"फिंसेंत फान घो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२,०१४ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
 
उत्पन्नाचा स्त्रोत कांहीही नसताना कफल्लक अवस्थेत व्हिन्सेंटने पुढची दोन वर्षे कशी काढली ते इतिहासास ज्ञात नाही, पण तो तगला. या कठीण काळांतून त्याने आपले पुढचे ध्येय निश्चित केले – कलावंत होण्याचे.
 
व्हिन्सेंट विल्हेम व्हॅन गॉघ हा अभिजात चित्रकार 30 मार्च 1853 रोजी नेदरलँडमधील एका लहानशा गांवी जन्मला. बेल्जियमच्या सीमेलगतच्या या ग्रूट झुंडर्ट नामे गांवात त्याचे वडील पॅस्टर होते तर आई कार्नेलिया कलासक्त गृहिणी होती. त्याच्या जन्माचा योगायोग हा, की याच दिवशी गतसाली त्याच्या आईने एक जन्मत:च मृत बाळास जन्म दिलेला होता. त्याचेच व्हिन्सेंट हे नांव लेवून जन्मलेले हे बाळ सतत आपल्या मृत भावाची सावली डोक्यावर ठेवून वाढत राहिले.
 
व्हिन्सेंट हा बाळपणी अतिशय एकाकी जगत असे. शेतांतून एकटाच फिरत राही. धाकटा भाऊ थिओ याच्याशी खेळणेही त्याने क्वचित केले. त्याच्या शालेय प्रगतीची नोंद नाही, पण आईच्या प्रभावाने त्याने चित्रकलेला हात घातला होता असे दिसते.
 
त्याच्या काकांची हेग येथे कलाविषयक फर्म होती व सोबत येणारी प्रतिष्ठाही त्यांना प्राप्त होती. 16 व्या वर्षी शाळा संपल्यावर व्हिन्सेंटने या फर्ममध्ये चारेक वर्षे उमेदवारी केली, पण हे स्थैर्य फारकाळ टिकले नाही. सन 1874 मध्ये त्याला लंडनला पाठवण्यात आले. तेथे घरमालकिणीच्या मुलीच्या देवदासी प्रेमात पडून त्याने ही नोकरीही गमावली. दोन वर्षांनी तो पुन्हा लंडनला आला. एका शाळेत थकित फीच्या वसूलीचे काम त्याला मिळाले. हे फी थकविणारे पालक लंडन शहराच्या मुख्यत्वेकरून निम्न आर्थिक स्तरातले होते. त्यांच्या वसाहतींतून हिंडताना बकाली अन् दारिद्र्याच्या दर्शनाने तो हबकून गेला. फी वसूल करण्याच्या त्याच्या निहित कर्तव्याशी त्याच्या मनात जन्मलेली करुणा विसंगत होती. लौकरच तो या चाकरीतूनही मुक्त झाला.
 
या करुणेने त्याला धर्मप्रसाराचा मार्ग इंगित केला. पॅस्टर असणाऱ्या त्याच्या वडिलांनी उत्तेजन दिले आणि व्हिन्सेंटचा वेडा राक्षसी उत्साह आता धर्मप्रसाराकडे वळला. उपउपदेशक म्हणून त्याने नोकरी घेतली. अदम्य उत्साह आणि भाबडी करुणा यांच्या जोरावर तो त्यातला आनंद प्राशू लागला. आजवरच्या अपयशांच्या पार्श्वभूमीवर, त्याचे हे झपाटलेपण चकित करणारे होते. ‘ आता हीच आपल्या जीवनाची दिशा ’ असे ठरवून तो परत हॉलंडला आला ते वरच्या पदाचे – मिनिस्टरपदाचे - रीतसर शिक्षण घेण्याकरता. त्याच्या जन्मदात्यांना मात्र त्याच्या या निर्णयाबाबत शंका होती. मिनिस्टरपदाचे प्रशिक्षण अतिशय काटेकोर अन् शिस्तबद्ध व्यक्तीच पुऱ्या करु शकत. व्हिन्सेंट त्या शिस्तीच्या वातावरणात तग धरु शकेल का, ही त्याच्या मातापित्यांची कुशंका खरीच ठरली. अवघ्या वर्षभरातच व्हिन्सेंट त्यातून बाहेर पडला आणि वयाच्या 25 व्या वर्षी हा अपयशांचा प्यारा व्हिन्सेंट “ बोरीनाज ” या कोळशांच्या खाणींच्या गांवी आगमन करता झाला. दक्षिण बेल्जियममधील या गांवावर सतत उदास काळोखी छाया असे- कोळशाची अन् खाणकामगारांच्या काळोख्या वर्तमान-भविष्याची. अशा या उदासवाण्या गांवात हा वैयक्तिक, सामाजिक, आणि आर्थिक अपयशांनी गांजत गेलेला इव्हांजेलिस्ट मनात लख्ख रंग घेऊन, ईश्वराच्या प्रकाशाची सुवार्ता घेऊन येत होता.
 
