"मेष रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ms:Aries (astrologi)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Aries.svg|right|thumb|150 px|मेष राशीचे चिन्ह]]
'''मेष''' ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी पहिली रास आहे. मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे. ही अग्नि तत्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० अंशात पसरली आहे. चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत.
 
==व्यक्ती स्वभाव==
मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टीकोण ठेवणार्‍या, धीट, महत्वाकांक्षी, कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणार्‍या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष, कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात.
 
कालपुरूषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधीत त्रास जसे दाह, मस्तकशूळ वगैरे तसेच चेहर्‍याचा पक्षाघात, नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे असे विकार होतात.
 
==लाभदायक व्यवसाय==
मेष राशीच्या स्वभावानुसार यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण असल्यामुळे राजकारणी, सैन्य अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात.
 
==हेही पहा==
[[राशी]]
 
==संदर्भ==
* अश्वलायन - जुना संदर्भ ग्रंथ
* होरासिद्धि - जुना संदर्भ ग्रंथ
* राशी चक्र, ले. [[शरद उपाध्ये]]
 
{{विस्तार}}
[[वर्ग:राशी]]
[[वर्ग:ज्योतिष-राशी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मेष_रास" पासून हुडकले