"श्टुटगार्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hi:श्टुटगार्ट
छो सांगकाम्याने वाढविले: os:Штутгарт; cosmetic changes
ओळ ३३:
 
== भौगोलिक ==
स्टुटगार्ट शहर हे नेकार नदिच्या किनारी वसलेले असुन [[ब्लॅक फॉरेस्ट]] व स्वेबियन आल्प्स या डोंगर रांगाच्या मधोमध वसले आहे. दोन प्रमुख डोंगर रांगाच्या मध्ये वसले असल्याने शहराचा बहुतेक भाग ऊंचसखल आहे, शहराची समुद्रसपाटीपासूनची कमीत कमी उंची व जास्ति जास्त मी आहे. मुख्य शहर डोंगर पायथ्याशी आहे शहराचे बहुतेक उपभाग डोंगरमाथ्यावर आहेत. डोंगरभागातिल घनदाट वृक्षराजी व उतारावरचे द्राक्षाचे मळे हे येथिल व्यशिठ्य आहे.
 
== हवामान ==
स्टुटगार्टचे हवामान हे सर्वसाधारणपणे पश्चिम युरोपीय हवामान प्रकारात मोडते. एका वर्षात साधारण पणे ४ ऋतु अनुभवायला मिळतात. मार्च ते साधारण पणे मे मध्यापर्यंत वसंत (frühling) बहारात असतो. वर्षातील सर्वोतम हवामान या दिवसात अनुभवायला मिळते. अचानक बदलणारे निर्सगाचे रुप हे व्यैशिठ्य. सर्वत्र झाडावर फुलणारी पालवी व जमीनीवर आच्छादलेले फुलांचे गालिचे मन मोहुन घेते.
 
मे मध्यापासून साधारणपणे आगस्ट पर्यंत येथिल मानाप्रमाणे सौम्य उन्हाळा असतो. तापमान जास्ति जास्त ३२ ते ३३ अंश से पर्यंत चढते. या दिवस अतीशय मोठा म्हणजे साधारण पणे १६ ते १८ तासा पर्यंत असतो.
 
सप्टेबर ते साधारणपणे नोव्हेंबर हा पानगळिचा (herbst) ऋतु असतो. सुरवातिला झाडांच्या पानांचा रंग बदलतो. व कालांतराने पाने पुर्णपणे पिकून गळून पडतात. प्रत्येक झाडावरील पानांची छटा वेगवेगळि असते त्यामुळे झाडावरील असंख्य रंग मन अतीशय मोहुन घेतात. सरासरी तापमान या दिवसात कमी व्हायला चालु होते व कडक थंडिची चाहुल लागते.
 
डिंसेबर ते फेब्रुवारी मध्ये कडक हिवाळा असतो. किमान तापमान साधारणपणे -५ ते -७ पर्यंत पण कमी जाउ शकते व कमाल तापमान पण या दिवसात ३ ते ४ अंश से असते त्यामुळे दिवसा देखिल अंत्यंत कडक थंडिचा अनुभव घेता येतो. तापमान अतीशय कमी असल्यास येथिल तळि गोठतात. या दिवसात नियमीतपणे बर्फवृष्टि होत रहाते. मागील हिवाळ्यात म्हणजे २००६-२००७ मध्ये केवळ दोनदा बर्फवृष्टि झाल्याने येथिल लोक नारज झाले होते.
 
== सार्वजनीक वाह्तुक ==
 
[[चित्र:Stadtbahn Stuttgart - Hst Rathaus.jpg|thumb|300 px|स्टुटगार्ट ऊ बान]]
ओळ ६४:
[[जर्मनी|जर्मनीच्या]] राष्ट्रीय रेल्वेसेवेप्रमाणेच [[फ्रांस|फ्रांसच्या]] टी.जी,व्ही. सारख्या रेल्वेसेवाही उपलब्ध आहेत. [[पॅरिस]] व स्ट्रासबुर्ग (फ्रांस), बासेल (स्विट्झर्लंड), व्हीएन्ना (ऑस्ट्रीया), यांसारख्या युरोपातिल इतर मोठ्या शहरांशी स्टुटगार्ट थेट जोडलेले आहे.
 
== अर्थव्यवस्था ==
 
स्टुटगार्ट हे दक्षिण [[जर्मनी| जर्मनीमधील]] एक प्रमुख औद्योगिक केंद्र समजले जाते. जवळपास १,५०,००० लहान-मोठे कारखाने या शहरात अथवा या शहराच्या आसपासच्या हद्दीत आहेत. विविध जगप्रसिद्ध कंपन्यांची प्रमुख कार्यालये या शहरात आहेत. [[डायमलर]], बॉस्च, पोर्शे यांची तर ही जन्मभूमीच आहे. त्याचप्रमाणे आय.बी.एम., हेल्वेट अँड पिकार्ड यांसारख्या संगणक क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांची कार्यालयेही याच शहरात आहेत.
 
वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की पोर्शे या अतीजलद चारचाकी गाड्यांवर असणारे बोधचिन्ह याच शहराच्या बोधचिन्हावरून घेतले आहे. जागतिक वाहनऊद्योगात ही एक अतीशय विषेश गोष्ट आहे.
ओळ ७६:
</gallery>
 
== शैक्षणिक ==
 
[[बाडेन व्युर्टेनबर्ग]] राज्य हे क्षैक्षणिकदृष्टया अतीशय पुढारलेले राज्य आहे. जर्मनीतिल ९ मुख्य विद्यापीठातिल ३ प्रमुख विद्यापीठे या एकट्या राज्यात आहेत. ९ पैकि १ मुख्य विद्यापीठ असलेले [[स्टुट्गार्ट विद्यापीठ]] या शहरात आहे. हयोहेनहाईम विद्यापीठ व एसलिंगेन विद्यापीठ सारखी दर्जेदार शिक्षणसंस्था येथे आहेत.
 
== क्रीडा ==
 
जर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच [[फुटबॉल]] हा येथील सर्वात लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. [[वी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट|फाउ.एफ.बे स्टुटगार्ट]] (VFB Stuttgart) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील अव्वल साखळी स्पर्धेमधे भाग घेतो. ५ वेळा राष्ट्रीय विजेत्या ठरलेल्या या संघाचे प्रमुख कार्यालय बाड-कान्स्टाट या उपनगरामधल्या गोटलिब डायमलर स्टेडियममध्ये आहे.२००७ बुन्डेसलीगा चे विजेतेपद या संघाने पटकावले होते
 
फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९९३ साली जगतिक मैदानी स्पर्धा या शहरात झाल्या होत्या. २००६ मध्ये जर्मनीमधे झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमधले ६ सामने या शहरात झाले होते. २००७ मधे या शहराने युरोपच्या क्रीडा राजधानीचा मान मिळवला होता.
ओळ ८८:
वायसेनहोफ येथे 'मर्सेडीस कप टेनीस स्पर्धा' भरवली जाते. त्याचप्रमाणे 'पोर्श अरेना' या क्रीडासंकुलात [[टेनिस]], [[बास्केटबॉल]] आणि [[हँडबॉल]] हे क्रीडाप्रकार खेळले जातात.
 
== प्रेक्षणीय स्थळे ==
[[चित्र:मर्सेडिज बेंझ संग्रहालय.jpg|thumb|300 px|मर्सेडिज बेंझ संग्रहालय]]
'''संग्रहालये'''
 
* विल्हेमा- प्राणी संग्रहालय
 
* मर्सेडिज बेंझ संग्रहालय
 
* पोर्शे संग्रहालय
 
* स्टाट्स गॅलेरी
 
'''टि.व्हि मनोरा'''- स्टुटगार्ट शहरातल्या कोणत्याहि भागातुन दृष्टिस पडतो. या मनोर्‍यावरुन स्टुटगार्ट व परिसराचे विहंगम दृष्य दिसते.
ओळ १०४:
'''राजवाडे'''
 
* लुडविग्सबर्ग- स्टुटगार्ट पासून २० किमी अंतरावर लुडविग्सबर्ग या गावात हा पाहाण्याजोगा राजवाडा आहे.
 
* सॉलिट्युड- स्टुटगार्टजवळिल डोंगरावर घनदाट झांडिंमध्ये हा राजवाडा आहे.
 
== प्रसिद्ध व्यक्ति ==
 
* [[गोटलिब डाइमलर]]- [[मर्सेडिज बेंझ]]बनवणार्‍या कंपनीचा ( डायमलर आ. गे. ) आद्य संस्थापक, पहिल्या मोटरकारची निर्मीति.
 
* विल्हेल्म मायबाख- पहिल्या मोटरकारचा निर्मितिकार, गोटलिब डायमलर यांचा बरोबरीने काम
* रोबर्ट बॉश- बॉश कंपनीचे आद्य संस्थापक
* फर्डिनांड पोर्षे- पोर्षे कंपनीचे आद्य संस्थापक
* [[ज्युर्गन किल्न्समन]]- जर्मनीचा राष्ट्रिय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार व प्रशिक्षक
* थिओडोर हयुस- दुसर्‍या महायुद्धानंतरचे जर्मनीचे पहिले राष्ट्र्प्र्मुख
 
 
ओळ १८४:
[[no:Stuttgart]]
[[oc:Stuttgart]]
[[os:Штутгарт]]
[[pam:Stuttgart]]
[[pdc:Stuttgart]]