"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ४१:
[[बाळाजी बाजीराव पेशवे|बाळाजी बाजीरावास]] [[विश्वासराव पेशवे|विश्वासराव]] ,[[माधवराव पेशवे|माधवराव]],व [[नारायणराव पेशवे|नारायणराव]] असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा [[पानिपत]]च्या युध्दांत पडल्यामुळें माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळीं माधवरावाचें वय अवघें सोळा वर्षांचे असल्यामुळें त्याचा चुलता [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथराव]] हा कारभार पाहुं लागला.वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयी होता,तरी तो बुध्दिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सुक्ष्म रीतीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुध्दि ही त्याच्या अंगी होती.
 
'''==शत्रूचा उठाव''' == पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले: तेव्हा ही संधी मराठयांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून [[निजाम|निजामाने]] लढाई सुरू केली. त्यावेळी [[रघुनाथराव पेशवे|रघोबा]] प्रमुख असल्यामुळे राघोबाने [[राक्षसभुवन]] येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात रघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला.त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाउन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांचे वैमनस्य आले,ती संधि साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला.
 
निजामाप्रमाणे [[हैदर|हैदरानेहि]] या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरावर स्वारी केली. या प्रसंगी हैदराने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून् पाहिली; पण पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून [[सावनूर]] व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रूपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.
ओळ ४९:
इ.स. १७६० मध्ये [[म्हैसूर]]चा नामधारी [[राजा चिक्ककृष्णराज]] मरण पावला. त्याच्या जागी हैदराने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आह, असे पाहून हैदराने त्यास बंदीत टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा पेशव्यांस राग येऊन, त्याने निजामांशी दोस्ती करून हैदरावर स्वारी केली. तेव्हा हैदराने मुलूख उजादड करून तलाव् फोडून व विहीरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यास २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून् व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्याने हैदरशी तह केला.
 
'''==[[दिल्ली]]कडील राजकारण''' == पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे [[शिंदे]] [[होळकर|होळकरांचे]] सैन्य त्यास मिळाले.
 
मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडूण राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यांत पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.
ओळ ६०:
तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धि. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण देवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस ह अर्धा शहाणा मानला जाई.
 
'''==माधवरावांचा म्रुत्यु''' = =इ.स. १७७२ मध्ये हैदरावरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडला .पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे व्रुन्दावन थेऊर येथे अद्ध्याप आहे.
[[वर्ग:पेशवे]]