"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२७ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
==पंचम प्रश्न==

'''अथ हैनं सैब्यः सत्यकामः पप्रच्छ ।

'''स यो ह वै तभ्दगवन्मनुष्येषु प्रायणान्तमोङ्कारमभिध्यायीत ।

'''कतमं वाव स तेन लोकं जयतीति । तस्मै स होवाच ॥ १ ॥'''

त्यानंतर पिप्पलाद मुनींना शिबि पुत्र सत्यकामाने प्रश्न विचारला, "हे भगबन, मनुष्यामध्ये जो कोणी मृत्युपर्यंत ओंकाराचे उत्तम प्रकारे ध्यान करतो तो त्या उपासनेच्या बलाने कोणत्या लोकावर विजय मिळवतो? निःसंशय जय मिळवतो?" (अर्थात आमरण प्रणवोपासना केल्यास काय फल मिळते?) ॥१॥

'''एतद्वै सत्यकाम परं चापरं च ब्रह्म यदोङ्कारः । तस्माद्विद्वानेतेनैवायतनेनैकतरमन्वेति ॥ २ ॥'''

पिप्पलाद त्याला म्हणाले, 'हे सत्यकामा जे पर आणि अपर असे ब्रम्ह आहे तेच हा ॐ कार आहे. त्यामुळे याचे ज्ञान असणारा मनुष्य याच्याच एका आयतनाने (जप, स्मरण आणि चिंतनाने) त्या दोन ब्रम्हातील एका ब्रम्हाचे अनुसरण करतो. ॥२॥

'''स यध्येकमात्रमभिध्यायीत स तेनैव संवेदितस्तूर्णमेव जगत्याभिसंपध्यते ।

'''तमृचो मनुष्यलोकमुपनयन्ते स तत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नो महिमानमनुभवति ॥ ३ ॥'''

जर त्याने ॐ कारच्या एकाच भागाचे (अ या मात्रेचे) ध्यान केले अर्थात एक मात्रेचे त्याचे स्पंदन उत्पन्न होईल असा उच्चार आणि अशी धारणा केली तर त्याने तो मृत्युनंतर अशा सुखाला आणि ऎश्वर्याला पात्र होईल की त्यासाठी तो मानवयोनीतच पुन्हा जन्म घेईल. तेथे क्रग्वेदाची व्याप्ती आहे. त्यामुळे त्याची क्रग्वेदाकडे प्रवृत्ती होईल. तेथे तपश्चर्या, ब्रम्हचर्य आणि श्रद्धा यांनी युक्त असा तो ऎश्वर्ययुक्त होऊन राहील. पुढे त्याच्या तपाने तो अधिकाधिक श्रेष्ठ सुख प्राप्त करील. ॥३॥

'''अथ यदि द्विमात्रेण मनसि संपध्यते सोऽन्तरिक्षं यजुर्भिरुन्नीयते सोमलोकम् ।

'''स सोमलोके विभुतिमनुभूय पुनरावर्तते ॥ ४ ॥'''

आणि जर दोन मात्रांच्या ॐकाराचा उच्चार (अ+उ) तो मनाची एकाग्रता ठेवून करील तर यजुर्वेदातील क्रचांची प्रेरणा मिळून तो सोम (चंद्र) लोकापर्यंत जाईल. सोमलोकात सुख भोगून तो पुन्हा दृश्य जगतात जन्माला येईल. ॥४॥

(एक मात्रेचा ॐकार म्हणजे ओऽम्. दोन मात्रांचा ॐकार म्हणजे ओऽऽम्. तीन मात्रांचा ॐकार म्हणजे ऒऽऽऽम्. हे म्हणण्याचा, षड्जापासून निषादापर्यंत कोणता स्वर आपण म्हणावा ही गोष्ट गुरूगम्य आहे.)

