"नैवेद्याची थाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: स्वामी रामदास समर्थ यांच्या साहित्यात रामनवमीच्या दिवशी श्रीप्...
 
No edit summary
ओळ ७:
 
कोणकोणत्या शाखेत(भागात) कोणकोणते पदार्थ वाढावयाचे त्याचे वर्णनः
 
<u>'लवणशाखा'</u>:लिंबाची फोड, ना ना विध प्रकारची लोणची,रायती,मेतकुट,पापड,भाजणीचे वडे,कुटलेले डांगर,मिरगुंडे,सांडगे,केळे/तोंडले वा कारल्याच्या तळलेल्या काचर्‍या,चिकवड्या,फेण्या,कुरड्या इ. तळलेले पदार्थ, शिजवलेले सुरण/मुळा,गाजर,करवंदे,भोकर,काकडी,हिरवी मिरची,कैरी,लिंबू इत्यादींपासुन बनविलेल्या कोशिंबीरी,वांग्याचे भरीत,दहीवडे,घारगे,मुरांबा,मोरावळा इत्यादी.
 
 
<u>'मधला मुख्य भाग'</u>कणकेची सोजी,सपिट,रव्याचा शिरा,पुरण/सांजापोळी,तेलपोळी,साधीपोळी,रांजणावर भाजलेले मांडे,तुपात तळलेल्या पुर्‍या कानवले,करंजी,भाकरी-रोटले,धिरडी,पानवल्या,पानग्या,खांडवी,गुळवड्या,सांजावड्या,डाळीचे ढोकळे,वेगवेगळे लाडु,साधा भात,साखर भात,गुळ-नारळी भात,मसाला भात,राब-भात(तुप व मध मिसळुन केलेला) असावा.मध,तुप व दुधाची वेगवेगळी वाटी,निरनिराळ्या खिरी, शिकरणी,लोणी, घट्ट धी
 
<u>'शाकभाग'</u> : मेथी,चाकवत,पोकळा,माठ,शेपू,चवळी,घोळ या पालेभाज्या,चवळीची उसळ,केळफुल,वांगी,पडवळ,शेगटाच्या शेंगा,घेवडा,फरसबी,तोंडली, कच्ची केळी,कोहळा,दुधी भोपळा, लाल भोपळा,हिरवा भोपळा या फळभाज्या व विविध प्रकारच्या आमट्या.
 
 
या भोजनासमवेतच, शितल व सुवासिक पाणी,सायीच्या घट्ट दह्यात मिठ/सैंधव,वाटलेली कोथिंबीर,भाजलेली सुंठ,तळलेला हिंग टाकुन व ते घुसळुन केलेला मठ्ठा पण असावा.
 
ही सुमारे ३५० वर्षापुर्वीची समर्थ/शिवाजी काळातली नैवेद्याची संकल्पना आहे.
 
[[वर्ग :नैवेद्याचे खाद्यपदार्थ]]