"गणेश प्रभाकर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.204.144.105 (चर्चा)यांची आवृत्ती 538942 परतवली.
ओळ २:
 
== जीवन ==
पुण्यात विद्यार्थिदशेतच ते [[ना. ग. गोरे]] व [[एस.एम. जोशी|एस.एम. जोश्यांच्या]] कार्याने प्रभावीत झाले होते. त्यांनी [[इ.स. १९४२|१९४२]]च्या [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनातही]] सक्रीय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी १३ महिने [[येरवडा तुरुंग|येरवड्याच्या तुरूंगात]] जावे लागले. त्यांनी समाजवादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरूंगात होते.<ref>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=lk9vwpaaeMNbuN9ET0uzxuRa4E7PtNEdgqqa1BiGd7kG2o4NkzprJg==</ref> <br />ग.प्र. प्रधान १९४५ पासून पुण्याच्या [[फर्गसन महाविद्यालय|फर्गसन महाविद्यालयांत]] इंग्रजीचे प्राध्यापक होते.
बालकाचं निर्व्याज हसू ओठी मिरवणारे, सर्वांना आपलेसे वाटणारे प्रधान मास्तर गेले. मास्तर म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्राचा सात्त्विक चेहरा होता. महाराष्ट्राच्या समाजकारणातील एक महत्त्वाचं पर्व असं त्यांच्या जीवनाचं वर्णन करता येईल. अलीकडच्या काळात सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांमध्ये दुर्मिळ झालेल्या सुसंस्कृतपणा, विनम्रता, शालीनता, अभ्यासू वृत्ती, सहकार्‍यांविषयी आदरभावना, कृतज्ञता, सतत शिकण्याची वृत्ती अशा अनेक गुणांचा समुच्चय मास्तरांमध्ये होता.
मास्तरांची जीवनकहाणी मोठी प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्म पुण्यात 26 ऑगस्ट 1922 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. गणेश प्रभाकर प्रधान हे त्यांचं पूर्ण नाव; पण जनमानसात ग. प्र. प्रधान म्हणूनच ते रुजले आणि निकटवर्तीयांच्या स्नेहपरिवारात प्रधान मास्तर म्हणूनच ओळखले जाऊ लागले. त्यांच्याबाबत मास्तर हे सामान्यनाम न राहता ते विशेषनाम बनले. आपल्या कर्तृत्वाने पुण्यातील थोर लोकांच्या प्रभावळीत ते सहज जाऊन बसले.
मातापित्यांच्या रूपाने सुजाण नि सुसंस्कृत पालक त्यांना लाभले. त्यांच्यामुळेच लहानपणापासून उत्तम संस्कारांबरोबरच अभ्यासाची व वाचनाची गोडी त्यांना लागली. शालेय व महाविद्यालयीन अध्ययनाच्या वेळी मास्तरांच्या आईने मोठ्या दक्षतेने त्यांच्याकडे लक्ष पुरविले. त्यांनी तिच्याविषयी म्हटले आहे, माझ्या मास्तरकीमागची प्रेरक शक्ती माझी आई आहे. तिने मला सतत शिकविले. ती मास्तरची मास्तर होती! शालेय जीवनात एक हुशार व अभ्यासू विद्यार्थी म्हणून ते चमकले. 1942 मध्ये इंग्लिश ऑनर्स घेऊन ते बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
चार भिंतींमधले शालेय शिक्षण सुरू असतानाच बिनभिंतींच्या शाळेकडेही प्रधान सर आकृष्ट झाले होते. तो काळच तसा मंतरलेला होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देश स्वातंत्र्यासाठी झुंजत होता. मास्तरांच्या तरुण, उत्साही मनात त्याचे पडसाद उमटणे अपरिहार्यच होते. कॉलेजमध्ये शिकत असताना 1940 पासूनच ते एसेम जोशी आणि ना. ग. गोरे या समाजवादी नेत्यांच्या सहवासात आले आणि राष्ट्र सेवादलात दाखल झाले. पंडित नेहरूंच्या आत्मचरित्रासारख्या स्फूर्तिदायी ग्रंथाचे वाचन करीत असतानाच नेत्यांच्या भाषणांनी आणि सेवादलातील राष्ट्रीय गाण्यांनी ते भारावून गेले! 1942 च्या चले जावच्या लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. येरवड्याच्या कारावासात 11 महिने राहिले. तिथेही त्यांना अनेक थोरामोठ्यांचा सहवास लाभला. वेगळे, व्यापक शिक्षण घडले. वेगळी विशाल दृष्टी लाभली.
