"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८:
'''वक्ष्यतीति ते ह समित्पाणयो भगवन्तं पिप्पलादमुपसन्नाः ॥१॥'''

[[भारद्वाज|भारद्वाजकुलोत्पन्न]] सुकेशा, शिबिचा पुत्र सत्यकाम, सूर्याचा नातू [[गर्ग]] ऋषींच्या गोत्रात जन्मलेला सौर्यायणी, कोसलदेशनिवासी [[आश्वलायन]], '''विदर्भ'''देशनिवासी [[भार्गव]] आणि [[कात्यायन]] अर्थात्‌ कत्य ऋषींचा नातू कबन्धी, हे सर्व वेदपरायण आणि वेदनिष्ठ [[ब्राह्मण]] होते. स्वत: परब्रह्माचे स्वरूप समजावून घ्यावे अशी इच्छा धरून ते परब्रह्माचा शोध घेत फिरत होते. हातात [[समिधा]] घेतलेले हे सहाहीजण पिप्पलाद नावाच्या सुविख्यात ऋषींकडे आले. कारण [[परब्रह्म|परब्रह्माचे]] स्वरूप समजावून सांगण्यास पिप्पलाद ऋषी समर्थ आणि उत्सुक आहेत असे त्यांना समजले होते. ॥१॥

'''तान्ह स ऋषिरुवाच भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सरं संवत्स्यथ यथाकामं प्रश्नान्पृच्छत

ओळ २७:
'''अथ कबन्धी कात्यायन उपेत्य प्रपच्छ।
भगवन्‌ कुतो ह वा इमाः प्रजाः प्रजायन्त इति ॥३॥'''

मग सर्वप्रथम कात्यायन कबन्धीने पिप्पलादांपाशी जाऊन प्रश्न विचारला "भगवन्‌, ही सर्व प्रजा - जीवजंतू, मनुष्यादि प्राणी - कोठून निर्माण झाली?" ॥३॥

'''तस्मै स होवाच प्रजाकामो वै प्रजापतिः स तपोऽतप्यत स तपस्तप्त्वा स मिथुनमुत्पादयते।

'''रयिं च प्राणं चेत्येतौ मे बहुधा प्रजाः करिष्यत इति ॥४॥'''

यावर पिप्पलाद उत्तरले "प्रजापती परमात्म्याला प्रजा उत्पन करण्याची इच्छा झाल्यावर त्याने तप करून प्रथम ''''रयि'''' आणि ''''प्राण'''' असे [[मिथुन]] ('''जोडपे''') निर्माण केले. रयि आणि प्राण यांनी मिळून सारी सृष्टी निर्माण करावी या हेतूने प्रजापती परमात्म्याने या दोघांची निर्मिती केली."
(जीवसृष्टीतील चैतन्य म्हणजे 'प्राण' (energy) आणि सर्व जड सृष्टी म्हणजे 'रयि' (matter) अशी संकल्पना आहे.)

'''आदित्यो ह वै प्राणो रयिरेव चन्द्रमा रयिर्वा एतत्‌ सर्वं यन्मूर्तं चामूर्तं च तस्मान्मूर्तिरेव रयिः ॥५॥'''

उदाहरणादाखल पिप्पलाद महर्षी सांगतात "[[सूर्य]] व [[चंद्र]] हे अनुक्रमे प्राण आणि रयि आहेत. सूर्यामुळेच सर्व जड तत्वांमध्ये [[ऊर्जा]], चैतन्य असते; तर चंद्रामध्ये सर्व जड तत्वांचे पोषण करण्याची शक्ती असते." ॥५॥

'''अथादित्य उदयन्यत्प्राचीं दिशं प्रविशति तेन प्राच्यान्‌ प्राणान्‌ रश्मिषु संनिधत्ते।

'''यद्दक्षिणां यत्प्रतीचीं यदुदीचीं यदधो यदूर्ध्वं यदन्तरा दिशो यत्सर्वं प्रकाशयति तेन सर्वान्‌ प्राणान्‌ रश्मिषु संनिधत्ते ॥६॥'''

जसा सूर्य रात्रीनंतर उगवून पूर्वेस प्रवेशतो, तसा तो पूर्वेकडिल प्राणांना आपल्या किरणांत धारण करतो. त्याप्रमाणे दक्षिण दिशेस, पश्चिमेस, उत्तरेस, ऊर्ध्व दिशेस, अंतराळात तो जे जे प्रकाशित करतो ते ते तो आपल्या किरणांनी सचेतन करत असतो. म्हणजे '''सर्व दिशांना सर्वांना सूर्यच प्राणशक्ती देत असतो.''' ॥६॥

'''स एष वैश्वानरो विश्वरूपः प्राणोऽग्निरुदयते। तदेतदृचाभ्यामभ्युक्तम्‌ ॥७॥'''

तोच विश्वरूप सूर्य वैश्वानर नावाने सर्व प्राण्यांच्या शरीरात जठराग्नि होतो. हेच तथ्य ऋचांमध्ये स्पष्ट केले आहे. ॥७॥

'''विश्वरूपं हरिणं जातवेदसं। परायणं ज्योतिरेकं तपन्तम्‌।

'''सहस्ररश्मिः शतधा वर्तमानः। प्राणः प्रजानामुदयत्येष सूर्यः ॥८॥'''

विश्वरूप, हरि म्हणजे किरणांनी युक्त असणारा, जन्माला आलेल्या सर्वांबद्दल ज्ञान असलेला, सर्वांचा आधार, तेजरूप आणि अतिशय उष्ण असलेला, हजारो किरणांनी युक्त आणि शेकडो रुपांत वर्तमान राहणारा, उत्पन्न झालेल्या सर्व जीवांचा प्राण असणारा हा सूर्य उदय पावतो व सर्व कार्ये करतो. ॥८॥

