"विकिपीडिया:२०१००७०२ जिमी वेल्सशी भेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०:
==जिमी वेल्स यांना विचारण्याचे प्रश्न==
:त्यांचे येत्या वर्षात भारत भेटीचे काय प्लान्स आहेत ?[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०५:११, २ जुलै २०१० (UTC)
==प्रश्नोत्तरे==
-----
ही भेट ठरल्यावेळेनुसार झाली. तपशील थोड्याच वेळात लिहीत आहे. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १७:३१, ३ जुलै २०१० (UTC)
 
ओळ १७:
१. '''[[जिमी वेल्स]]''': तुमचे नाव काय? तुमचा विकिपीडियाशी काय संबंध आहे?
 
:::'''अभय नातू''': माझे नाव [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] आहे. मी [[मराठी विकिपीडियावरीलविकिपीडिया]]वरील संपादक/प्रचालक/प्रशासक आहे.
 
२. जिवे:[[मराठी भाषा]] कोठे बोलली जाते?
:::अना: [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यात ही भाषा मुख्यत्वे बोलली जाते. याशिवाय [[मॉरिशस]], [[इस्रायेल]] व इतर काही देशांतही बर्‍याच प्रमाणात मराठी भाषक आहेत. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[न्यू इंग्लंड]], [[ह्युस्टन]]/[[डॅलस]] तसेच [[बे एरियातएरिया]]त बरेच मराठी बोलणारे आढळतात. कॉलोराडोत[[कॉलोराडो]]त, विशेषतः या गावात अगदी हातावर मोजण्याइतके मराठी आहेत.
 
३. जिवे: तुम्ही मराठी विकिपीडियावर किती दिवस कार्यरत आहात, तुम्ही तेथे कसे पोचलात?
 
:::अना: मला आता नक्की आठवत नाही पण २००४ किंवा २००५पासून मी मराठी विकिपीडियावर काम करीत आहे. सुरुवातीस इंग्लिश विकिपीडिया चाळत असताना एका लेखात मराठी आंतरविकि दुवा दिसला. कुतुहलाने टिचकी दिली असता मराठी विकिपीडियावर पोचलो. असे काही आहे हे पाहून आश्चर्य वाटले व आनंद ही झाला. तेथे खुडबुड करुन मराठी/[[देवनागरी]] वाचण्या/लिहिण्याची सोय करुन घेतली व एका लेखाचे सहजच संपादल केले. त्यानंतर तेथील मंडळींना प्रश्न विचारुन व त्यांनी देऊ केलेली मदत घेउन हळूहळू माझी संपादनक्षमता वाढवली. त्यानंतर त्याचे व्यसनच लागल्यासारखे झाले.
 
४. जिवे: तेथील काम कसे चालले आहे? किती सदस्य कार्यरत आहेत?
ओळ ३०:
 
५. जिवे: हे सदस्य मराठीभाषकच आहेत कि इतरभाषीयही आहेत? काही आफ्रिकन भाषांतील विकिपीडियावर मूळ भाषा बोलणारे कमी असतात पण इतर भाषेतील सदस्यांनी ते विकिपीडिया दत्तक घेतल्यासारखे करुन ते वाढवले आहेत. मराठीचे असेच आहे का?
:::अना: दोन्ही. जास्तकरुन मराठी भाषक संपादक आहेत. इतरभाषिक सदस्यही भरघोस योगदान करतात. पण [[दत्तक]] वगैरे जाण्याची वेळ अजून तरी मराठी विकिपीडियावर आलेली नाही.
 
६. जिवे: मराठी विकिपीडियाची लेखसंख्या किती आहे?
:::अना: आम्ही मागच्याच आठवड्यात [[विशेष:सांख्यिकी|३०,०००]] लेखसंख्या पार केली. अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
 
७. जिवे:तुमच्या ऑफलाइन भेटी होतात का? त्या कशा ठरवता? इतर ऑफलाइन संवाद आहे का?
:::अना:होय, वर्षातून ३-४वेळा तरी ४-५ तरी सदस्य एकमेकांस भेटण्याचा प्रयत्न करतात. अजून या भेटींना ठराविक साचा आलेला नाही पण आशा आहे की येईल. ऑफलाइन संवाद साधण्यासाठी याहू ग्रूप निर्माण केला आहे तसेच गूगलवर[[गूगल]]वर एसएमएस चॅनलही तयार केला आहे. या भेटी विकिपीडियाशिवाय यातूनही ठरवल्या जातात.
 
