"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९१ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
'''भगवन्कत्येव् देवा: प्रजां विधारयन्ते कतर् एतत्प्रकाशायन्ते क: पुनरेषां वरिष्ठ् इति ॥१॥'''

नंतर भृगुकुलोत्पन्न वैदर्भीने पिप्पलाचार्यांना विचारले, 'आचार्य, कोणते देव प्रजेचे शरीर आहे. (प्रजा धारण करतात.) कोणते देव शरीरात्मक प्रजेला धारण करतात आणि या सर्व देवांमध्ये सर्व वरिष्ठ असा देव कोणता आहे?'

'''तस्मै स होवाच ।'''
'''ते प्रकाश्याभिवदन्ति वयमेतव्दाणमवष्टभ्य् विधारयाम्: ॥२॥'''

भार्गवाला पिप्पलाद म्हणाले, 'आकाश हाच तो देव आहे. त्याचप्रमाणे वायू, अग्नी, आप, पृथ्वी, वाचा, मन, नेत्र, कर्ण हे ही देव आहेत. ते या शरीराला प्रकाशित करतात (कार्यान्वित करतात) आणि अभिमानाने ते सर्व असे म्हणतात की या बाणाला (शरीराला) आम्हीच आश्रय देतो आणि धारण करतो. ॥२॥

'''तान्वरिष्ठ: प्राण उवाच ।'''
'''मा मोहमापद्यथाहमेवैतत्पञ्चधाSSत्मानं प्रविभज्यैतव्दाणमवष्टभ्य विधारयामीतिं तेSश्रद्धधाना बभूवु: ॥३।'''

त्यांना त्याच्यापेक्षा वरिष्ठ असा प्राण म्हणाला, 'असे मूढ होऊ नका. मीच स्वत:ला पाच प्रकारांनी विभक्त करून या शरीराला धारण करतो. पण त्याच्या या बोलण्यावर त्यांची श्रद्धा नव्हती. (ते त्यांना पटले नाही) ॥३॥

'''सोSभिमानादूर्ध्वमुत्क्रामत इव तस्मिन्नुत्क्रामत्यथेतरे सर्व एवोत्क्रामन्ते तस्मिंश्च प्रतिष्ठमाने सर्व एव प्रातिष्ठन्ते ।'''
'''एवम् वाङ्मनश्चक्षु: श्रोत्रं च ते प्रीता: प्राणं स्तुन्वन्ति ॥४॥'''

तो प्राण अभिमानाने शरीरातून निघून वर निघाला तोच त्याच्याबरोबर इतर सर्व इंद्रियदेवता सुद्धा निघाल्या. तो (प्राण) पुन्हा शरीरात स्थिर झाला तेव्हा सर्व जागच्या जागी स्थिर झाले. जसे मधुकररूपी राजा (फुलावरून) उडाला की (मध)माशा पण लगेच उडतात आणि तो फुलावर येऊन बसला की त्याही बसतात तसेच वाचा, मन, नेत्र, कर्ण यांचे देव उठले आणि पुन्हा बसले. तेव्हा प्राणाचे श्रेष्ठत्व लक्षात येऊन ते सर्व देव (इंद्रिये) प्राणाची स्तुती करू लागले. ॥४॥

'''एष पृथिवी रयिर्देव: सदसच्चामृतं च यत् ॥५॥'''

देवांनी प्राणाची स्तुती कशी केली? ते म्हणाले, 'हा प्राणच अग्निरूपाने उष्णता देतो. हाच पाऊस आणि पाऊसाचा देव इंद्र आहे. वायूही हाच आहे. हाच पृथ्वी आहे. हाच रयि आहे. जे काही आहे आणि जे काही नाही आहे ते हाच आहे. अमृतही हाच आहे. (अमृत याचा अर्थ परमात्मा असा येथे समजावा.) ॥५॥

'''अरा इव रथनाभौ प्राणे सर्व प्रतिष्ठितम् ।'''
'''ऋचो यजूँषि सामानि यज्ञ: क्षत्रं ब्रम्ह च ॥६॥'''

रथाच्या चाकाच्या आसामध्ये जसे आरे बसविलेले असतात, त्याप्रमाणे प्राणामध्येच सर्व स्थित असते. ऋग्वेद, सामवेद, यज्ञ, क्षत्रिय आणि ब्राम्हण (जे यज्ञ करणारे आहेत ते) हे सर्व प्राणाच्या आधारेच स्थित आहेत. ॥६॥

'''प्रजापतिश्चरसि गर्भे त्वमेव प्रतिजायसे।'''
'''तुभ्यं प्राण प्रजास्त्विमा बलिं हरन्ति य: प्राणै: प्रतितिष्ठसि ॥७॥'''