कारावासातून बाहेर आल्यावर प्रधान सर परत महाविद्यालयीन अध्ययनाकडे वळले आणि 1945 मध्ये इंग्रजी व मराठी विषय घेऊन एम. ए.ची पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर 1945 ते 1965 अशी तब्बल वीस वर्षे फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. या काळात अध्ययनशील प्राध्यापक असा लौकिक त्यांनी मिळविला. विपुल वाचनाबरोबरच विद्यार्थ्यांविषयी आत्यंतिक कळकळ व प्रेम यांमुळे त्यांचे प्राध्यापकीय कौशल्य प्रकट होत असे आणि विद्यार्थी प्रभावित होऊन जात असत. त्यामुळेच ते एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक बनले. या वीस वर्षांच्या कालावधीत त्यांच्या शिक्षणदानाने पदवीधर बनलेले आणि उच्च पदावर पोचलेले किती तरी विद्यार्थी निर्माण झाले!
या वीस वर्षांच्या कालावधीतच-1954 ते 1965 या काळात-प्रधान सरांनी प्रथम पुणे विद्यापीठ सिनेटचे व नंतर कार्यकारिणीचे सदस्य म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. यानंतर मात्र त्यांना याहून अधिक व्यापक क्षेत्राची ओढ वाटू लागली आणि म्हणून त्यांनी प्राध्यापकीचा राजीनामा देऊन राजकीय कार्याला वाहून घेण्याचे ठरविले. ते समाजवादी पक्षाचे सर्ववेळ कार्यकर्ते झाले.
दरम्यान, 1966 मध्ये मास्तर पदवीधर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून विधान परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर 1972 व 1978 मध्येही पदवीधर मतदारांनी त्यांचीच बहुमताने निवड केली. एकूण 18 वर्षांच्या या काळात विधान परिषदेत ते एक अभ्यासू, आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून गाजले. त्यांनी महाराष्ट्रात सतत कार्यकर्त्यांशी संपर्क साधला, शिक्षणाचे व शिक्षकांचे प्रश्न सतत मांडले व सरकारचे लक्ष वेधले. 1968 मध्ये ग्रंथालय परिषदेने त्यांना अध्यक्ष म्हणून सन्मानित केले.
या दरम्यान 1975 मध्ये आणीबाणी घोषित झाली. त्या वेळी मास्तरांसारखा स्वातंत्र्यप्रिय, लोकनिष्ठ देशभक्त स्वस्थ कसा बसणार? त्यांनी आणीबाणीच्या निषेधात आवाज उठवला आणि 18 महिने कारावास भोगला. कारावासात विपुल वाचन आणि साता उत्तराची कहाणी व भाकरी आणि स्वातंत्र्य या दोन पुस्तकांचे लेखन केले.
1980 ते 1982 या अवधीत ते विधान परिषदेचे विरोधी नेते म्हणून निवडले गेले. विधान परिषदेत जनतेची गार्‍हाणी त्यांनी प्रभावीपणे मांडली. एक तळमळीचा कणखर नेता म्हणून त्यांची प्रतिमा जनतेसमोर आली. 1984 मध्ये ते विधान परिषदेतून निवृत्त झाले. त्यानंतर 1984 पासून त्यांनी साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या साधना साप्ताहिकाचे एक मानद संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. या काळात मास्तर संपूर्ण साधनामय झाले होते. एवढे की, मागील वर्षी त्यांनी आपली राहती वास्तूही साधना परिवाराकडेच सुपूर्द केली.
विविध क्षेत्रांत काम करीत असतानाही वाचन, लेखन, कार्यकर्त्यांचे शिक्षण व जनतेचे प्रबोधन यांसाठी त्यांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहिले आणि उद्‌बोधक भाषणे दिली. या निमित्ताने ते सार्‍या मराठी मुलुखात सतत फिरले. त्यांच्या ठायीची अध्ययनपरता व चिंतनशीलता यांमधून मौलिक ग्रंथसंपदाही निर्माण झाली आहे.
