"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६१ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
'''कस्यैतत् सुखं भवति कस्मिन्नु सर्वे सम्प्रतिष्टिता भवन्तीति ॥ १ ॥'''

त्यानंतर त्या पिप्पलाद मुनींना गर्ग गोत्रातील सौर्यायणीने प्रश्न विचारले - 'भगवन, या मनुष्यशरीरात कोण कोण झोपतात? त्यात कोण कोण जागृत असतात? कोणता देव स्वप्ने पाहणारा असतो? येथे सुख कोणाला होते? हे सगळे कशामध्ये स्थित आहेत?' ॥१॥

'''तस्मै स होवच ।'''
'''नादत्ते नानन्दयते न विसृजते नेयायते स्वपितीत्याचक्षते ॥ २ ॥'''

त्याला पिप्पलाद म्हणाले, ' हे गार्ग्य. सूर्य अस्ताला गेला की त्याचे किरण त्याच्या तेजोमंडलात जसे एकत्र होतात आणि वारंवार सूर्य उगवला की ते (रोज) जसे पसरतात त्याप्रमाणेच निद्रेच्या वेळी सर्व इंद्रिये त्या परम देवाच्या (आत्म्याच्या) मनात एकत्र होतात; त्यामुळे तो मनुष्य ऎकत नाही, पाहत नाही, वास घेत नाही, रस चाखत नाही, स्पर्श करत नाही, बोलत नाही, आनंद पावत नाही, काही सोडून देत नाही आणि चालतही नाही. या स्थितीत, 'तो निजला आहे असे' म्हटले जाते.' ॥२॥

'''प्राणाग्रय एवैतस्मिन् पुरे जाग्रति ।'''
'''गार्हपत्यो ह वा एषोऽपानो व्यानोऽन्वाहार्यपचनो यद्गार्हपत्यात् प्रणीयते प्रणयनादाहवनीयः प्राणः ॥ ३ ॥'''

त्यावेळी मनुष्य शरीरात पाच प्राणरूप अग्नी जागृत असतात. (आपण झोपतो तेव्हा श्वास, उच्छवास, अन्नपचन, मलमूत्रनिर्मिती, रुधीरप्रवाह आदि शारीरिक कार्ये चालूच असतात.) प्राण हेच अग्नीरूप असतात. अपान वायू हा गार्हपत्य अग्नी होय. व्यान हा आहार पचविणारा (दक्षिणाग्नि) अन्वाहार्यपचन नावाचा अग्नी असून गार्हपत्य अग्नीतून घेऊन जो अग्नी यज्ञकुंडापर्यत (प्रणीतापात्राने) नेला जातो तो प्राणवायू आहवनीय अग्नी समजावा. प्र+नयन = नेणे. म्हणून प्राण असे नाव झाले. अन्नरूप आहुती ज्यात दिली जाते तो 'आहवनीय' अग्नी म्हणजेच प्राण समजला जातो. ॥३॥

'''यदुच्छ्वासनिःश्वासावेतावाहुती समं नयतीति स समानः ।'''
'''मनो ह वाव यजमानः । इष्टफलमेवोदानः । स एनं यजमानमहरहर्ब्रह्म गमयति ॥ ४ ॥'''

वर नेला जाणारा श्वास आणि खाली सोडला जाणारा श्वास ह्या आहुती. सर्वत्र समान प्रमाणात नेतो तो समान वायू हाच आहुती घालणारा (होता) असून मन हाच यज्ञकर्ता आहे. या शरीरात निद्रा समयी जो असा यज्ञ चालतो त्याचे फल म्हणजेच उदान वायू होय. तोच मनाला प्रतिदिनी निद्रासमयी ब्रम्हलोकात घेऊन जातो. (इथे ब्रम्हलोक याचा अर्थ ह्दयस्थान असा घ्यावा. ब्रम्हलोकात सृष्टीचा 'संकल्प' उठतो. म्हणून शरीरात ह्दय हा ब्रम्हलोक होय. निद्राकाळी मन कोठे लीन होऊन राहते याचा विचार येथे केला आहे आणि ते कार्य उदानवायू करतो असे म्हटले आहे. एकंदरीत झोपेच्या वेळी सुद्धा पंचप्राणाचे कार्य चालते, शरीरात उष्णता कायम राहते, झीज आणि पोषण होतच असते याचे हे वर्णन आहे.) ॥४॥

'''अत्रैष देवः स्वप्ने महिमानमनुभवति । '''
'''यद्दृष्टं दृष्टमनुपश्यति श्रुतं श्रुतमेवार्थमनुशृणोति देशदिगन्तरैश्च प्रत्यनुभूतं पुनः पुनः प्रत्यनुभवति दृष्टं चादृष्टं च श्रुतं चाश्रुतं चानुभूतं चाननुभूतं च स्च्चासच्च सर्वं पश्यति सर्वः पस्यति ॥ ५ ॥'''

