"विकिपीडिया:लेखनभाषा संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २८:
 
:दोन्ही भाषांचा ५०%पेक्षा जास्त शब्द संग्रह सारखाच असताना, मराठीतील कॉमन शब्द वापरणार्‍या हिन्दी भाषकांना आपल्याला जाऊन अहो आमच्या भाषेतील शब्द वापरू नका असे सांगण्याची वेळ येणार नाही हे पहावे म्हणजे झाले :)
=== प्रतिसाद ===
माहितगार ह्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची चर्चा मी शेवटापासून सुरू करतो.सर्वप्रथम शेवटचा मुद्दा.
*:''दोन्ही भाषांचा ५०%पेक्षा जास्त शब्द संग्रह सारखाच असताना, मराठीतील कॉमन शब्द वापरणार्‍या हिन्दी भाषकांना आपल्याला जाऊन अहो आमच्या भाषेतील शब्द वापरू नका असे सांगण्याची वेळ येणार नाही हे पहावे म्हणजे झाले :)''
=>''' आपल्या ह्या मताशी मी अजिबात सहमत नाही'''. आपण जो दावा करत आहात कि दोन्ही भाषांचा ५०% जास्त शब्दसंग्रह सारखाच आहे तो मला मान्य नाही कारण माझ्याकडे मराठी शब्दसंग्रह आहे आणि त्यातील शब्द पाहिल्यानंतर अगदी लहान मुलगाही सांगू शकतो कि अगदीच कमी शब्द हूबेहूबपणे सारखे आहेत,(मी म्हणतो २५% देखील समानता नाही) आपल्याप्रमाणेच इतर मराठी बांधवांना लिपीसाधर्म्यामुळे असे वाटणे स्वाभाविक आहे. आज तुम्ही ५०% म्हणत आहात ,साधारण पणे ५० वर्षापूर्वी जी मराठी बोलली जात होती (नाटकातून-साहित्यातून) त्यातील शब्दांचा बोध आजच्या सामान्य मराठी माणसाला होत नाही, हि सद्यस्थिती (वस्तूस्थिती) आहे.
(<-आपल्याला विकिपीडियातच ते पहावयास मिळेल) काही शतके मागे गेलो (शिवाजी महाराजांचा काळ)तर असे वाटेल हा शब्द मराठी आहे?? आणि त्याही मागे गेलो ज्ञानेश्वरांच्या काळात (७०० वर्ष)तर म्हणाल आहो हि कोणची मराठी ??इतका बदल (फरक) मराठी भाषेत झपाट्याने होत आहे,भविष्यात तर कुणी हा दावा करेन कि मराठी हि हिंदीचीच एक बोली आहे, कारण जवळपास ९०% हून अधिक शब्द सारखे आहेत, हेच कशाला मराठीच्या व्याकरणात्मक वाक्यरचना ह्या हिंदीपेक्षा कितीतरी भिन्न असून सुद्धा आज जी मराठी बोलली जाते ती निव्वळ हिंदी वाक्यात मराठी शब्द कोंबून तयार केलेले मराठी वाक्य वाटते.उदा. तूम आराम करो. हेच आजकाल मराठीत तुम्ही आराम करा (not do rest-take rest).हेच काही काळापूर्वी तुम्ही विश्रांती घ्या (घेणे to take, not to do).असे होते. अजून एक प्रकार.आप बहोत मेहनत करते हो. (सध्या) तुम्ही खूप मेहनत करतात. (पूर्वी) तुम्ही खूप परिश्रम/कष्ट घेतात.असे होते..अशी असंख्य उदाहरणे मी देऊ शकतो ज्यात असे सिद्ध होते कि काळानुरूप मराठी भाषकांनी स्वत:ला हिंदी भाषेनुसार बदलून घेतले आहे.प्रसारमाध्यमांतून (सर्वच स्तरावर,रेडिओ,दूरचित्रवाणी,संभाषण,जाहिराती,शिक्षण,पत्रव्यवहार इ.) होणारी भाषेची झीज आणि जनमाणसांत असणारी अनास्था ह्या कारणांमुळे जगातील कोणतीही भाषा लयास जाते किंवा स्वतंत्र आस्तित्त्व गमावून इतर भाषेत विलीन होते असे भाषाशास्त्र सांगते (Read=Erosion Of Language/Extinct Langugae).त्याउलट तुम्हाला अधिक माहिती म्हणून सांगतो कि तमिळनाडुत तंजावूरमध्ये राहणार्या मराठी लोकांची आजही शब्दसंपत्ती १६ व्या शतकातील आहे,तीथे लिपीसाधर्म्यनसल्याने स्थानिक भाषेचा परिणाम तितकासा झाला नाही,(कदाचित आजच्या पिढीत हळू हळू झालेला जाणवेलही कारण जागतीकिकरणाच्या प्रवाहात भाषेविषयीची जागरूकता अभावानेच आढळते.) जितका महाराष्ट्रातील बोलीवर होतो,म्हणजे आजही तिथे कवाड, ताटी (ज्याला आपण दार,किंवा दरवाजा असे शब्द वापरतो) ,मूल झाले कि बाळ,बाल,बालक असे न संबोधता लेकरू असे संबोधतात,आजही त्यांच्यात किंमत,किमत,असे शब्दप्रयोग न होता मोल हा शब्दप्रयोग आस्तित्वात आहे,सुरुवात,शुरुआत च्या ऐवजी आरंभ हाच शब्द प्रचलीत आहे.त्यांच्या मते महाराष्ट्रातील मराठी खरी नसून त्यांची भाषा खरी आहे असे सांगण्यात येते.
ह्या माहितीच्या अनुषंगाने मी वरील मुद्द्यांवर अधिक चर्चा करतांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन.
 
 
 
०८:३०, २३ जुलै २०१० (UTC)