"सरस्वती महाल ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
New page: शिवाजी महाराजांचे वंशज सरफोजी महाराज दुसरे यांनी तंजावूर येथे या ग...
 
No edit summary
ओळ १:
शिवाजी महाराजांचे वंशज [[सरफोजी महाराज दुसरे]] यांनी [[तंजावूरतंजावर]] येथे या ग्रंथालयाची स्थापना केली. हे ग्रंथालय संपूर्ण जगात; मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते. या ग्रंथालयात सुमारे ४६००० हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. त्यातील काही प्राचीन असून भूर्जपत्रांवर व ताडपत्रांवर लिहिलेली आहेत. त्यात मध्ययुगीन काळातील वाल्मीकी रामायण, कंब रामायण व इतर पुरातन ग्रंथांच्या ताडपत्रावरील प्रती आहेत. कागदांवर लिहिलेल्या हस्तलिखितांमध्ये इसवी सन १४६८ मध्ये लिहिलेले भामती, भगवद्गीतेचे सर्वात लहान आकारातील हस्तलिखित, अंबर होसैनी या मुसलमान कवीने केलेले भगवद्गीतेचे मराठी निवेदनाचे हस्तलिखित, तत्त्व चिंतामणी हा बंगाली लिपीतील संस्कृत ग्रंथ यांचा समावेश आहे.