"वावडिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याची फळे जंतुघ्...
 
No edit summary
ओळ १:
'''वनस्पतीशास्त्रीय नाव:''''' Embelia ribes'' Burm.
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याची फळे जंतुघ्न असतात.{{विस्तार}}
'''कुळ:'''Myrsinaceae
 
'''नाम:'''- (सं.) विडंग; (हिं.) बबेरंग, बाबरंग; (पं.) बब्रुंग; (नेपाळ) हिमळचेरी; (गु.) वावडींग; (क.) वायुविलंग; (ता.) वायुविळगम्; (सिंगाली) उंबेलिअ; (मुंबई) कर्कनी, वायवरंग, वायमिरी.<br />
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
'''वर्णन:'''- वावडिंगाच्या मोठ्या झाळी असतात. दांडा खरखरीत असून त्यास पुष्कळ गांठी असतात; पाने दोन्ही टोकास निमुळती; फुले पांढरी व मोठाल्या तुर्‍यांनी येतात; फळे मिर्‍यापेक्षां लहान व गुच्छानी येतात. याची फळे औषधांत वापरतात. सुकी फळे मिरी व कबाबचिनीसारखी दिसतात. फळास देठासकट पांच पट्ट्यांचे पुष्पपात्र चिकटलेले असते व अग्राकडे लहान अणी असते. रंग तांबूस उदी असून उभे पट्टे असतात. फळ जुनावले म्हणजे रंग काळा होतो. फळ फोडल्यास आंत भुरकट लाल रंगाचा पुष्कळ मगज असतो व एक बी असते.<br />
'''रसशास्त्र:'''- वावडिंग रूचिकर व जरासे कडवट आणि तुरट असते, त्यांत एक अम्लस्वभावी द्रव्य (Embelic acid एम्बेलिक् ऍसिड्= विडंगाम्ल) २१/२ टक्के आहे.<br />
'''गुण:'''- वावडिंग उष्ण, दीपन, पाचन, जरासे आनुलोमिक व मूत्रजनन, उत्तम कृमिघ्न, वायुहर, बल्य, मेंदू व मज्जातंतूस बल्य, रक्तशोधन व रसायन आहे. ह्याने लघवीचा रंग लाल होतो व त्यांतील अम्लता वाढते. वावडिंगाची क्रिया शरीरांतील सर्व ग्रंथींवर, मुख्यत्वे रसग्रंथीवर होत असते. ह्याने सर्व जीवनविनिमयक्रियेस उतेजन येते. मात्रा:- १/२ ते १ तोळा. लहान मुलास १ ते २ वाल. मात्रा कमीजास्त झाल्यास हरकत नाही. कारण हे निरूपद्रवी औषध आहे. हे घेत असतां पथ्य करण्याची जरूरी पडत नाही.<br />
'''उपयोग:'''
# मनुष्याचे शरीरावर वावडिंग विलक्षण गुणकारी आहे. वावडिंग घेत असता भूक लागते, अन्न पचते, शौचास साफ होते, वजन वाढते, त्वचेचा रंग सुधारतो, शरीर तेजःपुंज दिसते व मनास आल्हाद वाटतो.
# लहान मुलांच्या रोगांत तर हे दिव्य औषध आहे. मुले सुद्दढ राहण्यास अखंड वावडिंग दुधांत उकडून ते दूध देतात.
# आंकडी, फेफरें, अर्धांगवायु वगैरे मेंदू व मज्जातंतूच्या रोगांत वावडिंग लसणीबरोबर दुधांत उकडून ते दूध देतात.
# त्वग्रोगांत वावडिंग पोटांत देतात व त्याचा लेप करतात आणि धुरिहि देतात.
# तर्‍हेतर्‍हेचे कुष्ठरोग अन्न नीट पचन न झाल्यामुळे उद्भवतात. वावडिंगाने पचनक्रिया सुधारल्यामुळे व शौचास साफ झाल्यामुळे कुष्ठ बरे होतात आणि शिवाय वावडिंगाची त्वचेवर थोडीबहुत उत्तेजक क्रियाहि होत असते.
# हे फार मौल्यवान कृमिघ्न आहे. ह्या औषधाने कृमि मरून पडतात
"https://mr.wikipedia.org/wiki/वावडिंग" पासून हुडकले