"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३४:
 
'''जन्म आणि बालपण'''
कलाकत्यातील सिमला पल्ली येथे १२ जाने. १८६३, सोमवार, मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी ६:३३ वा. विवेकानंदांचा जन्म झाला. बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयात एटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. आपल्या पोती मुलगा जन्मला यावा म्हणून त्या वाराणसीच्या विरेश्वराची प्रार्थना आणि व्रतवैकल्ये करायच्या. शिव आपल्या ध्यानवस्थेतून बाहेर येऊन ‘तुझ्या पोती जन्म घेईन’ असे आश्वासन देताहेत असे स्वप्न त्यांना वारंवार पडे.
नरेंद्र नाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा - वडिलांच्या सारासार विवेकाचा आणि आईच्या धार्मिकतेचा त्यात मोठा वाटा आहे. आत्मसंयमाचा गुण आईकडून त्यांना प्राप्त झाला. “आयुष्यभर पवित्र रहा. आत्मसन्मानाला जप आणि दुसर्यापच्या आत्मसन्मानाची बुज राख.“ या आईच्या शिकवणीचा उल्लेख पुढील आयुष्यात त्यांनी वारंवार केला. त्यांनी ध्यानाची कला अवगत केली आणि समाधी अवस्थेत ते सहज जात. झोपी जातांना त्यांना प्रकाश दिसे आणि ध्यानावस्थेत अनेक वेळा बुद्धांचे दर्शन त्यांना घडले. बालपणापासूनच त्यांना साधू बैरागी यांच्याविषयी प्रचंड कुतूहल होते.
नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य ई. अनेक विषयात आवड आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष रुचि दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले होते. किशोरावस्थेपासूनच त्याने व्यायाम खेळ आदि उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. छोट्या वयातच त्यांनी जुनाट अंधश्रद्धा आणि जाती आधारीत भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी प्रश्न विचारले आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टीकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्टा स्वीकारण्यास नकार दिला.