1956 मध्ये लोकमान्य टिळकांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी प्रा. अ. के. भागवत यांच्यासमवेत लो. टिळकांचे इंग्रजी चरित्र लिहिले. त्याला अखिल भारतीय पुरस्कार लाभला. त्याप्रमाणेच 1969 मध्ये महात्मा गांधी जन्मशताब्दीच्या वेळी प्रा. अ. के. भागवत यांच्यासमवेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी गांधींचे इंग्रजी चरित्र लिहिले व विद्यार्थ्यांना गांधीजी - व्यक्ती व कार्य यांचा परिचय करून दिला.
आणीबाणीत कारागृहात असताना लिहिलेला त्यांचा साता उत्तराची कहाणी हा ग्रंथ खूपच गाजला. 1940 ते 1980 या कालखंडात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या ध्येयवादी कार्यकर्त्यांमधील विचारमंथन आणि विविध चळवळी यांचा आलेख या ग्रंथात आलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राची राजकीय बखरच म्हणावी लागेल. कोलकत्याच्या भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कारही या ग्रंथाला लाभला.
1965 मध्ये भारत-पाक संघर्षाच्या वेळी मास्तरांनी शिरूभाऊ लिमयेंच्या बरोबर युद्धभूमीवर पत्रकार म्हणून जाण्याची धडाडी दाखवली. रणक्षेत्रावर प्रत्यक्ष संचार करून त्यावर आधारित हाजीपीर हे पुस्तक त्यांनी लिहिले. 1971 मध्ये बांगलादेशाच्या मुक्तीलढ्याच्या वेळीही प्रधान सर तिथे पोचले. अनेक गावांत गेले. त्यांनी गांधीजींचा नौखालीतील आश्रम पाहिला. अनेकांशी बोलले. त्यांची मने जाणून घेतली आणि त्यावर आधारित सोनार बांगला हे पुस्तक लिहिले. कच्छच्या रणातही तत्कालीन संघर्षाच्या वेळी ते गेले आणि कांजरकोट हे पुस्तक लिहिले. त्यांची ही तिन्ही पुस्तके म्हणजे मराठी साहित्यात आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्याने शोभणारी आगळीवेगळी प्रवासवर्णने आहेत.
1986 मध्ये मास्तरांनी स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत हा ग्रंथराज सिद्ध केला. 1857 ते 1947 या कालखंडातील स्वातंत्र्यलढ्याचे वस्तुनिष्ठ आणि हृदयस्पर्शी वर्णन त्यांच्या सिद्धहस्त लेखणीने फारच उत्कृष्ट प्रकारे केले आहे. इंडियाज फ्रीडम स्ट्रगल हे इंग्रजी पुस्तकही त्यांनी स्वातंत्र्य लढ्यावर लिहिले. त्याला अखिल भारतीय पारितोषिकही मिळाले.
साहित्य अकादमीसाठी मास्तरांनी आगरकर लेख संग्रह संपादित केला आणि राम गणेश गडकरी व साने गुरुजी ही त्यांच्या जीवनाचा व साहित्याचा परिचय करून देणारी नेटकी, सुंदर छोटी पुस्तकेही लिहिली. नवसाक्षरांसाठी महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू ही सुलभ रसाळ भाषेतली चरित्रेही त्यांनी शब्दबद्ध केली.
मास्तरांची भाषाशैली त्यांच्या अंतःकरणाप्रमाणेच साधी, सोपी, सरळ आहे. तरुण पिढीवर देशभक्तीचा संस्कार व्हावा या तळमळीतूनच त्यांचे सर्व लिखाण झाले असल्यामुळे त्यांच्या साहित्यात एक प्रकारची स्नेहमयी उत्कटता व उमाळा अनुभवास येतो.
मास्तरांनी वेगवेगळी क्षेत्रे व माध्यमे वेगवेगळ्या वेळी प्रसंगानुरूप हाताळली, तरी त्यांचा पिंड मूलतः शिक्षकाचा होता. त्यांनी कधी विद्यार्थ्यांचे शिक्षक म्हणून, तर कधी समाज-शिक्षक म्हणून शैक्षणिक कार्य केले. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोखले, आगरकर आदी थोर शिक्षणमहर्षींची महान परंपरा त्यांनी राखली. आयुष्याच्या अखेरपर्यंत हा हाडाचा शिक्षक सर्वांना हा साधेपणा, सज्जनपणा, नेकपणा शिकवत राहिला. आपल्या विपुल ग्रंथसंपदेच्या रूपाने मास्तर यापुढेही मराठी समाजासमोर दीपस्तंभ म्हणून अजरामर झाले आहेत.
 
== राजकारण ==