हे प्राणा ! तूच प्रजापति आहेस. तूच गर्भात प्रवेश करून माता-पिता यांना अनुरूप असा जन्म घेतोस. तू जो अपानादि पाच प्राणरूपात प्रतिष्ठित आहेस, त्या तुलाच अन्नरूपाने बलि अर्पण करतात. ॥७॥

'''देवानामसि वहितम: पितृणां प्रथमा स्वधा । ऋषीणां चरितं सत्यमथर्वाङ् गिरसामसि ॥८॥'''

हे प्राणा, देवांचे मुख जो अग्नि, त्या अग्नीचे सर्वोत्तम रूप तूच आहेस. अग्नीत आहुती दिल्या की त्या देवांना मिळतात हे खरे, पण प्राणांना जे बलि म्हणून अन्न-पाणी देहामध्ये अर्पण होते ते प्राणपोषण करणारे असते आणि प्राण हाच देवांचा आधार आहे म्हणून 'वन्हितम' अशी त्याची प्रशंसा केली आहे. तू पितरांना अर्पण केली जाणारी (स्वधा) प्रथम आहुती म्हणजेच श्रेष्ठ समर्पण आहेस. अर्थात पितरांनाही प्राणशक्तीनेच पोषण मिळते. अर्थव आणि अंगिरस यासारख्या क्रषींचे सत्य आचरण म्हणजेही तूच आहेस. ॥८॥

'''इन्द्रस्त्वं प्राण तेजसा रुद्रोऽसि परिरक्षिता । त्वमन्तरिक्षे चरसि सूर्यस्त्वं ज्योतिषां पति: ॥९॥'''

हे प्राणा ! तू तेजाने युक्त असा इंद्र आहेस, रूद्र आहेस आणि संपूर्ण रक्षण करणारा आहेस. अंतरिक्षात वाहणारा वायू तूच आहेस आणि सर्व आकाशस्थ तेजस्वी ग्रहांचा मुख्य असा सूर्यही तूच आहेस. ॥९॥

'''यदा त्वमभिवर्षस्यथेमा: प्राणते प्रजा: । आनन्दरूपास्तिष्ठन्ति कामायान्नं भविष्यतीति ॥१०॥'''

हे प्राणा, तू जेव्हा चांगला पाऊस पाडतोस तेव्हा, आता उत्तम असे अन्नधान्य मिळेल या विचाराने सर्व प्रजा (प्राणिमात्र) आनंदित होतात. (अर्थात अग्नीरूप प्राण, इंद्र, रुद्र, सूर्य रूप प्राण, हाच मेघरूपही आहे.) ॥१०॥

'''व्रात्यस्त्वं प्राणैकर्षिरत्ता विश्व्स्य सत्पति: । वयमाद्यस्य दातार: पिता त्वं मातरिश्व न: ॥११॥'''

हे प्राणा, तू असा एकमेव क्रषी आहेस की जो (व्रात्य) संस्कारांनी शुद्ध होण्याची आवश्यकताच नाही. तू स्वाभाविकच शुद्ध आहेस. तू विश्वाचा सत्यार्थाने पालनकर्ता (पति) आहेस. तुझे अदन (आद्य) म्हणजे हविष्यान्न आम्ही तुला अर्पण करतो. (आम्ही जे अन्न भक्षण करतो ते हे प्राणा, तुलाच समर्पण होते.) सर्वत्र संचार करणारा (मातरिश्वा) असा तूच वायुरूपाने आमचा पिता आहेस, कारण आम्ही तुझ्यामुळेच उत्पन्न झालो आहोत. ॥११॥

'''या ते तनूर्वाचि प्रतिष्ठिता या श्रोत्रे या च चक्षुषि ।'''
'''या च मनसि सन्तता शिवां तां कुरू मोत्क्रमी: ॥१२॥'''

हे प्राणा, जे तुझे स्वरूप वाणीमध्ये आहे, जे कर्णामध्ये आहे, जे नेत्रांत आहे, जे मनामध्ये सम्यक रीतीने भरून आहे ते रूप कल्याणप्रद असेच कर; आम्हाला ते आधारभूत आणि पोषकच राहो. तू निघून जाऊ नकोस. ॥१२॥

'''प्राणस्येदं वशे सर्व त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् ।'''
या जगातील सर्व काही प्राणाच्या अधीन आहे आणि स्वर्गातील जे जे काही आहे ते ही प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, माता जसे पुत्रांचे रक्षण करते तसे तू आमचे रक्षण कर आणि राजांचे वैभव आणि ब्राम्हणांची प्रज्ञा आम्हाला दे. (ही स्तुती शरीरातील सर्व इंद्रियदेवता करीत आहेत.) ॥१३॥

इति प्रश्नोपनिषदि व्दितीय: प्रश्न: ॥

==तृतीय प्रश्न==
३५१

संपादने