"सज्जनगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २३:
[[प्रतापगड]], [[रायगड]], दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस [[सातारा]] शहर ,अजिंक्यतारा आहे.
==इतिहास==
प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला ''''आश्वलायनगड'''' म्हणू लागले.या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली.२ एप्रिल इ.स.१६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात सज्जनगङ आले. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.

पुढे ३-११-१६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण ३-१२-१६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी १६८२ रोजी श्री राममूर्तींचे गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थांचे निधन झाले. या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ''''नौरससातारा'''' म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

==गडावरील ठिकाणे==

महादरवाजातून आत आल्यावर उजवीकडे एक शिलालेख आहे. थोडे पुढे गेल्यावर लोकमान्य स्मृती नावाची कमान आहे. इथुन डाव्या बाजुला आंग्लाईचे मंदीर आहे. मंदीराकडे जाताना पडक्या मशिदीचे अवशेष दिसतात.

मंदीराचे पाठीमागे घोडाळे तळे आहे. गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदीर. समर्थनिर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरुन भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदीर उभारले.
मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवर्‍या, अक्काबाइचे वृंदावन, आणि समर्थांचा मठ या वास्तु आहेत. जीर्णोध्दार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामधे पितळी खुरांचा पलंग, तंजावर
मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ति आहे. गुप्तीचे वैशिष्ट्य़ म्हणजे त्यात एक लांबच लांब धारदार तलवार आहे.

मारुतीची मूर्ति आहे. गुप्तीचे वैशिष्ट्य़ म्हणजे त्यात एक लांबच लांब धारदार तलवार आहे.

राममंदीर व मठाच्या मधील दरवाज्याने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रम्हपिसा म्हणतात.

गडाच्या पश्चिमे टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्य़ाचा मारुती असे म्हणतात.

गडाच्या उत्तरेस बाटेवरच गायमारुती व कल्याण मंदिर आहे. गायमारुती देवळाजवळून कड्याच्या कडेकडेने एक पायवाट जाते, साधारणत: १०० मी. अंतरावर एक गुहा आहे. त्याला रामघळ म्हणतात.

सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरुपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे.

कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ आहे

ओळ ४६:
सातारा ते परळी अंतर १० की.मी.चे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण १८० पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो .
*'''गजवाडी पासून'''

सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ की.मी.वर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे १०० पायऱ्यांनंतर दरवाजा लागतो.रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात.

एस.टी. महामंडळाच्या बसने सातार्‍याहून जाता येते.
==राहण्याची सोय==
गडावर राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालय तर्फे खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्जनगड ( सेवा मंडळाच्या ) खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.

==छायाचित्रे==
"https://mr.wikipedia.org/wiki/सज्जनगड" पासून हुडकले