"राज ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २१:
 
===महाराष्ट नवनिर्माण सेना===
एप्रिल २००६ मध्ये राज ठाकरे यांनी [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]] (इथून पुढे '''मनसे''' संक्षिप्त) या पक्षाची स्थापना केला. मराठी माणसाचे हितरक्षण व उन्नती हा या पक्षाचा प्रमुख मुद्दा आहे. शिवसेना हा पक्षही मराठी मुद्यावर स्थापन झाला होता. परंतु शिवसेनेने ह्या मुद्याला बगल दिली असल्याची पक्षाची भावना आहे. सुरुवातीला शिवसेनेतील राज ठाकरे समर्थक लगेचच या पक्षात सामील झाले तर नवी राजकीय कारकीर्दीस उत्सुक असलेल्या अनेकांनी या पक्षात प्रवेश केला. राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्थापने पासून प्रभावी भाषणांचा सपाटा लावला. पहिल्या भाषणांमध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असेल यावर भर दिला गेला. स्थानिक मराठी तरुणांना नोकर्‍यांमध्ये प्राधान्य हा त्यातील प्रमुख मुद्दा होता. तसेच महाराष्ट्रातील राजकिय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रात मराठी भाषेची पत ढळू दिली न जाता तिचे उन्नती करण होईल अश्या प्रकारचा राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या भाषणांचा सूर होता.
 
'''उत्तरप्रदेशी व बिहारी वरील टिका'''-<br />
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणार्‍या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई पहिलेच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल,असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोंढ्यावर आपला शाब्दिक हल्ला चढवला. या राज्यातील राजकारण्यांमुळे ही या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात यातील सर्वात जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भ‍रावा? असा सवाल करत तेथील राजकारण्यांवर टिका केली. लालूप्रसाद व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकिय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येउन येथील स्थानिक लोकांच्या नोकर्‍यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येउन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करण्याचा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येउन मराठी शिकत नाहीत त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांच्या अनुभवला भाषिक अस्मिता दिली . जपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तामिळनाडू पश्चिम बंगाल या राज्यातील भाषाप्रेमाचे दाखले देत ह्या राज्यात ह्या देशांमध्ये बाहेरून नागरिक आला तर त्याला स्थानिक भाषा शिकावीच लागते. उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक येथील भाषा का शिकत नाहीत? येथील मराठी संस्कृतीत संमिलीत होत नाहीत व उलटे मराठीला हिन लेखत त्यांच्या राज्यातील कुप्रसिद्ध गुंडशाही येथे आणतात. अश्या प्रकारचे अनेक आरोप टिका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून व मुलाखतीतून स्पष्टपणे व्यक्त केली.
 
 
=== मनसे व उत्तर भारतीयांविरुद्ध दंगे ===
"https://mr.wikipedia.org/wiki/राज_ठाकरे" पासून हुडकले