"रासपुतीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 150px|left|thumb|'''ग्रिगोरी रास्पुतिन''' ग्रिगोरी येफिमोविच नोविख उ...
 
No edit summary
ओळ ३:
ग्रिगोरी येफिमोविच नोविख उर्फ रास्पुतिन याचा जन्म (जुन्या दिनदर्शिकेनुसार) [[१० जानेवारी]] (तर नव्या दिनदर्शिकेनुसार) [[२२ जानेवारी]] [[इ.स. १८६९|१८६९]] रोजी [[सायबेरिया|सायबेरियातील]] पोक्रोवस्कोये या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. हा एक अशिक्षित, दुर्व्यसनी माणूस म्हणून याची ख्याती होती. सायबेरियातील स्थानिक भाषेत अनीतीमान किंवा व्यभिचारी माणसास '''रास्पुतिन''' म्हण्तात व तेच याचे नाव पडले. हा एक संत, वैदु, वेडा फकीर होता किंवा एक ठग, स्वार्थी होता याबाबत बरेच समज-गैरसमज आहेत. {{संदर्भ हवा}}
 
१९०३ मध्ये रास्पुतिन आपले घरदार सोडून निंद्य व विक्षिप्त कृती करणार्‍या काही धार्मिक गटांसोबत काही काळ राहिला. काही वजनदार उमरावांशी परिचय झाल्याने रास्पुतिन थेट [[निकोलस दुसरा, रशिया]] या झारच्या (उच्चार त्सार, अर्थ राजा) सानिध्यात आला. त्यावेळी युवराज '''अलेक्सेई''' हा रक्तदोषाने आजारी होता. त्याच्यावर रास्पुतिनने उपचार केल्याने युवराज अलेक्सेईच्या रोगाची तीव्रता कमी झाली. यामुळे रास्पुतिनचा प्रभाव राजदंपतीवर पडला. त्सारिना (अर्थ राणी) '''आलेक्सांद्रा''' हिच्यावर रास्पुतिनचा प्रभाव पडल्याने तर ती कोणत्याही लहान मोठ्या समस्या रास्पुतिन समोर मांडण्यात स्वतःला धन्य समजू लागली. रशियाच्या एकमेव वारसाच्या रक्षणाकरिताच परमेश्वराने रास्पुतिनला पाठविले असल्याचे तिला वाटे. रोमानोव्ह राजपरिवारासाठी [[येशू ख्रिस्त|येशू ख्रिस्ताने]] पुन्हा जन्म घेतला असल्याचे ती बोलून दाखवी.
 
१९०६ साली तत्कालीन रशियाचे प्रधानमंत्री '''स्तोलिपिन''' यांच्या निवासस्थानावर क्रांतिकारकांनी बाँब फेकले तेव्हा जखमी लोकांवर उपचार रास्पुतिननेच केले. रास्पुतिनचे वाढते महत्व रशियाच्या राजकारणासाठी अतिशय घातक वळण घेत असल्याबाबत प्रधानमंत्री स्तोलिपिन याने त्सार निकोलसच्या कानावर घातले व रास्पुतिनला हद्दपार करण्यात यावे अशी मागणीही त्याने केली. पण परिणाम उलटा झाला व त्सार निकोलसने स्तोलिपिनलाच प्रधानमंत्री पदावरून दूर केले. रास्पुतिनच्या विरोधात जो वागेल, बोलेल त्याला कठोर शिक्षा होऊ लागली. यातून राजघराण्याचे धर्मगुरू ''थिओफन'', गृहमंत्री ''मकरोव्ह'' वगैरे मातब्बर मंडळीही सुटली नाहीत.
 
रास्पुतिनने हळूहळू रशियाच्या शासन व्यवस्थेवरही आपली पकड घट्ट केली. रास्पुतिनची मर्जी संपादन न करणार्‍यांची हकालपट्टी झाल्याने अनेक राजनिष्ठ व कर्तव्यदक्ष लोकांना शासनाबाहेर जावे लागले. त्यांच्या ऐवजी स्वार्थी व तत्त्वशून्य व्यक्तींचा भरणा राज्य व्यवस्थेत झाला. रशियाचे सरसेनापती '''निकोलाय निकोलाययेविच''' यांनाही त्सारने पदावरून काढून टाकले व ते पद स्वतः राखले. या घटनेमुळे अनेकांच्या मनात रास्पुतिनबद्दल संताप उफाळून आला. ड्यूमा (रशियन संसद) मध्ये रास्पुतिनविरूद्ध एकमताने ठराव संमत झाला आणि ड्यूमाच्या शिफारसीवरून त्सार निकोलसने रास्पुतिनला शिक्षाचे आदेश देण्यात आले. पण त्सारिना आलेक्सांद्राच्या दबावामुळे रास्पुतिनची शिक्षा लगेच मागे घेण्यात आली.
 
रास्पुतिनला ठार मारण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही असे अनेकांचे मत होते. दि. [[२९ सप्टेंबर]] [[इ.स. १९१६|१९१६]] या दिवशी युसुपोव्ह नावाच्या एका उमरावाच्या घरी रास्पुतिनला जेवणाचे आमंत्रण देण्यात आले. त्या दिवशी रास्पुतिनला मारण्याचा बेत आखला गेला. जेवणात विष कालवले होते. रास्पुतिनने जेवणावर ताव मारला पण त्याच्यावर विषाचा परिणाम झाला नाही. मग युसुपोव्हने आपल्या पिस्तुलातून रास्पुतिनवर गोळी झाडली, तरीही तो पळत ओरडत घराबाहेर अंगणात गेला. शेवटी पुरिश्केविचने आपल्या पिस्तुलातील सर्व गोळ्या रास्पुतिनवर झाडल्या, रास्पुतिन जागेवरच मारला गेला. रास्पुतिन माराला गेल्याची बातमी कळताच अनेकांनी आनंद व्यक्त केला. रास्पुतिनच्या निधनानंतर अवघ्या काहीच महिन्यात मार्च १९१७ मध्ये रशियात राज्य क्रांती घडून आली आणि रोमानोव्ह घराण्याची सत्ता संपुष्टात आली.
 
==संदर्भ==
{{काम चालू}}
* रशियाचा इतिहास : लेखिका डॉ. सुमन वैद्य, नागपूर
 
 
 
{{DEFAULTSORT:रास्पुतिन, ग्रिगोरी}}
[[वर्ग:रशियन सन्यासी]]
[[वर्ग:रशियन राजकारणी]]
[[वर्ग:इ.स. १८६९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१६ मधील मृत्यू]]
 
 
[[af:Grigori Raspoetin]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रासपुतीन" पासून हुडकले