"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २४९:
 
पाच नंबरचा मुद्दा आपल्याला नीट कळेल असा लिहीतो
५) ज्या पद्धतीची भाषा आपण वापरली, जशी उत्तरे दिली ते एखाद्या नवख्या सदस्यासोबत घडले तर तो विकीपीडियावर राहील का? माझे सोडा, मी तुमच्या किंवा कोणाच्याच असल्या बुलिइंगला, वर्चस्व अबाधित राखण्यासाठी एकेरी पर्यंत घसरण्याच्या प्रयत्नांना जुमानात नाही.

स्पष्ट बोलतो माफ करा, पण माझ्याहातून काहीतरी वेडवाकडे लिहीले जावे आणि कारवाईला पुरावा मिळावा यासाठीच तर हे सुरु आहे, अशी मला दाट शंका आहे. काय होईल, फारतर या ना त्या निमित्ताने कुणीतरी बंदी घालेल. त्यात नुकसान कुणाचे आहे? माझ्यासारख्याचे नाही, इथल्या अधिकारीवर्गाचेही नाही. झालेच तर विकिपीडिया सुरु करण्यामागच्या उदात्त हेतूचे आहे. होऊ देत. पण नवख्यांना पळवून लावणेच इथे अपेक्षित आहे का?
 
तुम्ही केलेल्या पानात एक त्रुटी काय दाखवली, केवढा भडका. मी मांडला तो मुद्दा ज्ञानाशी संबंधित, विश्वकोषाला साजेलसे पाने तयार व्हावीत यासाठीचा आहे. माझा हठाग्रह शेवटच्या शब्दाविषयी नाही तर विकीपिडीयातले वेरूळ अजिंठा लेणी हे एकत्र पान मला वाटते दुरुस्त करण्याची गरज आहे त्याविषयी आहे. त्याविषयी, मीच अन्य विकीकराला पु्न्हा विचारेपर्यंत एक चकार शब्द तरी लीहीताय का? सुरवातीला एकदा विचारलत आपण हा लेख नीट वाचलात का? असा काय कहर वाटला? यातला पहिला प्रश्न लेख न वाचताच मी लिहीतोय अशी शंका घेणारा आणि दुसरा एका शब्दाला चिकटून राहिलेला प्रतिप्रश्न होता. पण मुळात असं एकत्र पान योग्य नाही हे मी का म्हणतोय याविषयी या लांबचलांब चर्चेत कधी उत्सुकता दाखवलीत? आपण करतो त्या कामावर कुणीच शंका घेऊ नये यासाठी ही सगळी व्यूहरचना आहे का? आणि वर अधिकारीपदाचा, अनुभवाचा दबाव. व्वा ! - [[सदस्य:मनोज|मनोज]] ०९:५२, १३ मार्च २०१० (UTC)
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.