स्वप्नामध्ये हा जीवात्मारूपी देव स्वतःच्याच रूपाचा अनुभव घेतो. जे वारंवार जागृत अवस्थेमध्ये त्याने पाहिलेले असते तेच दृश्य तो अंतरात पाहतो. जे वारंवार ऎकलेले असेल तेच तो वारंवार ऎकतो. ज्या विषयांचा पुन्हा पुन्हा अनुभव घेतलेला असेल त्यांचाच अनुभव वारंवार घेतो. तसेच त्याने पाहिलेली आणि न पाहिलेली दृश्ये तो पाहतो, पूर्वी ऎकलेले आणि न ऎकलेलेही तो ऎकतो. ज्यांचा त्याला अनुभव आलेला असतो ते आणि अनुभव नसतो तेही तो अनुभवतो; तसेच त्याला सत्य गोष्टी दिसतात आणि ज्यांना वास्तविक अस्तित्व नाही त्याही तो पाहतो. तो स्वतःच सर्व वस्तू होतो आणि स्वतःच त्या पाहतोही. ॥५॥

'''स यदा तेजसाऽभिभूतो भवति ।'''
'''अत्रैष देवः स्वप्नान्न पश्यत्यथ यदैतस्मिञ्शरीर एतत्सुखं भवति ॥ ६ ॥'''

जेव्हा त्याच्यावर उदान वायूरूप तेजाचा प्रभाव असतो तेव्हा हा आत्मरूपी देव स्वप्ने पाहत नाही. तेव्हा या शरीरात तो आत्मा सुषुप्तीचे सुख अनुभवतो. (कारण मन उदानवायूने ह्दय स्थानी म्हणजेच ब्रम्हलोकात नेले जाते तेथे ते शान्त असते.) ॥६॥

'''स यथा सोभ्य वयांसि वसोवृक्षं संप्रतिष्ठन्ते ।'''
''' एवं ह वै तत् सर्वं पर आत्मनि संप्रतिष्ठते ॥ ७ ॥'''

हे प्रिय शिष्या, ज्याप्रमाणे पक्षी आपल्या निवासरूप वृक्षावर सायंकाळी येऊन आरामात राहातात, त्याप्रमाणेच पुढे वर्णन केलेली सर्व (पृथ्वीपासून प्राणांपर्यत) तत्त्वे परमात्म्याच्या ठायी आश्रय घेतात. ॥७॥

'''पृथिवी च पृथिवीमात्रा चापश्चापोमात्रा च तेजश्च तेजोमात्रा च वायुश्च वायुमात्रा चाकाशश्चाकाशमात्रा
१}वाणी आणि तिने बोलण्याचा विषय २}हात आणि त्यांनी घ्यावयाची वस्तू ३}लिंग आणि त्यांने घ्यावयाचा आनंद ४}गुद आणि त्याने करण्याचे उत्सर्जन कार्य ५}पाय आणि त्यांचे चालणे.
(ड) नंतर अंतःकरणाचे भाग सांगतात :-
१}मन आणि मनाचे मंतव्य २}बुद्धी आणि बुद्धीने जाणावयाचा विषय ३}अहंकार आणि अहंकाराचा विषय ४}चित्त आणि त्याची चेतना ५}तेज आणि त्याने प्रकाशित करावयाचा पदार्थ ६}प्राण आणि त्याची धारण करण्याची वस्तू. या सर्व गोष्टी परमात्म्यात आश्रय घेतात. ॥८॥

'''एष हि द्रष्ट स्प्रष्टा श्रोता घ्राता रसयिता मन्ता बोद्धा कर्ता विज्ञानात्मा पुरुषः ।'''
'''स परेऽक्षर आत्मनि संप्रतिष्ठते ॥ ९ ॥'''

हा जो पाहणारा, स्पर्श करणारा, ऎकणारा, वास घेणारा, रस चाखणारा, मनन करणारा, समजून घेणारा, कर्म करणारा, विज्ञानस्वरूप जीवात्मा आहे तो अविनाशी परमात्म्या मध्ये प्रतिष्ठित होऊन राहतो. ॥९॥

'''परमेवाक्षरं प्रतिपद्यते स यो ह वै तदच्छायमशरीरम्लोहितं शुभ्रमक्षरं वेदयते यस्तु सोम्य ।'''
'''स सर्वज्ञः सर्वो भवति । तदेष श्लोकः ॥ १० ॥'''

हे प्रिय शिष्या, जो त्या अविनाशी अशा परमात्म्याचे अनुसंधान राखतो आणि छायारहित, शरीररहित, रंगरहित, विशुद्ध अशा क्षर (ऱ्हास) नसलेल्या परमात्म्याला जाणतो तो सर्वज्ञ होय आणि तोच सर्व विश्वरूप जाणिवेछा त्यासंबंधीचा एक श्लोक पुढीलप्रमाणे आहे. ॥१०॥

'''विज्ञानात्मा सह देवैश्च सर्वैः प्राणा भुतानि संप्रतिष्ठन्ति यत्र तदक्षरं वेदयते यस्तु सोम्य स सर्वज्ञः सर्वमेवाविवेशेति ॥ ११ ॥'''

ज्या परमात्म्यात प्राण, पंचमहाभूते, सर्व इंद्रिये आणि अंतकरणसहित विज्ञानस्वरूप जीवात्मा ही सर्व तत्त्वे आश्रय घेतात त्या अक्षर अविनाशी परमात्म्याला जो कोणी जाणतो तो सर्व काही जाणणारा होतो आणि सर्वत्र एकाच वेळी (ईश्वराप्रमाणे) प्रवेश करतो. विश्वव्यापी जाणिवेचा होतो. ॥११॥

इति प्रश्नोपनिषदि चतुर्थः प्रश्नः ॥

==पंचम प्रश्न==
३५१

संपादने