८. जिवे:तुम्ही या भेटीत भाग घेतला आहे का?
ओळ ४५:
 
१०. जिवे: मग इंग्लिशमध्ये माहिती असताना मराठी वाचक येथे येउन ही माहिती वाचेल असे तुम्हाला का वाटते?
:::अना:मराठी भाषेच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने मराठीभाषकांची मोठी टक्केवारी [[इंग्लिश]] किंवा इतर भाषेत पारंगत नसली तरी तोंडओळख ठेउन आहे. त्यातील काही भाग इंग्लिश व इतर भाषाप्रवीण असतात. माझ्या मते या लोकांसाठी आम्ही हा खटाटोप करीत नाहीच. आम्हाला विकिपीडियावरील व जगातीलही ज्ञानाचे भांडार अशा मराठीभाषकांसमोर ठेवायचे आहे ज्यांना संगणकाची व पर्यायाने इंग्लिशची तोंडओळख आहे पण ते इंग्लिश किंवा इतर भाषेत पारंगत नाहीत. उदा. एखाद्याला इंग्लिशमध्ये क्रिकेटचे[[क्रिकेट]]चे वर्णन कळेते पण [[रँकाइन इंजिनबद्दलइंजिन]]बद्दल, जो लेख या आठवड्यातील आमचा उदयोन्मुख लेख आहे (येथे दोन मिनिटे [[:वर्ग:उदयोन्मुख लेख|उदयोन्मुख लेख]] या संकल्पनेबद्दल साइडबार), इंग्लिशमध्ये वाचून फारसा अर्थबोध होत नाही, त्याला हा व असेच अनेक लेख वाचायला मिळून ती माहिती कळावी. दुसरे म्हणजे हँडहेल्ड, मोबाइल उपकरणे, जसे [[स्मार्टफोन]], [[आय-पॉड]], [[ब्लॅकबेरी]], यांवरील माहिती अगदी खेड्यातील व्यक्तीही वाचू शकेल कारण खेड्यात ३जी किंवा ४जी मोबाइल सेवा मिळू शकेल पण संगणकांचा अभावच असतो. अशा ठिकाणी मराठीतील माहिती अत्युपयोगी ठरेल.
 
११. जिवे: मराठी विकिपीडियावर वाद होतात? कशावरुन वाद होतात? ते कसे हाताळले जातात? त्यांची परिणती काय होते?
:::अना:अगदी घड्याळाच्या काट्याबरहुकूम (like clockwork) वाद उफाळून येतात. आत्तापर्यंत माझ्या अनुभवात दोन मोठे विषय आहेत. १. [[इतिहास]] - घडलेली घटना ही दोन व्यक्ती आपआपल्या चष्म्यातून पहात असतात व तसेच घडले हे त्यांनी गृहित धरलेले असते. २. विकिपीडियावर अमकेतमके धोरण का आहे आणि हे ठरवणारे तुम्ही कोण? पैकी पहिल्या प्रकारचे वाद संदर्भ/पुरावे मागितल्यावर मिटतात. कधीकधी एखादा सदस्य पुरावे देऊ न शकल्याने इतर सदस्यांना व बरेचदा विकिपीडियालाही शिव्याशाप देऊन पसार होतो तर बरेचदा समेटही होतो. दुसर्‍या प्रकारात प्रचालक मंडळी असलेली धोरणे समजवण्याचा प्रयत्न करतात व योग्य तेथे धोरणांत बदलही करतात. जेथे करता येत नाहीत तेथे नकार देतात. अशावेळी पुन्ही [[शिव्या|शिव्याशापही]] ऐकतात.
 
