"नक्षलवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

राज्य आणि माओवादी यांच्यात भारतात सशस्त्र संघर्ष
Content deleted Content added
नवीन पान: {{काम चालू}} {{विस्तार}} '''नक्षलवाद''' ही भारतातील कडव्या [[साम्यवाद|साम...
(काही फरक नाही)

२३:०८, २७ जानेवारी २०१० ची आवृत्ती

नक्षलवाद ही भारतातील कडव्या साम्यवादी तत्त्वांनी चालविलेली सशस्त्र चळवळ आहे.


उगम

पश्चिम बंगाल राज्यातील नक्षलबाडी गावात 'सोनम वांगडी' या पोलीस निरीक्षकाचा एका आदिवासी तरुणाच्या तीर कामठ्याने मृत्यू झाला होता, ज्याचे पर्यवसान आसाम फ्रंटियर रॅफल्स कडून जमावा वर गोळीबार करण्यात झाले. २५ मे, १९६७ रोजी घडलेल्या या घटनेत ७ महिला व ४ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट संघटनेने स्थानिक आदिवासींच्या मदतीने पश्चिम बंगाल सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव केला. [१] मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे झालेले विभाजन व माओवादी तसेच लेनिनवादी गट बाहेर पडल्यानंतर उद्भवलेल्या संघर्षात देखिल नक्षलवादाचे मूळ आहे असे मानले जाते.[२] चारू मुजुमदार आणि कनू सन्याल यांनी त्या उठावाचे नेतृत्व केले होते. मुजुमदारांनी १९६९ साली चळवळीची राजकीय आघाडी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनीस्ट)ची स्थापना केली.

प्रसार

आजच्या घडीला (जानेवारी २०१०) नक्षलवादी गट व समविचारी संघटना (उदा. आंध्रप्रदेशातील 'पिपल्स वॉर ग्रूप्') भारताच्या वीस राज्यांतील २२० जिल्ह्यात कार्यरत असून[३] त्यांच्या कारवाया भारताच्या आदिवासीबहूल 'लाल पट्ट्यात' केंद्रित झाल्या आहेत. [४]

 
नक्षलवादी कारवायांचे केंद्र असलेला भारतातील 'लाल पट्टा'

भारतीय गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार देशात वीस हजार सशस्त्र नक्षलवादी व पन्नास हजार सक्रीय कार्यकर्ते असून त्यांचे लक्षावधी समर्थक आहेत.[५]


संदर्भ

बाह्य दुवे