"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७९:
:क.लो.अ.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १६:०८, ११ मार्च २०१० (UTC)
 
===वाद आणि टाळी दोन्ही बाजूंनी वाजते===
अभय नातू हे नाव येथे धारण करणारे महोदय,
 
माझ्या या पानावरच्या पहिल्या सूचनेत एखादे वाक्य, महोदय, आपण म्हणता तसे आढ्य वाटल्यास, तसे वाटण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, तसेच ते येथे थेटपणे व्यक्त करण्याचा आपला अधिकारही मी नाकारत नाही. पण मला माझ्या त्या विधानात आढ्यता वाटत नाही. भाषेच्या छटा काही मैलागणिक बदलतात हे सार्वकालिक सत्य माझ्या विधानांना आढ्य म्हणताना आपण लक्षात घेतलेले दिसत नाही असे माझे मत झाले आहे. मी या चर्चा पानांवर लिहीलेल्या सर्व शब्दांच्या (उपजला, कहर, आगाऊ इ.) आणि शब्दसमुहांच्या सर्व अर्थच्छटा आणि उपयोग नीट समजून घेतले तर, माझ्या लिखाणात आढ्यता काहीच नाही.
 
मात्र महोदय, आपण काय केलेत?
 
लेख नीट वाचलात का? असा प्रश्न विचारून मी लेख न वाचताच मत मांडत असल्याची अप्रत्यक्ष टिका केलीत. त्यानंतर, माझ्या चर्चा पानावरचे वाक्य इथे तिरके करून संदर्भाशिवायच जोडलेत. त्याची गरज नव्हतीच, शिवाय हे करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही मलाच ठणकावलेत. तोंडे वेडीवाकडी करत हसण्याची चिह्ने जोडून हसत असल्याचे दर्शवित आपण माझ्या सूचनेचा उपहास केलात. हे सारे करताना आपल्याला काय म्हणायचे आहे ते थेट आणि संयत शब्दात आपण सांगितले नाहीतच. उलट प्रश्न करून मलाच जाब विचारल्याचा आभास निर्माण केलात. माझ्या भाषेविषयी लिहीताना आढ्य, उद्धट, खोचक अशी अत्यंत बोचणारी विशेषणे आपण वापरता आहात, माझ्या विधानांची तुम्हाला मजा वाटते, हसू येते असे तर आपण लिहून आणि चिन्हीत करूनही दाखवता आहात. आढ्यता दाखवलीत तर.. असे म्हणणारा वाक्यांश तर जणूकाही दम भरणाराच आहे. आणि हे सगळे स्वतःच सुरु करून, स्वतःचे मनोरंजन पूर्ण झाल्यानंतर क्षमा शब्द उच्चारून मिटवण्याची भाषाही करता आहात.
 
शाळा कॉलेजात रिकाम्या तासाला वेळ जात नसला की धष्टपुष्ट मुले एखाद्या नव्या मुलाशी अशीच वागतात. त्याला खेळवतात. मग मन भरले की काहीतरी सांत्वनाचे बोलून सोडून देतात. (म्हणजे मग ते भित्रंही खुष होतं. मास्तरांकडे तक्रार करत नाही.) त्याला इंग्रजीत बुलिईंग म्हणतात. आपण इथले, मराठी विकीपिडीयाचे सध्या अधिकारी आहात असे काही पानांवर आपल्या नावापुढे दिसले.
 
आपणही मराठी विकिपिडीयावर प्राप्त अधिकाराचा वापर करीत तसेच बुलिईंग करीत आहात की काय?
 
विकीपिडीयावर मोबदला मिळत नाही, हे ध्वनित करतानाही मराठी बोलीतली विनामोबदला कामाविषयी तुच्छता व्यक्त करणारी एक जुनी म्हण आपण वापरलीत. असे करून, येथे ज्ञानार्जन आणि ज्ञानसंपादनाच्या नोबल कॉज मध्ये गुंतलेल्या जगभरच्या विकिपिडीया कार्यकर्त्यांचा आपण उपाहास करीत आहात. आपण हेतुतः हे केले, असे माझ्यासारख्या सामान्य विकिपिडीया प्रेमीने का मानू नये?
 
चुकलो तर कोणीतरी सुधारून द्या, पण विकीपिडीया हा अनेक अडचणींना तोंड देत, हल्ले पचवत, शांतपणे, गंभीरपणे ज्ञान अर्जन आणि ज्ञान संपादन करण्यात गुंतलेल्या जगभरातल्या निःस्वार्थ सदस्य- कार्यकर्त्यांचा महासागर आहे असे मी मानतो. ही केवळ उपहास करण्याची, शेलकी विशेषणे वापरत मजा घेण्याची जागा नव्हे - अधिकारी विनामोबदला काम करीत असले तरीही. भारतीय सिव्हिलायझेशनमध्ये प्राचीन काळी वर्णित ऋषिसमुहासमान मला बहुसंख्य विकी-कार्यकर्त्यांची मनःस्थिती भासते. साहजिकच इथले अधिकारी इथल्या सामान्य कार्यकर्त्यापेक्षाही अधिक पक्व, अधिक समंजस, जबाबदार, न्याय्य असायला हवेत. त्यांना विश्वकोषाची, त्याच्या स्वरूपाची, त्यातल्या लेखविषयाच्या स्वरूपाची माहिती हवी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानाविषयी, त्याबाबतच्या चर्चेविषयी किमान गांभीर्य असलेले असावेत ही माझीतरी अपेक्षा आहे.
 
आपली विधाने त्याउलट सामान्य सदस्य-कार्यकर्त्याचा उपहास करणारी, उलट जाब विचारणारी, बोचरी विशेषणे वापरणारी, अप्रत्यक्ष का होईना दम भरणारी, मजा घेणारी आणि सर्वात महत्वाचे, इथल्या कार्याविषयीच अप्रत्यक्षपणे तुच्छता व्यक्त करणारी आहेत, असा माझा अनुभव आहे.
 
इथली सारी चर्चा, माझ्या या उत्तरासकट मी इंग्रजीत भाषांतर करून उपलब्ध करून देण्याच्या विचारातच नाही, त्यावर कामही सुरु आहे. सुदैवाने मला मराठी ते इंग्रजी भाषांतरही उत्तम येते. ते इंग्रजी विकीपिडीयातील धुरीणांना गरज भासल्यास उपयोगी पडू शकेल. अत्यंत अल्पावधीतच आपल्याकडून मला हा विषण्ण करणारा अनुभव आला आहे. त्यामुळे आपल्याविषयी, एका ठराविक गटापलिकडे, इतर सदस्यांचा अनुभव कसा आहे हेही मी तपासत राहणार आहे. मराठी विकीपिडीयावर काही विशीष्टांचे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे का, याकडे तर माझे बारीक लक्ष असेल. ते अंतिमतः मराठी विकिपिडियाच्या हिताचेच असेल. धन्यवाद.
- [[सदस्य:मनोज|मनोज]] २३:४९, ११ मार्च २०१० (UTC)
ता. क. यातला मजकूर तुमच्या सवयीला अंमळ कठोर वाटेल पण तुमच्या गोग्गोड पलिकडे अशीही मराठी असते बरं, अगदी प्रमाण मराठी.
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.