"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल इंग्रजी विकिपीडियातील माहितीनुसार
ओळ २३:
 
== मराठी भाषेचा इतिहास==
मराठी भाषा [[महाराष्ट्र]] व [[गोवा]] राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार मराठी भाषेचा [[भारत।भारतातभारत]]देशात ४था तर जगात १७वा क्रमांक आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानने मराठीला इतर २२ भाषांबरोबर शासकीय दर्जा दिला आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यांव्यतिरीक्त मराठी गुजरात, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथे देखिल काही प्रमाणात बोलली जाते. बडोदा, इंदूर या भारतीय शहरांसोबत भारताबाहेर इस्राईल, मॉरिशीयस येथे मराठी भाषिक आहेत.
 
मराठी भाषेचा उदय [[संस्‍कृत|संस्‍कृतच्या]] प्रभावाने [[प्राकृत]] भाषेच्या [[महाराष्ट्री]] या बोलीभाषेपासून झाला. [[पैठण]] (प्रतिष्ठान) येथील [[सातवाहन]] साम्राज्याने [[महाराष्ट्री]] भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. [[छत्रपति शिवाजी महाराज|छत्रपति शिवाजी महाराजांनी]] मराठी साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली आणि [[पेशवे|पेशव्यांनी ]] या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राज्याश्रय मिळाला. [[ई.स. १९४७]] नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठी राज्यभाषेचा दर्जा दिला.[[ई.स. १९६०]] मध्ये मराठी भाषिकांचे एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. [[ई.स. १९३०]] पासून [[मराठी साहित्य संमेलन]] सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.