"वनस्पतीशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
 
ऊष्ण कटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधाच्या दक्षिणेकडल्या भागांत हे असे युगानुयुगे चालत आलेले आहे, पण त्याहून उत्तरेकडे वेगळ्या प्रकारचे हवामान असते. अमेरिकेच्या उत्तर भागात हिंवाळ्याच्या दिवसात तपमान शून्य अंशाच्या खाली जाऊन सगळीकडे बर्फाचे साम्राज्य पसरते. दिवसाचा कालावधी अगदी लहान होतो आणि त्या वेळेतही सूर्यनारायण क्षितिजावरून जेमतेम हांतभर वर येऊन पुन्हा खाली उतरतो. यामुळे कडक ऊन असे फारसे पडतच नाही. सगळे पाणी गोठून गेल्यामुळे झाडांची मुळे पाणी शोषून घेऊन त्याला फांद्यांपर्यंत पोचवू शकत नाहीत. त्यामुळे [[फोटोसिन्थेसिस]] ही क्रिया मंदावते. आपल्याकडली बारमाही हिरवी झाडे अशा वातावरणात तग धरू शकणार नाहीत. पण या थंड हवामानात वाढलेल्या वृक्षांच्या जातींनी या संकटावरचा मार्ग शोधून काढला आहे.
 
या वृक्षांना वसंत ऋतूमध्ये पानाफुलांचा बहर येतो. इथल्या उन्हाळ्यातले मोठे दिवस, त्यात भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे त्यांचा सदुपयोग करून ही झाडे
झपाट्याने वाढतात, तसेच अन्न तयार करण्याचा कारखाना जोरात चालवून त्याचा भरपूर साठा जमवून ठेवतात. कडक थंडीत आणि अंधारात फोटोसिन्थेसिस होत नसल्यामुळे पानांचा
फारसा उपयोग नसतो, त्याशिवाय त्यांचे क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे त्यातून जास्त बाष्पीभवन होते, त्यावर जास्त बर्फ सांचून त्याचा भार वृक्षाला सोसावा लागतो असे तोटेच असतात. हे
टाळण्यासाठी हे वृक्ष आधीपासूनच तयारीला लागतात.