"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{बदल}}
{{दृष्टिकोन}}
 
भारतीय भाषा परिवारात संस्कृतचे स्थान मातेचे तर इतर सर्व भाषेचे स्थान भगिनींचे आहे. यात हिंदी सर्व भारतीय भाषेची मोठी बहिण आहे. भारतीय जनगणना 1991 न्वये हिंदी भाषिकांची संख्या एकूण भारतीय लोकसंख्येच्या 40.20 इतकी आहे. केंद्रीय भारतीय भाषा संस्था म्हैसूर यांच्या आकडेवारीनुसार व जनगणना 1991 मधील सर्वेक्षणानुसार इतर भारतीय भाषेचे टक्केवारी मराठी-7.50, बंगाली-8.30,तेलुगु- 7.90, तमील-6.30, कन्नड-3.90, मल्याळी- 3.60, पंजाबी- 2.80, उडिया- 3.30, गुजराती- 4.90, उर्दू-5.20, असामी-1.40 इतकी आहे. भारतीय घटनेतील आठव्या परिच्छेदात एकूण 22 राष्ट्रीय भाषेचा सामावेश केलेला आहे. याशिवाय इतर 844 वेगवेगळ्या बोली भाषा भारतात अस्तित्वात आहेत.
 
Line २४ ⟶ २६:
हिंदी संमेलन,परिसंवाद,कार्यशाळा याकरीता जेव्हा कधी उत्तर भारतात जावे लागते तेव्हा तेथील लोक महाराष्ट्राच्या विकासा बध्दल प्रशंसा व्यक्त करतात. राष्ट्रभाषा हिंदी प्रचारातील महाराष्ट्राचे योगदान ते मान्य करतात. जाज्वल्य राष्ट्रभक्ती साठी महाराष्ट्रातील विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, महात्मा फुले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, कर्वे यांचा आदराने उल्लेख केला जातो. 1857 चा उठाव असो किंवा 1942 ची चले जाव चळवळ असो या सर्वच राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचे नांव अग्रभागी आहे. राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचे नांव सर्वच भारतात आदराने घेतले जाते.
हिंदीत रोजगाराच्या अनेक वाटा आहेत. यात अनुवाद, पत्रकारीता, दूरदर्शन,चित्रपट,जाहिरात,विपणन,व्यापार,पर्यटन,धार्मिक संस्था इ. अनेक क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. परंतु बेरोजगार युवकांची माथी हिंदी विरोधात पेटवून राष्ट्रीय ऐक्याला तडा जाणारी वक्तव्ये टाळावीत. पुरोगामी महाराष्ट्रात आज जर हिंदीला विरोध होणार असेल तर या सारखे दुसरे दुर्दैव नाही. लोकशाही देशात जर नेता डोक्यांच्या संख्यने निवडला जातो तर हिंदी भाषा लोकसंख्येत सर्वांत जास्त बोलणारी व व्यवहारात आणली जाते तर ती राष्ट्रभाषा का होऊ शकणार नाही. प्रत्येक देशातील राष्ट्रभाषेला इतिहास आहे. गुलामीत राहिल्यानंतरच खुद्द इंग्लंड मध्ये इंग्रजी भाषेला १३ व्या शतकापर्यंत फ्रेंच भाषेशी संघर्ष करावा लागला. राजभाषा हिंदीचा इतिहास तर आता कोठे ६१ वर्षाचा झालेला आहे. भाषेची लढाई अनेक काळापर्यंत चालणारी आहे. भाषेचे विद्वान सांगतात की आधी मातृभाषेचा आदर करा तेव्हा कोठे तुम्ही राष्ट्रभाषेचा आदर करु शकाल.
 
 
{{वर्ग}}