"पर्यावरणशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
मल्टिमिडीया: शिक्षणातील एक प्रभावी तंत्रज्ञान
 
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्राला गवसणी घातलेली असून शिक्षण क्षेत्रही त्यापासून वंचित राहिलेले नाही. तंत्रज्ञानात अनेक घटकांचा वापर केला जातो. मल्टिमिडिया हा तंत्रज्ञानाचा एक प्रकार आहे. यात अनेक माध्यमाचा एकत्रित संयोग करून एक नवीन माध्यम तयार केले जाते, त्यावेळी एक नवीन तंत्रज्ञान विकसित होते. त्यापैकी मल्टिमिडीया हे एक माध्यम होय. प्रतिमा, रंग इत्यादीचे एकत्रितरीत्या केलेल्या संयोजनाचा वापर करून ध्वनीची साथ दिल्यावर तयार होणारे मल्टिमिडीयातील घटक म्हणजे अँनिमेशन.
आपल्या डोळ्याच्या पडद्यावर पडणारी प्रतिमा डोळ्यांतील दृष्टीपटलावर पडते. त्याठिकाणी ती फक्त 1/16 सेंकद एवढ्याच कालावधीपुरती स्थिरावलेली असते. म्हणजेच आपल्या डोळ्यासमोरून एखादी वस्तू वा चित्र दूर केल्यानंतरही 1/16 सेंकदापर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावर तसाच ठसा उमटतो. दृष्टीपटलावर संवेदना टिकणे हा परिणाम दृष्टीसातत्यामुळे घडतो. आपणाला दृष्टीसातत्यामुळे वस्तू अगर चित्र मूळ जागी ठेवून त्या वस्तूच्या प्रतिमेचे आकलन होण्यासाठी 1/16 सेंकद स्थिर नजर ठेवावी लागते. दृष्टीसातत्य हा वैज्ञानिक गुणधर्म आहे. आपल्या डोळ्यासमोरून वस्तू दूर केल्यानंतर प्रतिमाही नाहिशी होत असते. दृष्टीसातत्यामुळे 1/16 सेंकदापर्यंत दिसत राहून त्यानंतर नाहीशी होते. ज्यावेळी एक प्रतिमा पुसली जाण्याच्या आत दुसरी प्रतिमा दाखवली. दुसरी प्रतिमा पुसली जाण्याच्या आत तिसरी प्रतिमा, अशा रीतीने सलग प्रतिमा आपल्याला दाखविल्या तर दिसणा-या प्रतिमांद्वारे सलगतेचा भास निर्माण होतो आणि वेगवेगळ्या प्रतिमा आपल्याला चलचित्राप्रमाणे दिसतात. दृष्टीपटलावरील त्या चित्रांच्या अलग अलग प्रतिमा एकमेकांमध्ये गुंफल्यामुळे त्या आपणास सलग भासतात.
पूर्वीच्या काळी थम्सअप, कोका-कोलाच्या बाटल्यांची टोपणे जमवल्यावर क्रिकेटपटूंच्या चित्रांची पुस्तके मिळत. बाटल्याची टोपणावरील 1 ते 15 किंवा 20 नंबर असणारी टोपणे जमा केल्यावर ती विक्रेत्याला द्यावयाची. ती जमा करून दिल्यावर मिळणारी पुस्तके ही खेळाडूंची एखादी क्रिया दाखवणारी असायची. त्या पुस्तकामध्ये क्रिकेटपटू बँटने चेंडूला फटका मारतोय असे आपल्याला दिसे. अशा प्रकारच्या पुस्तकात पहिल्या पानावर क्रिकेटपटूची बँट जमिनीला टेकवलेली असे, नंतरच्या चित्रात बँट थोडीशी वर उचललेली, नंतर थोडी आणखी वर, नंतर आणखी जास्तीची उचललेली आणि शेवटी बँटने चेंडूला फटका मारणारी अशी दाखवणारी असे. विविध स्थितीतील चित्रे त्या पुस्तकाच्या वेगवेगळ्या पानावर क्रमाने छापलेली असत. पुस्तकातील पाने फर्रकन डोळ्यासमोरून नेली की आपल्याला खेळाडू बँटने चेंडूला फटका मारतोय असे वाटे.
अलीकडच्या “तारे जमीन पर” मध्येही असेच एक पुस्तक ईशानची आई-बाबा-दादा यांच्याकडे दाखविलेले आहे. अँनिमेशनच्या कार्टून फिल्ममध्ये किंवा मल्टिमिडीयामध्ये हेच तत्व वापरलेले असते. “डिस्ने वर्ल्ड” व “कार्टून्स” ही चॅनेल्स लहान मुलांमध्ये लोकप्रिय झाली आहेत ती या गोष्टींमुळेच. सध्या लोकप्रिय झालेल्या या पद्धतीवर आधारीत फिल्म म्हणजे “जय गणेशा” व “जय हनुमान”. 1906 साली स्टुअर्ट ब्लॅकटन नावाच्या माणसाने हाताने काढलेली थोड्या क्रमागत स्थितीतील चित्रे एकापाठोपाठ भराभरा दाखवून अँनिमेशनची सुरूवात केली. त्याचा ‘ह्युमरस फेजेस ऑफ फनी फेसेस’ हा सिनेमा जगातला पहिला अँनिमेटेड सिनेमा मानला जातो.
