनेक संकटे आली, तसेच काही योगायोगांमुळेही त्यांची बरीच कामे झाली. कंपनी सुरू केल्यानंतर मिल्ट्रीची कामे मिळविण्यासाठी ते एका अधिकार्याला त्याच्या घरी भेटले होते. सुदैवाने त्या अधिकार्यानेही कष्टाची तयारी आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना बांधकामाची कामे मिळवून दिली (१९४४). पुढे कोल्हापूर जेलचे मोठे काम त्यांना मिळाले (१९४५). ते काम त्यांनी अत्यंत चिकाटीने पूर्ण केल्याने ते एक मोठे व्यावसायिक म्हणून ओळखले जाऊ लागले.
 
==विवाह==
बी. जींच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेप्रमाणेच त्यांचे लग्नसुद्धा एक छोटी क्रांतिकारी घटनाच ठरली. [[१९४७]] ला स्वत:च्या वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी विजया शिंदे (वय २४ वर्षे) यांच्याशी लग्न केले. त्या काळात एवढ्या उशिरा लग्न करणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यांच्या पत्नीने त्यांना आयुष्यभर एक चांगला सल्लागार म्हणून साथ दिली. पत्नीच्या प्रसंगी कठोर वागण्याने आणि योग्य सल्ल्यांमुळेच बी. जी. शिर्के राजकारण आणि भ्रष्टाचारापासून दूर राहिले. सिपोरेक्स कंपनीच्या उभारणीमध्ये सौ. शिर्के यांचा मोठा सहभाग होता. बांधकाम व्यवसायातील मनस्तापामुळे श्री. शिर्के यांनी अनेक वेळा व्यवसाय सोडण्याचा विचार केला होता. या प्रसंगी त्यांच्या सौभाग्यवतींनी त्यांना सुयोग्य साथ दिली. [[१९५३]] च्या दरम्यान पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाची पहिली मोठी इमारत, वीरचे धरण अशी कामे त्यांनी केली व ते व्यवसायात स्थिरावले. तसेच [[१९६२]] ते [[१९८१]] पर्यंत त्यांना किर्लोस्कर कंपनीची पुण्यातील सर्व बांधकामे [[शंतनुराव किर्लोस्कर]] यांनी शिर्के यांना विना-निविदा दिली होती.
 
==व्यवसायिक जीवन==
Line २८ ⟶ २३:
 
 
{{DEFAULTSORT:शिर्के,बाबूराव गोविंदराव}}
 
[[वर्ग:मराठी उद्योगपती]]
अशा प्रकारे उद्योगासाठी अनुकूल वातावरण, सोयी, सुविधा, सवलती, चांगला परिसर उपलब्ध असणार्या महाराष्ट्रातील तरुणांना उद्योजकतेची नवी संस्कृती निर्माण करण्याचे आवाहन त्यांच्या जिद्द या संक्षिप्त आत्मवृत्तात त्यांनी केले आहे.