"सिद्धारुढ स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २५:
त्यांनी [[अद्वैत]] तत्वाचा प्रसार केला आणी स्वस्वरुप प्राप्त करण्याकडे भक्तांनी लक्ष पुरवावे म्हणून अतोनात कष्ट{{व्यक्तिगतमत?}} घेतले; भारतातील सर्व जातिधर्माचे आणी पंथाचे लोक त्यांचे परम भक्त{{व्यक्तिगतमत?}} आहेत.
 
त्यांनी भक्तांच्या भौतिक गरजा तसेच आध्यात्मिक उन्नतीकरिता अनेक अगाध आणि अगम्य असे चमत्कार केले. <s>पुष्कळ लोकांच्या म्हणण्यानुसार</s>{{व्यक्तिगतमत?}} ते १६व्या शतकात होऊन गेलेल्या निजगुण शिवयोगी ह्या प्रख्यात संत-तत्वज्ञाचा अवतार होत.{{संदर्भ हवा}} ते अद्वैत-चक्रवर्ती अशी त्यांची कीर्ती {{व्यक्तिगतमत?}}होती. <s>लाखो </s>{{व्यक्तिगतमत?}} लोकांना त्यांच्या धार्मिक चर्चा तसेच प्रवचनाचा फायदा झाला. ते मूर्तिमंत वैराग्य होते तसेच सर्वश्रेष्ठ परमहंस संन्यासी होते{{व्यक्तिगतमत?}}. [[शिवरात्र|शिवरात्रीच्या]] निमित्ताने एक फार मोठा रथोत्सव सिध्दाश्रमात साजरा होत असे{{अपूर्ण माहिती}}. त्यावेळी भक्तमंडळी स्वामींना वस्त्रालंकार तसेच सोन्याचा मुकुट घालून रथात बसवून तो रथ दोरखंडांनी ओढीत असत. शिवरात्रीपूर्वी सात दिवस उत्सवाला सुरुवात होत असे आणी रथोत्सवानंतर उत्सवाची सांगता होत असे. ह्या उत्सवानिमित्त हजारो भक्तजन आणि गोरगरीबांना पोटभ‍र जेवण मिळत असे. हे जेवण उघड्या अशा स्वयंपाकघरांमध्ये शिजवित असत ज्याला कन्नडमध्ये दसोह असे म्हणतात. निजगुण योगी ह्यांनी लिहिलेल्या पाच आध्यात्मिक ग्रंथांचे त्यांनी जनकल्याणाकरिता पुन्हा प्रकाशन करविले. कर्नाटकातील त्यांच्या समकालीन संतांमध्ये श्री मडीवाळप्पा, हुबळी जवळील शिशुविनहाळ ह्या गावीचे श्री शिवयोगी शरीफ साहेब, नवलगुंदचे नागलिंगस्वामी, आणि गदगचे श्री शिवानंदस्वामी हे होत तर महाराष्ट्रातील शेगावचे श्री गजानन महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, गोंदवल्याचे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर, श्री वासुदेवानंद सरस्वती, कोल्हापुरचे श्रीकृष्ण सरस्वती (कुंभारस्वामी), पळुसचे धोंडीबुवा, बग्गीचे श्री मणीरामबाबा, माधानचे श्री गुलाबराव महाराज हे होत्.
 
==संदर्भ==