"पी.जी. वुडहाउस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६०:
 
==== [[गॅलॅहड (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|गॅलॅहड]] उर्फ गॅली ====
लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे धाकटे बंधू. लौकिकदृष्ट्या वयस्कर (कथानकांमधील वय सुमारे ५० ते ६० दरम्यान), परंतु मनाने चिरतरुण. यांच्या चिरतारुण्याचे रहस्य (१) व्हिस्कीपान आणि (२) कधीही पाणी न पिणे हे आहे असे यांचे स्वतःचे म्हणणे आहे. वैवाहिक स्थिती: अविवाहित. (तारुण्यात [[डॉली हेंडरसन (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|डॉली हेंडरसन]] नामक एका (गुलाबी रंगाच्या तंग विजारी परिधान करणाऱ्या) रंगमंचावरील गायिकेवर यांचे प्रेम होते. गॅलॅहड यांचे आयुष्यातील हे पहिले आणि अखेरचे प्रेम. सामाजिक स्तरातील फरकांमुळे गॅलॅहड यांच्या वडिलांचा या विवाहास अर्थातच विरोध होता, आणि त्यामुळे हा विवाह होऊ नये म्हणून त्यांनी त्वरित गॅलॅहड यांची रवानगी [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेस]] केली. पुढे डॉली हेंडरसनचा विवाह लष्करी पायदळातील एका जवानाबरोबर झाला, आणि गॅलॅहड आजन्म ब्रह्मचारी राहिले. त्यानंतर त्यांनी आपली बरीचशी कारकीर्द मद्यपानात आणि व्रात्यपणात घालवली.) [[पेलिकन क्लब (पी. जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील स्थळ)|पेलिकन क्लब]]चे सदस्य म्हणून त्यांनी भरपूर प्रवासही केलाकेलेला आहे. पालकांच्या विरोधामुळे अडलेल्या प्रेमी युगुलांना मदत करून येनकेनप्रकारेण त्यांचे विवाह यशस्वीरीत्या (पालकांच्या विरोधाच्या नाकावर टिच्चून) जमवून देणे हे आवडते कार्य. या कार्याचा लाभ त्यांच्या अनेक भाचे-भाच्यांनी, मित्रांच्या मुलांनी व खुद्द डॉली हेंडरसनची कन्या [[स्यू ब्राउन (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|स्यू ब्राउन]] हिनेसुद्धा घेतला आहे.
 
==== [[लेडी कॉन्स्टन्स (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|लेडी कॉन्स्टन्स]] ====