बोरीनाजमथील दारिद्र्य लंडनमधल्या त्याने पाहिलेल्या गरीबीहून अथिक भयाण होते. त्याने ख्रिस्ताचा “ गरीबांस देऊ करा ” हा संदेश चेवाने अंमलात आणण्यास सुरूवात केली. कडाक्याच्या थंडीतले त्या कामगारांचे हाल न पाहवून त्याने आपले गरम सुखासीन कपडे त्यांना ताड्कन देऊ केले. त्यांट्याट सोबत रहायचे म्हणता आहार कमी करत स्वतः त्यांच्याएवढ्या कुपोषित अवस्थेप्रत तो येऊन पोहोचला. या अतिरेकी उत्साहाने त्याचे वरिष्ठ उपदेशक स्तंभित होऊन गेले. गचाळ कपडे अन् भंगड अवतार यांवरून त्याला तुच्छ अन् नाकाम ठरवीत त्याच्या वरिष्ठांनी त्याला या चाकरीतूनही मुक्त केले.
 
उत्पन्नाचा स्त्रोत कांहीही नसताना कफल्लक अवस्थेत व्हिन्सेंटने पुढची दोन वर्षे कशी काढली ते इतिहासास ज्ञात नाही, पण तो तगला. या कठीण काळांतून त्याने आपले पुढचे ध्येय निश्चित केले – कलावंत होण्याचे.
 
ज्या आवेगाने त्याने इव्हांजेलिस्टपणात स्वतःला झोकून दिले होते, त्याच आवेगाने त्याने कलावंतपणात उडी घेतली. बरेच महिने त्याचे आनंदात गेले आणि त्याचा हात सुधारत गेला. पण पाचवीलाच पुजलेली अस्थिरता पन्हा रोंरावत आली. प्रेमभंगाचे एक प्रकरण त्याला हादरे देऊन गेले. त्यात वडिलांशी धर्मविचारांवर झालेले मतभेद एवढे पराकोटीला पोहोचले, की व्हिन्सेंट बापाचे घर त्यागून पुन्हा बाहेर पडला. 1881च्या ख्रिसमसला तो हेगकडे निघाला ते वडिलांशी संबंध विच्छेदूनच.
 
पण पोटभरणीचं काय ? त्याचा धाकटा भाऊ थिओ त्याच्या मदतीस आला. थिओला भावाची फार कदर होती. त्याने आपल्या उत्पन्नातून ठराविक रक्कम व्हिन्सेंटला पोहोच करण्याचे काम व्रत म्हणून आयुष्यभर स्वीकारले. व्हिन्सेंटचा मित्रसमान मातुल नातलग अंतोन मुऑव्ह याने व्हिन्सेंटला उत्तेजन दिले, त्याची कला बहरेल असे वातावरण निर्मिले. पण परत व्हिन्सेंटचा स्वभाव आडवा आला. त्यांची मैत्री भंगली. परिस्थितीचा उग्र वैशाख वणवा त्याला आयुष्यभर चटके देत होताच. बंड म्हणून की काय, पण समाजात त्याज्य अशा एका वेश्येसोबत व्हिन्सेंट राहू लागला. या क्रूर नियतीहून मी स्वतः माझी बरबादी अधिक करु शकतो हेच तो जणू सिद्ध करु पहात होता. त्याने या आपल्या मैत्रिणीवर अन् सोबतच्या तिच्या अनौरस मुलावर प्रेमाचा अन् मायेचा वर्षाव सुरू केला. तिच्याशी रीतसर विवाहाचा विचार केवळ थिओच्या मनधरणीमुळेच त्याने बाजूस सारला. एकीकडून नियतीचे तर दुसरीकडून स्वतःच्या निसर्गदत्त स्वभावाचे फटके खात त्याचं आयुष्य होलपाटत चाललं होतं.
 
 
==बाह्यदुवे==
१७

संपादने