"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १०:
परंतु, आपल्या लेखनाबद्दल दिलेले कोणतेही संदेश केवळ पुर्नलेखनाची विनंतीच असतात. असे पुर्नलेखन तुम्ही स्वतःच पुर्ण केले पाहिजे असेही नाही,इतर मंडळींकरिता ते तसेच सोडण्यासही तुम्ही मुक्त असता . त्यामुळे आपण आपले इतर लेखन किंवा वाचन चालू ठेऊन खालील सहाय्यपर लेखन सुद्धा आपल्या सवडीने जरूर तेवढेच वाचू शकता.
 
आपण लेखन केलेल्या लेखानापुढे शीर्षकलेखन संकेत, पुर्नलेखन,विकिकरण,संदर्भ द्या,व्यक्तिगत मते,शुद्धलेखन,पक्षपात,पूर्वग्रह अशा अर्थाचे काही संदेश, लेखन करणार्‍या संपादकास '''घाबरवण्याकरिता''' नव्हे तर आपल्या सारख्या नवागत सदस्यांच्या लेखनाकडे नियमीत जाणत्या सदस्यांचे लक्ष जावे आणि विकिपीडियाच्या स्वरूपास अनुकूल [[विकिपीडिया:विकिकरण|विकिकरण]] (बदल) करण्यास आपल्याला सहाय्य आणि सहयोग उपलब्ध व्हावा, असे असते आणि कालौघात लेखात दर्जात्मक सुधारणा व्हावी असा उद्देश असतो.
 
त्या शिवाय, असा संदेश कुणी लावला आहे ते लेखाच्या इतिहासात पाहून संबंधीत सहसंपादकाच्या चर्चा पानावर लेखाच्या चर्चा पानावर ,[[विकिपीडिया:चावडी|चावडी]], मदत केंद्र इत्यादी ठिकाणी आपण आपले शंका निरसन करून घेऊ शकता. असे संदेश लावण्यात आपल्यालाही पुढाकार घ्यावयाचा असेल तर विकिपीडियाचा दर्जा सांभाळण्याच्या अमूल्य कार्यात [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त]] ,[[विकिपीडिया:विकिकरण|विकिकरण]] आणि इतर [[विकिपीडिया:प्रकल्प|विवीध समन्वय प्रकल्पात]] आपण स्वतः सुद्धा सहभागी होऊ शकता.
ओळ ३०:
 
==हवे होते अपेक्षा, विकिपीडिया आणि सहप्रकल्प परीघ==
बरेच लोक कथा कविता पुस्तके इत्यादी बद्दल पृच्छा करित असतात. कोणतेही प्रकाशित साहित्य किंवा साहित्यिका बद्दल त्रोटक समालोचन/समीक्षणात्मक माहिती तुम्हाला संबधीत वैश्वकोशिय लेखात मराठी विकिपीडियातच उपलब्ध करता येईल किंवा तशी अपेक्षा व्यक्त करता येईल. लेखकाची किंवा लेखातील प्रसिद्ध वाक्ये (काव्ये नव्हे) '''[[:q:|विकिक्वोट्स]]''' या विकिपीडियाच्या सहप्रकल्पामध्ये अंतर्भूत करता येतील. अप्रताधिकारीत म्हणजे copyright free मुळदस्तावेज कथा कविता लेख पुस्तके इत्यादी साहीत्य (पाण्‍डूलिपी) आणि स्रोत इत्यादी तसेच त्यांची भाषांतरे करिता [[:b:|विकिस्रोत]] मध्ये देता येते,
 
तुम्हाला शैक्षणिक पुस्तकांचे गाईड मार्गदर्शक किंवा असे करावे असे करू नये स्वरूपातील नवे प्रताधिकारमुक्त पुस्तकीय लेखन , नवीन पुस्तकांच्या निर्मीतीकरिता '''[[:b:|विकिबुक्स]]''' मध्ये अंतर्भूत करता येते.
ओळ ४४:
<!-- सुचना खाली आहे Display area is below -->
 
