"चित्रक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''वनस्पतीशास्त्रीय नाव:''' ''Plumbago zeylanica''L.

'''कुळ:''' Plumbaginaceae

'''नाम:''' (सं.) चित्रक; (हिं.) चित्रक; (बं.) चिता; (गु.) चित्रो; (क.) वेल्लीचित्रक.
[[चित्र:Plumbago zeylanica habit.jpg।thumb|right]]
'''वर्णन:''' हे बहुवर्षायु सदाहरित लहानसर क्षुप आहे. ह्याचा दांडा गोल असून त्यास पुष्कळ फांद्या फुटतात, फांद्या पसरलेल्या असून जमिनीवर पडतात तेव्हां पेरापेरास मुळे फुटतात; पाने एकान्तराने, अखंड, देठरहित, लंबगोल, हिरवीगार, मोगर्‍याच्या पानासारखी, जाडसर व दडस; फुलांचे तुरे येतात, फुले पांढरी, नियमित, स्त्री व पुरूष इन्द्रिये एकत्र असलेली आणि गंधरहित; पुष्पपात्रावर लहान लहान पुष्कळ ग्रंथि असतात; मुळे लांब, ताजेपणी मांसल,पुष्कळ वेडीवाकडी झालेली, सुमारे बोटभर जाड व क्वचित् त्यांस उपमुळे फुटलेली असतात; साल काळसर उभी चिरलेली असून तीवर थोड्याशा लहान गांठी असतात; सुके मूळ तोडले असता त्वरित तुटते; रूचि तिखट, कडू, उष्ण आणि जिभेस भोसकल्याप्रमाणे दुःखदायक, मुळाची साल औषधांत वापरतात. ही नेहमी ताजी वापरावी, कारण जुनी झाली म्हणजे निरूपयोगी होते.

'''रसशास्त्र:''' चित्रकाच्या मुळाच्या सालींत एक दाहजनक द्रव्य आहे. ते दारूंत फार मिसळते, उकळलेल्या पाण्यांत बरेच मिसळते, परंतु थंड पाण्यांत क्वचितच मिसळते.

"https://mr.wikipedia.org/wiki/चित्रक" पासून हुडकले