"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा)यांची आवृत्ती 401936 परतवली.
No edit summary
ओळ ५२:
 
मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडूण राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यांत पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.
{{पेशवे}}
 
या वेळी मराठ्यांनी दुसरेहि एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स्. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाजीउद्दीन याने वजिराचे पद् बळकावून दुसरा अलमगीर यास तत्त्कावर बसविले. त्या वेळी अलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाअलम या नावाने प्रसिध्द होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करुन अलाहाबादेस ठाणे दिले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तक्तावर बसविले.