"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३३:
== जीवन ==
=== जन्म आणि बालपण ===
कलाकत्यातील सिमलापल्ली येथे [[जानेवारी १२]], [[इ.स. १८६३|१८६३]], सोमवारी सकाळी ६:३३ वा. विवेकानंदांचा जन्म झाला. बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयात एटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य ई. अनेक विषयात आवड आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष रुची दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच त्याने व्यायाम खेळ आदि उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत. लहान वयात त्याने जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टीकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्टा स्वीकारण्यास नकार दिला.
 
===कॉलेज आणि ब्राम्हो समाज===
नरेन्द्रनाथांनी त्याचे घरीच शिक्षण चालू केले. नंतर त्याने १८७१ साली ईश्वर चंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला आणि १८७९ मध्ये प्रेसीडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लिज इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्य तत्वज्ञान, आणि युरोपीय इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाईन आर्ट ची परीक्षा आणि १८८४ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
नरेंद्र नाथांनी डेविड ह्युम, इमन्युएल कांट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पीनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेणहायर, आगस्त कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मील आणि चार्ल्स डार्विन इ. विचरवंतांचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतीवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सर च्या ‘Education’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्य तत्वज्ञानाच्या अभ्याससोबत त्यांनी प्राचीन भारतीय संस्कृत आणि बंगाली ग्रंथाचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ ते जिथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हसी त्यांच्याबद्दल लिहितात : “नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि शक्यता असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठात, तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.” त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटल्या जात असे. “मला असं वाटलं नव्हतं कि येवढ्या तरुण मुलाने येवढे वाचले असेल. ” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.
 
=== शिकागो, अमेरिका येथील सर्वधर्मपरिषद ===