'''यः पुनरेतं त्रिमात्रेणोमित्येतेनैवाक्षरेण परं पुरुषमभि-ध्यायीत स तेजसि सूर्ये संपन्नः ।

'''यथा पादोदरस्त्वचा विनिर्भुच्यत एवं ह वै स पाप्मना विनिर्भुक्तः स सामभिरुन्नीयते

'''ब्रह्मलोकं स एतस्माज्जीवघनात् परात्परं पुरुशयं पुरुषमीक्षते । तदेतौ श्लोकौ भवतः ॥ ५ ॥'''

पण जो तीन मात्रांच्या (अ उ म )ॐकाराच्या या अक्षरानेच या परम पुरूषाचे अंतरंगात ध्यान करील तो तेजोमय सूर्यलोकी जातो. ज्याप्रमाणे साप कात टाकून मोकळा होतो त्याचप्रमाणे तोही पापांपासून सर्वथा मुक्त होतो. तो 'साम' वेदातील क्रचांनी ब्रम्हलोकात नेला जातो. तो या जीव समुदायापेक्षा खूप उच्च अशा देहरूपी पुरीत राहणाऱ्या परम पुरूषाला अर्थात पुरुषोत्तमाला पाहू शकतो. त्याला परमेश्वराचा साक्षात्कार होतो. हे स्पष्ट करणारे दोन श्लोक पुढीलप्रमाणे आहेत. ॥५॥

'''तिस्रो मात्रा मृअत्युमत्यः प्रयुक्ता अन्योन्यसक्ताः अनविप्रयुक्ताः ।

'''क्रियासु बाह्याभ्यन्तरमध्यमासु सम्यक् प्रयुक्तासु न कम्पते ज्ञः ॥ ६ ॥'''

ॐ च्या अ, उ आणि म या तीन मात्रा; एक दुसरीशी जोडलेली अशा किंवा वेगवेगळ्या म्हटल्या तरीही त्रिलोकापर्यंतच त्यांची गती असल्यामुळे त्यांचा प्रयोग करणारा कितीही उच्च अवस्थेपर्यंत गेला तरी त्याची मृत्युपासून, मृत्युच्या या त्रैलोक्यमय क्षेत्रापासून मुक्ती होत नाही. पण त्यांचा अ=बाह्य, उ=अंतरातील आणि म=त्यांच्या मधील क्रियांमध्ये सम्यक; योग्य प्रकारे उपयोग केला तर ज्ञानी म्हणजे परमेश्वराचे ज्ञान झालेला मनुष्य विचलित होत नाही. अविनाशी ब्रम्हाशीच एक्याने राहतो. म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि भावनामय सर्व क्रियांत प्रणवाचे ध्यान आणि प्रणववाच्या परब्रम्हाचे ध्यान अखंड ठेवावे म्हणजे आत्मस्वरूपापासून तो साधक च्युत होत नाही, जन्ममरणाच्या फेऱ्यात पडत नाही. ॥६॥

'''ऋग्भिरेतं यजुर्भिरन्तरिक्षं सामभिर्यत् तत् कवयो वेदयन्ते ।

'''तमोङ्कारेणैवायतनेनान्वेति विद्वान् यत्तच्छान्तमजरममृतमभयं परं चेति ॥ ७ ॥'''

ऋग्वेदाने एकमात्रा ॐ चा अभ्यास करणारा साधक मनुष्यलोकात नेला जातो, दोन मात्रांच्या ॐ चा अभ्यास करणारा साधक यजुर्वेदाने अंतरिक्षात नेला जातो. पूर्णरूपाने ॐ चा अभ्यास करणारा साधक सामवेदाने ब्रम्हलोकी नेला जातो; त्या ब्रम्हलोकाचे ज्ञान ज्ञानीजनांना असते. विद्वान साधक केवळ ॐ च्या अवलंबनानेच त्या परम पुरुषोत्तमाला प्राप्त होतो - जो शांत, जरारहित, अमर आणि भयरहित असून सर्वश्रेष्ठ आहे. ॥७॥

इति प्रश्नोपनिषदि पञ्चमः प्रश्नः ॥

इति प्रश्नोपनिषदि पञ्चमः प्रश्नः ॥

==षष्ठम प्रश्न==
३५१

संपादने