१२. जिवे:(हसत) शिव्याशाप ही फक्त मराठी विकिपीडियावरीलच गंमत नाही...मला वाटते हे मानवी स्वभावाचेच लक्षण आहे. असो. नवीन संपादकांना तसेच मराठी विकिपीडियासमोर कोणत्या मोठ्या समस्या आहेत?
:::अना:दोन प्रकारच्या आहेत. पैकी एक मी मघाशी म्हणल्याप्रमाणे मराठीभाषकांचीमराठीभाषकांचा इंग्लिशशी सहवास. बरेचदा इंग्लिश विकिपीडियावरील माहिती पाहून अनेक वाचक मराठी विकिपीडियाचा नाद सोडून इंग्लिश विकिपीडियावर योगदान करतात. दुसरी मोठी समस्या ही तांत्रिकी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या संगणकांत देवनागरी, खरे म्हणजे कोणतीच अ-रोमन, लिपी बुद्ध्याच नसते. देवनागरी लिहिण्या-वाचण्यासाठी अनेक खटाटोप करावे लागतात, मग ते [[लिनक्स]] असो, विंडोझ किंवा ऍपलच्या प्रणाली. कारण डेलसारख्या[[डेल]]सारख्या संगणक-उत्पादकाला देवनागरी घालणे किंवा उपलब्ध करुन देणे महत्वाचे वाटत नाही (not worth their while), तसेच [[मायक्रोसॉफ्ट]] किंवा ऍपलला[[ऍपल]]ला देवनागरी वाचक/लेखकाचे फारसे महत्व नाही. असे असता मग माझ्यासारख्याला ही माहिती अनेक ठिकाणांहून गोळा करुन देवनागरी फाँट इ बसवावे लागतात. यासाठी मराठी विकिपीडियावर फोनेटिक टायपिंग घातलेले आहे (येथे ४-५ मिनिटे साइडबार) ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे पण त्याचे प्रमाणीकरण झालेले नाही तसेच ही सगळी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध नाही. ही माहिती गोळा करताकरता नाकीनऊ येतात. यामुळे अनेक होतकरू संपादक ''खड्ड्यात गेला मराठी विकिपीडिया'' असे म्हणून इंग्लिश विकिपीडियाकडे मोर्चा फिरवतात. जर देवनागरी (तसेच इतर अ-रोमन) लिप्या वापरण्यासाठीची माहीती व साधने (resources) प्रमाणित झाली तसेच मुक्तपणे व सहजपणे उपलब्ध झाली तर मराठी विकिपीडियासमोरील सगळ्यात मोठी तांत्रिक समस्या नाहीशी होईल.
 
१३. जिवे: मी ही बाब पूर्णपणे समजू शकतो आणि मला याबद्दल काही करावेसेही वाटते. मी एक-दोन महिन्यांत [[बिल गेट्सशीगेट्स]]शी भेटणार आहे. त्यावेळी मी या चित्रफीतीतील हा भाग (snippet) त्यांना नक्की दाखवेन...
 
:::अना:(आश्चर्यचकित) **ते** बिल गेट्स? (**That** Bill Gates?)
ओळ ६९:
:::अगदी हिरीरीने मुद्दा मांडणार्‍या एका गृहस्थांना संदर्भ मागितला असता त्यांनी मला समक्ष येउन भेटायला व विकिपीडियावर असलेल्या माहितीबद्दल जाब देण्यास फर्मावले. मी नकार देताच त्यांनी मला मोबाइलवर फोन करण्यास सांगितले. मी त्यासही नकार दिला व परत एकदा संदर्भ देण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी मला सुनावले की त्यांच्याकडील संदर्भ व पुरावे अतिगोपनीय आहेत...इतके गोपनीय की त्यांना ते उघड करताच येत नाहीत!! हे ऐकल्यावर मी त्यांचा नादच सोडला.
 
१७. जिवे: तुम्ही दिलेली ही माहिती अगदी मोलाची आहे. इतर छोट्या विकिपीडियांबद्दलची ही माहिती मी गोळा करीत आहे व शक्य झाल्यास पोलंडमधील[[पोलंड]]मधील [[विकिमेनिया]] कॉन्फरन्समध्ये यातील काही भाग मी दाखवेन. तुम्हाला काही प्रश्न आहेत?
:::अना: सर्वप्रथम, आमच्या समस्त संपादकगणाकडून तुम्हाला शुभेच्छा (माहितगार) तसेच देवनागरी लिपीबद्दल (नरसीकर) पुढाकार घेण्याचे आश्वासन दिल्याबद्दल आभार. तुमचे भारतभेटीचे काय प्लान्स आहेत? (माहितगार) तुम्ही तेथे असताना शक्य झाल्यास मराठी विकिपीडियावरील गँगला तुम्हाला भेटायला आवडेल.
 
१८. जिवे:मी ऑक्टोबरमध्ये[[ऑक्टोबर]]मध्ये भारतात जाणार आहे. [[३० ऑक्टोबरलाऑक्टोबर]]ला मी मुंबईत असेन. माझा कार्यक्रम नक्की झाला की मी माझ्या मदतनीसाकरवी तुम्हाला तो कळवेनच.
:::अना: धन्यवाद.