आपल्या नेहमी डोळ्यासमोर असतात असे काही अनुभव/घटना जवळून पाहात असतो, पण त्याची आपणाला पूर्णपणे माहिती नसते. दिवाळीमध्ये आपण फुलबाज्या पेटवून हातात धरतो व ते गोलाकार फिरवितो. समजा, आपले मित्र फुलबाज्या पेटवून गोलाकार फिरवत आहेत. अशावेळी आपण त्याकडे पाहिल्यावर आपणास काय जाणवते. फुलबाजे वेगाने फिरविल्यास आपणास वर्तुळाकार तांबड्या रंगाचे चक्र दिसते. फिरविण्याचा कालावधी हा गोलाकार दिसण्यासाठी 1/16 सेंकदापेक्षा कमी वेग असेल तर वरीलप्रमाणे आपणांस गोलाकार वर्तुळ दिसते. प्रकाशाच्या गोलाचा आभास दृष्टीसातत्यामुळे आपणास जाणवतो.
लहान मुले भिंगरी किंवा वर्तुळाकार वस्तू घेऊन त्याच्या मध्यभागी दोन छिंद्र पाडतात. त्या छिद्रातून दोरा बांधून दोरीला ताण देऊन ती वस्तू फिरवतात. जर वस्तूच्या एका कोप-यात वेगळाच रंग दिला असेल तर ती वस्तू फिरविल्यावर आपणास वर्तुळाकार त्या रंगाचे चक्र आहे, असे भासते. हे आपणास जाणवते ते देखील दृष्टीसातत्याच्या गुणधर्मामुळेच.
अँनिमेशन करताना ज्या चित्रावर काम करावयाचे असेल अशी चित्रे काढून घेतली जातात. त्या चित्रावर आधारित थोड्याफार फरकाने अनेक चित्राचे रेखाटन केले जाते. 1 सेंकदासाठी 30 चित्रे, हे सर्वसाधारण प्रमाण ठेवले जाते. एका टोकांपासून दुस-या टोकांपर्यंत एखादी वस्तू जाते आहे असे दृश्य 10 सेंकदात दाखवावयाचे असल्यास त्यासाठी सर्वसाधारण 10X30 = 300 चित्रे काढावी लागतात. चित्रे क्रमवार रीतीने लावून त्यावर प्रक्रिया केली जाते. चित्रपटगृहामध्ये फिल्म फिरविण्यासाठी यंत्राचा उपयोग करतात. “जय हनुमान” या चित्रपटासाठी संपूर्ण चित्राचे रेखाटन हातांने केलेले आहे. त्यासाठी एकूण 2,80,000 एवढी चित्रे काढण्यात आली आहेत. सध्या अशा प्रकारच्या लोकप्रिय जाहिरातींमध्येही हेच तत्व वापरले जाते. त्यामुळे आपणाल्याला टूथपेस्ट वा टूथब्रश हालचाल करत असताना दिसते. हे नवल आहे लहान मुलांना पाहण्यासाठी. त्यामुळे मुले त्या गोष्टी घेण्यासाठी आग्रह करतात आणि उत्पादकांचा माल खपतो.
पुढीलप्रमाणे एखादा प्रयोग दाखवून विद्यार्थांना वेगवेगळे प्रयोग करावयास लावावेत. पुठ्ठयाचा एक जाड तुकडा घेऊन त्याच्या एका बाजूला रिकाम्या पिंज-याचे व दुस-या बाजूला पोपटाचे चित्र काढा. दोरा बांधून पुठ्ठा एका ठिकाणी टांगा. फिरवून दो-याला भरपूर प्रमाणात पिळ द्या. पुठ्ठा हातातून सोडून द्या म्हणजे तो फिरू लागेल. पुठ्ठा पुरेशा गतीने फिरावयास लागेल. एकटक पहात राहिल्यास पोपट पिंज-यात असल्याचा भास होतो. या प्रमाणेच गणितातील व विज्ञानातील संकल्पना तयार करण्यासाठी या पद्धतीचा वापर करणे, काही प्रमाणात शक्य आहे. उदाहरणार्थ, सजीवांची उत्क्रांती, झाडांची वाढ, बीजांकूरण, त्रिकोण, वर्तुळ-स्पर्शिका इत्यादी.
या आधारावर सर्वसाधारण पुढीलप्रमाणे आपण चित्रे रेखाटू शकतो. पहिल्या चित्रात एका टोकाला पक्षी आहे. दुस-या चित्रात ते पक्षी थोड्या अंतरावर, नंतर थोड्या जास्त अंतरावर, असे करत शेवटी दुस-या टोकाला गेलेले दाखविले की आपणाला ते पक्षी इकडून तिकडे जातात हे आपणाला दाखविण्याचे आहे. त्यासाठी आपण चित्रांचे रेखाटन करू या. हे चित्र आपल्या डोळ्यासमोरून फरर्कन गेल्यावर पक्षी उडत असल्याचा भास होतो.
 
आपण यासाठी आपल्या विज्ञान पुस्तकामधील उदाहरण घेऊ या. अमीबाचे विभाजन पद्धतीने प्रजनन होते हे देखील आपल्याला दाखवणे शक्य आहे. त्यासाठी प्रथम अमीबाचे चित्र काढावे. त्यानंतर पुढील अवस्था असतील, त्यानुसार चित्रे काढावीत. अशा प्रकारे पूर्ण चित्र काढल्यावर त्याला एक क्रम देऊन स्ट्रीप पट्टी बनवली व ती फिरवली असता आपणाला ते सलग विभाजन कसे होते, हे समजावून देता येईल.
 
संगणकाचा वापर करून हे काम ब-यापैकी सोपे झाले आहे. संगणकाद्वारे कार्टून्स् काढता येतात. त्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत, जेणेकरून सुरूवातीचे व शेवटचे चित्र काढले की मधील 25 ते 30 चित्रे आपोआप संगणकाद्वारे तयार होतात. FLASH, ANIMATION, ही काही सॉफ्टवेअर आहेत. Power Point Presentation वर सुद्धा आपण अशाच प्रकारचे साहित्य तयार करू शकतो.