"औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

* '''बब्लिंग बेड''' - Bubbling bed combustor याची क्षमता ग्रेट प्रकारापेक्षा जास्त असते व साधारणपणे १०० मेगावॅट पर्यंत याचा वापर होतो. घन इंधन बारीक करुन यात वापरता येते. इंधन जाळण्याची कार्यक्षमता साधारणपणे ९० टक्यांपर्यंत असते. मोठ्या प्रकल्पांसाठी या संचाचा आकारामुळे मर्यादा येतात त्यामुळे १०० मेगावॅट पेक्षा शक्यतो मोठा संच बांधत नाहीत. कारखान्यामधील बॉयलर साठी उत्तम.
* '''सर्कुलेटींग फ्लुईडाईझ्ड बेड'''- Circulating fluidized bed combustor - याची क्षमता २५० मेगावॅट पर्यंत असते. अतिशय उत्तम कार्यक्षमता, विविध आकाराचे व प्रकारचे इंधन वापरण्याची क्षमता. यामुळे गेल्या काही वर्षात याचे संच अतिशय प्रसिद्ध झाले आहेत. सर्वात खास वैशिठ्य म्हणजे इंधन जाळण्याची कार्यक्षमता साधारणपणे ९९ टक्यांपर्यंत असते व प्रदूषक घटकांचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे प्रदूषणावर फारसा खर्च करावा लागत नाही. अजून एक फायदा म्हणजे या ज्वलन चेंबर मध्ये कोळसा व जैविक इंधनाचे मिश्रणही वापरता येते. परंतु मोठ्या प्रकल्पांसाठी याची क्षमता कमी पडते. पोलंडमध्ये या प्रकारावर ६०० मेगावॅट क्षमतेचा बेड बनवला आहे व सध्या प्रायोगिक वापरावर आहे.
* '''पल्वराईझ्ड कोल फायरिंग'''- Pulverised coal firing combustor - या संचाची क्षमता इतर कोणत्याही प्रकारापेक्षा जास्त म्हणजे १५०० ते २००० मेगावॅट पर्यंत असू शकते.इंधन जाळण्याची कार्यक्षमता साधारणपणे १०० टक्यांपर्यंत असते त्यामुळे मोठ्या औष्णिक विजनिर्मिती प्रकल्पात हे पसंतीचे संच असतात परंतु यामध्ये फक्त अतिबारीक कोळसाच इंधन म्हणून वापरता येतो व प्रदूषक घटकांचे प्रमाण खूप असते त्यामुळे बाहेर पडणार्‍या दूषीत वायूंवर मोठ्या प्रमाणावर खर्च करुन प्रदूषण कमी करावे लागते.
* गॅस फायरिंग - यात नैसर्गिक वायू अथवा इतर ज्वलनशील वायू इंधन म्हणून वापरण्यात येतात. यात अतिउच्च तापमानावर ( १४०० °से) इंधन जाळण्यात येते व तीन ते चार टप्यात जनित्र फिरवण्यात येते. या प्रकारच्या संचामध्ये सर्वात जास्त कार्यक्षमता मिळते. (५२ टक्के)
 
== रचना ==
३,५७२

संपादने