"औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
'''ज्वलन कार्यक्षमता'''- <br />ही कार्यक्षमता किती प्रमाणात इंधन जाळले गेले यावर मोजतात. साधारणपणे ९५ ते १०० टक्के ज्वलन कार्यक्षमता ही चांगली मानली जाते.
 
कार्यक्षमता ही थर्मोडायनामिक्स च्या तत्वांप्रमाणे ठरवली जाते त्यामुळे एका ठराविक प्रमाणावर ही कार्यक्षमता वाढवता येत नाही. वाफेला जितक्या जास्त दाबावर व तापमानावर तापवू तितकी जास्त कार्यक्षमता वाढते. परंतु वाढत्या दाब व तापमान नेणे सहज शक्य नसते त्यामुळे कार्यक्षमता वाढवणे हे एक आव्हान् आहे. युरोप व इतर थंड प्रदेशातील देशात ही वाया जाणारी उर्जा वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सभोवतालच्या प्रदेशात गरम पाण्याच्या स्वरुपात वाटतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील घर गरम ठेवण्यास लागणारी वीजेची गरज कमी होते व indirectlyअप्रत्यक्ष कार्यक्षमता वाढते.
 
जर वीजनिर्मिती संचात जर नैसर्गिक वायू अथवा वायूंवर आधारित इंधन वापरत असतील तर दोन टप्यात वीज निर्मिती करतात यामुळे एकूण कार्यक्षमता वाढण्यात चांगलीच मदत होते. पहिल्या टप्यात वायू इंधनाला अतिउच्च तापमानावर ज्वलन ( साधारणपणे १२०० ते १४०० अंश से) करुन त्याचा उपयोग पहिले जनित्र फिरवायला करतात, यातून बाहेर पडणार्‍या वायूंचे तापमान अजूनही बरेच असते त्यामुळे त्या उष्णतेने पाण्याची वाफ बनवून दुसर्‍या टप्यात दुसरे जनित्र फिरवून अजून वीज निर्मिती करता येते. याला इंग्रजीत combined heat and power cycle असे म्हणतात. अश्या प्रकारच्या वीज निर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता ५० टक्यांपेक्षाही जास्त असते.