"सदस्य चर्चा:सौरभदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,७८२ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
मला माझे आणि इतर विकिपीडियनांचे या (पुस्तकांची मुखपृष्ठांचे प्रताधिकारां) बाबत थोडी माहिती दिल्यास बरे पडेल .तांत्रिकदृष्ट्या पुस्तकांच्या मुखपृष्ठावरील चित्रांचे प्रताधिकार सर्व साधारणपणे कुणाकडे असतात, चित्रकारा कडे , लेखक किंवा कवी कडे का प्रकाशकाकडे. वृत्तपत्रे पुस्तक परिक्षणे छापताना पुस्तकाचे मुखपृष्ठ छोट्या आकारात बर्‍याचदा छापतात, यातील प्रताधिकार कायदा दृष्टीने आपल्याकडे काही निश्चित माहिती असल्यास आमच्याशी जरूर शेअर करावी कारण असा प्रश्न मागे गौरी देशपांडेंच्या पुस्त्कांच्या मुखपृष्ठांबाबत आला आणि आम्ही ती चित्रे वापरण्यास विकिसदस्यास परवानगी देऊ शकलो नाही.[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] १३:४१, ३ जुलै २०१० (UTC)
 
तुम्ही मला माहिती विचारली आहे पण खरे सांगायचे तर मला याबाबत काहीच माहिती नाही. सर्वप्रथम संचिका चढवताना मी विकी कॉमन्सच्या पानावर अर्धा तास त्या पानावरची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. काहीच कळले नाही, खूपच संदिग्ध माहिती आहे. 'संपूर्णत: माझे काम' हा पर्याय निवडायचे कारण एवढेच की तो सोडून इतर दुसर्‍या कोणत्या पर्यायातही संचिका बसण्यासारखी मला वाटली नाही. लायसन्स निवडतानाही सगळे पर्याय वाचून बघितले, काहीच कळले नाही शेवटी रेकमेंडेड हा पर्याय दिसल्यावर तोच निवडून पुढे गेलो. शिवाय पुस्तकाबाबत लेख लिहिताना आपण जी माहितीचौकट वापरतो त्यात मुखपृष्ठकाराचे नाव उपलब्ध असेल तर ते आपण देतोच. त्यामुळे असा उल्लेख केल्यावर कॉपीराईटचा मुद्दा संपला असे मी समजून चाललो होतो. त्यामुळे 'संपूर्ण माझे काम' म्हणजे त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची केवळ स्कॅन करुन मी काढलेली एक प्रत या अर्थानेच ते माझे काम असा पर्याय मी निवडला. तरी इंग्रजी विकीवरच्या पानाचा [http://en.wikipedia.org/wiki/File:The_Brothers_Karamazov.jpg/]उपयोग होऊ शकेल. इथे त्यांनी It is belived to belong to the publisher असा वाक्प्रयोग केला आहे शिवाय It makes a significant contribution to the user's understanding of the article असा मजकूर वापरला आहे. मला वाटते असे आपल्याला करता येऊ शकेल. पूर्णपणे परवानगी न देण्याऐवजी असे काही केले तर बरे होईल. कारण असे चित्र पुस्तकाच्या लेखावर असेल तर त्याने खूपच फरक पडतो याबाबत कोणाचेच दुमत होणार नाही. तरी आता लायसेन्स, प्रताधिकार यासंबंधी काही आवश्यक बदल मी आजपर्यंत चढवलेल्या संचिका पानांवर करायचे असल्यास मी तयार आहे. बाकी पानाचे निर्देशन कसे करावे आणि वर्गवारीच्या अडचणी यांचे समाधान झाले. धन्यवाद. [[सदस्य:सौरभदा|सौरभदा]] १६:५५, ३ जुलै २०१० (UTC)
६२६

संपादने