'''संवत्सरो वै प्रजापतिस्तस्यायने दक्षिणं चोत्तरं च ।

ओळ ५७:
'''एष ह वै रयिर्य: पितृयाण: ॥९॥'''

संवत्सर - वर्ष हा प्रजापती होय. या संवत्सराचे [[उत्तरायण]] आणि [[दक्षिणायन]] असे दोन भाग आहेत. अनित्य हेच नित्य आहे असे मानून जे उपासक त्याप्रमाणे आचार करतात, लोकोपयोगी कामे(सार्वजनिक सुखसोयी, यज्ञादी कर्मे) करतात, ते लोक चंद्रलोकापर्यंत जाऊन तेथे जय पावतात आणि तेच पुन्हा फिरून या जगात जन्माला येतात. मानव आणि इतर प्राणिवर्गादी प्रजांचे हित इच्छिणारे ऋषी म्हणून मान्यता पावलेले हे लोक स्वर्ग अस्तित्वात असून तो यज्ञयागाने, लोकोपयोगी कर्माने मिळतो अश्या श्रद्धेने कर्म करून दक्षिणायनाचा आश्रय घेतात. गमनागमनाच्या या मार्गाला पितृयाण असे म्हणतात. जड सृष्टीच्या परिपोष करण्याचा हा मार्गच रयि होय. ॥९॥

'''अथोत्तरेण तपसा ब्रम्हचर्येण श्रद्धया विद्ययाऽऽत्मानमन्विष्यादित्यमभिजयन्ते ।

'''एतद्वै प्राणानामायतनमेतदमृतमभयमेतत्परायणमेतस्मान्न पुनरावर्तन्त इत्यैषः निरोध: तदेषः श्लोक: ॥१०॥'''

तप, ब्रम्ह्चर्य,श्रद्धा आणि विद्या यांच्या साहाय्याने आत्मरूपाची ओळख करून घेणारे आदित्य लोकाची प्राप्ती करून घेतात. ह्याला उत्तरायण असे म्हणतात. आदित्य हा प्राणिमात्रांचे वसतिस्थान आहे. हा आदित्य अमृत प्रदान करणारा आणि सर्वाना आश्रयभूत असणारा आहे. या आदित्य लोकाची प्राप्ती झाली असता पुन्हा जन्म येत नाही असा अबाधित नियम आहे. ॥१०॥

'''पञ्चपादं पितरं द्वादशाकृतिं दिव आहु: परे अर्थे पुरीषिणम् ।

'''अथेमे अन्य उ परे विचक्षणं सप्तचक्रे षडर आहुरर्पितमिति ॥११॥'''

अंतरिक्षाच्या पलीकडे संवत्सर आहे. तो उदकपूर्ण असून त्याला पाच पाय आणि बारा अवयव आहेत. तो जगाचा निर्माता आहे असे ज्ञानवान लोक म्हणतात. अन्य काही काळ्वेत्ते पंडित म्हणतात की संवत्सर काल हा सर्वज्ञ असून तो सात चक्रांच्या आणि सहा अरांच्या रथामध्ये बसलेला आहे. ॥११॥

'''मासो वै प्रजापतिस्तस्य कृष्णपक्ष एव रयि: शुक्ल: प्राणस्तस्मादेत ऋषय: शुक्ल इष्टं कुर्वन्तीतर इतरस्मिन्‌ ॥१२॥'''

मास (महिना) हा प्रजापती आहे. या मासाचा कृष्णपक्ष हा रयि आणि शुक्लपक्ष हा प्राण आहे. ऋषी शुक्लपक्षामध्ये आणि इतर लोक कृष्णपक्षामध्ये आपली इष्ट कर्तव्यें करतात. ॥१२॥

'''अहोरात्रौ वै प्रजापतिस्तस्याहरेव प्राणो रात्रिरेव रयि: प्राणं वा एते प्रस्कन्दन्ति

'''ये दिवा रत्या संयुज्यन्ते ब्रम्हचर्यमेव तद्यद्रात्रौ रत्या संयुज्यन्ते ॥१३॥'''

दिवस आणि रात्र मिळून होणारा दिवस हा प्रजापती आहे. त्यातील दिवस हा प्राण असून रात्र ही रयि किंवा अन्न आहे. म्हणून दिवसा जे लोक रतिसुख घेतात ते प्राणाला बाहेर टाकतात. परंतु जे कोणी रात्री उपभोग घेतात ते ब्रम्हचर्याचे पालन करतात. ॥१३॥

'''अन्नं वै प्रजापतिस्ततो ह वै तद्रेतस्तस्मादिमा: प्रजायन्त इति ॥१४॥'''

अन्न हाच प्रजापती आहे. अन्नापासून रेताची उत्पत्ती होते आणि या रेतापासून सर्व प्रकारची प्रजा निर्माण होते. ॥१४॥

'''तद्येह् वै तत्प्रजापतिव्रत् चरन्ति ते मिथुनमुत्पादयन्ते ।

'''तेषामवैष ब्रम्हलोको येषां तपो ब्रम्हचर्य येषु सत्यं प्रतिष्ठितम् ॥१५॥'''

प्रजापतिव्रताचे जे लोक आचरण करतात ते मिथुनाची उत्पत्ती करतात. जे लोक तप आणि ब्रम्हचर्य यांचे पालन करतात त्यांच्या ठिकाणी सत्यता आणि एकनिष्ठपणा या गुणांची प्रतिष्ठापना होते. असे लोक ब्रम्हलोकाची प्राप्ती करून घेतात. ॥१५॥

'''तेषामसौ विरजो ब्रम्हलोको न येषु जिह्ममनृंत माया चेति ॥१६॥'''