"भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hi:भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान
ओळ ८९:
==तिसरा टप्पा==
तिसरा टप्पा २.८ मी व्यासाचा आहे. द्रवरूप हायड्रोजन आणि द्रवरूप ऑक्सिजन दोन वेगळ्या भांड्यात साठवलेले असतात ( १२.५ टन).
 
पृथ्वीभोवतीच्या भूस्थिर कक्षेत सुमारे दोन टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाचा उपग्रह पाठवायचा असल्यास, प्रक्षेपकाच्या शेवटच्या टप्प्यात अवजड उपग्रहाला ढकलत पुढे नेण्यासाठी मोठी ऊर्जा लागते. कमी इंधनाचा उपयोग करून उपग्रहाला सुमारे 800 सेकंदांपर्यंत ढकलत नेण्यासाठी "क्रायोजेनिक' इंजिनाचा वापर करण्यात येतो. या इंजिनामध्ये इंधन म्हणून द्रवरूप हायड्रोजन, तर द्रवरूप ऑक्‍सिजनचा उपयोग ऑक्‍सिडायझर म्हणून करण्यात येतो. द्रवरूप हायड्रोजनचे तापमान उणे 253 अंश, तर द्रवरूप ऑक्‍सिजनचे तापमान उणे 183 अंश सेल्सिअस असते. यासाठी लागणारे पंप चालविण्यास 40 हजार "आरपीएम'ची मोटर लागते. हे सर्व 800 सेकंदांसाठी जसेच्या तसे घडले, तरच दोन टनांचा उपग्रह अपेक्षित कक्षेत पोचतो. हे तंत्रज्ञान भारत सोडून अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान आणि रशियाकडेच आहे.
 
==प्रक्षेपण माहिती==