"ना.घ. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: नागोराव घनश्याम देशपांडे (जन्मः ऑगस्ट २१, १९०९ - ?? २०००) : मराठी कवी. ==...
(काही फरक नाही)

०३:०५, ११ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती

नागोराव घनश्याम देशपांडे (जन्मः ऑगस्ट २१, १९०९ - ?? २०००) : मराठी कवी.

प्रकाशित साहित्य (काव्य संग्रह)

  • शीळ (१९५४)
  • गुंफण (१९९६)
  • खूणगाठी (१९८५)
  • कंचनीचा महाल (१९९६)
  • अभिसार (१९६३)

पुरस्कार

इतर

बाह्य दुवे

एक कविता

जाणिव
सांध्यरसाने रंगत रंगत वाहत होता कोमल वारा अवकाशाचे अंतर उजळत उमटत होती एकच तारा

तू आणिक मी बसून तेथे
बोलत होतो सहजच काही
सहजच सारे वाटत नव्हते
त्या दिवशी पण तुला मलाही

उमजत नव्हते हे की ते वा
ती तर सजणे; होती प्रीती
होती प्रीती; परंतु तेव्हा
जाणिव नव्हती, जाणिव नव्हती!

दैवगतीने वाहत वाहत
अनेक वर्षांनंतर सजणी
असेच आलो, बघ अनपेक्षीत
आपण दोघे एक ठिकाणी!

पुन्हा तू नि मी बसलो येथे
बोललीस तू, मी पण काही
सहजच वाटत नाही पण ते
आज खरोखर तुला मलाही

अजाण होतो मागे आपण
नव्हती जाणिव होती प्रीती
उरली आहे आज, सखे पण
जाणिव नुसती, जाणिव नुसती !