'''[[:wikimedia:|विकिमिडीया फाउंडेशन]]''' तीच्या संकेतस्थळांच्या सुसूत्रीत व्यवहाराच्या दृष्टीने '''[[:m:Mr/मुखपृष्ठ|मेटाविकि]]''' हे निती नियमावलींचे चर्चा व नियमन करते, दुरगामी व्यूहरचनेची योजना प्रस्ताव व त्यावरील चर्चा [[strategy:Main Page/mr|स्ट्रॅटेजी प्रस्ताव]] येथे करते'''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांचे व वापरणार्‍यांचे कार्य चालते तर '''[[:wikimedia:|विकिमिडीया फाउंडेशन]]'''चे स्वत:चेपण संकेतस्थळ आहे जेथे प्रवेश मर्यादीत स्वरूपातच उपलब्ध केला जातो. '''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' सॉफ्टवेअरच्या इतर भाषात भाषांतरणाचे काम [http://translatewiki.net/w/i.php?title=Main_Page&setlang=mr ट्रांस्लेट विकि]त होते आणि सॉफ्टवेअर संबधीत सूचना आणि तक्रारींची दखल [https://bugzilla.wikimedia.org/| बगझीला] येथे घेतली जाते.
 
तुम्ही '''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' सॉफ्टवेअर स्वत:चे मराठीतील स्वतंत्र संकेतस्थळ घडवण्याकरितासुद्धा वापरू शकता अथवा चक्क या सॉफ्टवेअरच्या डेव्हेलपमेंटमध्ये सहभाग घेऊ शकता.
ओळ ६०:
* विकिपीडियातील लेख हे केवळ अंतर्गत किंवा बहिर्गत संकेतस्थळांचे संकलन किंवा पुर्ननिर्माणही नाही.
 
* विकिपीडियातील लेख कोणत्याही धर्मादाय, व्यापारी वा व्यक्‍तिगत, शासकीय,निम-शासकीय आस्थापनांचे संकेतस्थळ नाही. ब्लॉग नाही. केवळ सामाजिक संपर्क स्थापित करण्याची अथवा त्यांच्या बद्दलच्या- शंका/तक्रार/समस्या- निवारण जागा नाही.
* विकिपीडियातील लेख हे अंदाधुंद माहिती गोळा करण्याचे ठिकाण नाही.
** नेहमी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची यादी नाही.
ओळ ८५:
:आपला ईमेल पत्ता लेख किंवा चर्चा पानावर देण्याचे टाळावे,अगदीच देणे तसे आवश्यक असल्यास @च्या चिन्हाच्या एवजी ऍट शब्द मराठीत तचेच डॉट शब्द मराठी अक्षरात लिहिण्याची दक्षता घेतल्यास यांत्रिकी शोधयंत्रे त्याचा शोध घेऊन तुमच्या इमेल पत्त्यावर उत्पातपूर्ण इमेल पाठवले जाणे टळेल
:न पेक्षा [[विशेष:पसंती]] येथे तुमचा ईमेल पत्ता भरून जतन केल्यास तुमच्या सदस्यपानाच्या चर्चा पानावर कुणी संदेश/उत्तर दिल्यास असे उत्तर दिल्याचा संदेश तुमच्या इमेलवर प्राप्त होतो त्यामुळे तुमचे इमेल सार्वत्रिक जनतेपासून गोपनियही राहते आणि येथील संपादकांना स्वतःच्या इमेलबॉक्स मध्ये जाऊन तुम्हाला उत्तर देण्यापेक्षा ते तुमच्या चर्चा पानावर देणे सोपे पडते.
:दुसरे हेही लक्षात घ्या येथील बहुसंख्यंडळीबहुसंख्यमंडळी संपादकीय कामात व्यस्त असतात. एखाद्या विशिष्ट व्यक्तिच्या इमेलपत्त्यावर उत्तर पाठवले जाण्याची शक्यता सहसा कमी असते.इमेल किंवा मोबाईल नंबर येथे देण्या पेक्षा , आपण मराठी विकिपीडिया [http://groups.yahoo.com/group/mr-wiki याहू ग्रूपचे] आणि [http://labs.google.co.in/smschannels/subscribe/marathiwikipedians एस एम एस चॅनलचे] सदस्य होऊन तेथे चर्चा करणे काही वेळा अधिक श्रेयस्कर ठरू शकते.
 
मराठी विकिपीडियाच्या मर्यादीत परिघात पूर्ण होण्याची शक्यता कमी असलेल्या नवीन सदस्यांकडून व्यक्त होणार्‍या अपेक्षांची उदाहरणे: