"लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ''' (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[बॉस्टन]] शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. [[एरट्रान एरवेझ]], [[अमेरिकन एरलाईन्स]], [[जेटब्ल्यू एरवेझ]] आणि [[यु.एस. एरवेझ]] या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात. येथून अमेरिकेतील बहुतेक मोठ्या शहरांना तसेच [[मेक्सिको]], [[कॅनडा]], [[कॅरिबियन]], [[युरोप]] येथे विमानसेवा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी मोजता लोगन विमानतळ अमेरिकेतील १२वा मोठा विमानतळ आहे.<ref>http://www.bts.gov/publications/pocket_guide_to_transportation/2008/html/table_04_07b.html</ref> २००५मध्ये येथून ३९,०२,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आवागमन केले.
 
लोगन विमानतळ २,३८४ एकरमध्ये पसरलेला असून येथे सहा धावपट्ट्या आहेत व १६,००० कर्मचारी येथे काम करतात.<ref>{{cite web |url=http://www.massport.com/LOGAN/faq.html#q29 |title=MASSPORT: Logan Airport: FAQ |accessdate=2008-09-26 }}</ref> या विमानतळामुळे ७ अब्ज [[अमेरिकन डॉलर]]ची उलाढाल होते.<ref>http://www.massport.com/logan/about_histo.html</ref>
 
हा विमानतळ [[ईस्ट बॉस्टन]] आणि [[विन्थ्रोप, मॅसेच्युसेट्स|विन्थ्रोप]] या उपनगरांत आहे.