"सिद्धारुढ स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
पहिल्याप्रथम ते [[श्रीशैल]] येथे गेले; तेथे त्यांना कळले की अध्यात्मिक क्षेत्रातील एक थोर अधिकारी असे सत्पुरुष श्री [[गजदंडस्वामी]] हे [[गुडीगंटे]] ह्या गावी राहतात. बाळसिध्द गुडीगंटे येथे गेला आणि श्रीगजदंडस्वामींना भेटला; त्यांनी सिध्दाची परीक्षा घेतल्यानंतर त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारला. सदगुरुंच्या आश्रमामध्ये सदगुरुंचीच नव्हे तर त्यांच्या शिष्यांची देखिल कामे ते शांततेने, प्रामाणिकपणाने आणि मन लावून करू लागले. सदगुरुंच्या आश्रमाची झाडलोट, त्यांचे व शिष्यांचे तळ्यावर जाऊन कपडे धुणे, स्वयंपाक करणे, घोड्यांचा तबेला स्व्च्छ ठेवणे, भांडी घासणे इत्यादि सर्व कामे ते मोठ्या प्रेमाने करित;
==अभ्यास==
ह्याच्याव्यतिरिक्त त्यांचा अध्यात्मिक अभ्यास देखिल अविरत चालला होता. सर्व शास्त्रांचा परिपूर्ण अभ्यास त्यांनी केला. त्यांच्या तपस्चर्येचे फळ म्हणूनच की काय अखेर गजदंडस्वामींनी त्यांना 'सिध्दारुढ' (म्हणजे [[सात्विक]], [[राजस|राजसी]], [[तामस|तामसी]] हे त्रिगुण आणि [[काम]], [[क्रोध]], [[लोभ]], [[मोह]], [[मद]], [[मत्सर]] हे षड्रिपू ह्यांच्यावर आरुढ झालेला अर्थात त्यांच्यावर विजय मिळविलेला) हे नाव बहाल केले आणि सर्व भारतभर [[तीर्थयात्रा]] करुन लोकोध्दार करण्याचा आदेश दिला. गजदंडस्वामींचा आश्रम सोडण्यापूर्वी त्यांनी गळ्यातील इष्टलिंग (प्रत्येक वीरशैव अथवा लिंगायत व्यक्ति गळ्यात एका चांदीच्या छोट्या पेटीमध्ये एक शिवलिंग ठेऊन, सकाळी उठल्यावर प्रथम त्याची पूजा करुन नंतरच पाणी घेतात) काढून तेथेच ठेविले आणि ते यात्रेला निघाले. या यात्रेमध्ये ते अखंड भारत हिंडले; काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत ते पैदल चालत प्रत्येक तीर्थक्षेत्राला भेट देत आणि वाटेतील भक्तांच्या, मुमुक्षूंच्या वेदांतशास्त्रातील तसेच साधनेतील अडीअडचणी दूर करुन त्यांना मोक्षमार्गी लावीत. आत्मज्ञानप्राप्ति हेच मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय असून त्याने ते प्राप्त करण्याकरिता अखंड परिश्रम करावेत असे ते सांगत. सर्व तीर्थयात्रा संपवून शेवटी ते कर्नाटकातील हुबळी ह्या शहरी येऊन शहराबाहेरील मोकळ्या जागी येऊन स्थिरावले आणि निर्वाणापर्यंत तेथे राहूनच त्यांनी जगदोध्दार केला. गळ्यात इष्टलिंग घालत नसल्याने तसेच जातिपंथभेदाचा विचार न करता सर्वांना "ऊँ नमः शिवाय," ह्या परमपवित्र पंचाक्षरी मंत्राचा उपदेश देऊन पावन करित असल्याचे पाहून् रुढिवादी लोकांनी त्यांचा अनन्वित छळ केला, परंतु स्वामी हे अवतारी पुरुष असल्याकारणाने त्यांनी सर्व छळ आणि अपमान सोसून भक्त तसेच अभक्त ह्यांचा एकसारखाच उध्दार केला. त्यांनी अद्वैत तत्वाचा प्रसार केला आणी स्वस्वरुप प्राप्त करण्याकडे भक्तांनी लक्ष पुरवावे म्हणून अतोनात कष्ट घेतले; भारतातील सर्व जातिधर्माचे आणी पंथाचे लोक त्यांचे परम भक्त आहेत. त्यांनी भक्तांच्या भौतिक गरजा तसेच आध्यात्मिक उन्नतीकरिता अनेक अगाध आणि अगम्य असे चमत्कार केले. पुष्कळ लोकांच्या म्हणण्यानुसार ते १६व्या शतकात होऊन गेलेल्या निजगुण शिवयोगी ह्या प्रख्यात संत-तत्वज्ञाचा अवतार होत. ते अद्वैत-चक्रवर्ती अशी त्यांची कीर्ती होती. लाखो लोकांना त्यांच्या धार्मिक चर्चा तसेच प्रवचनाचा फायदा झाला. ते मूर्तिमंत वैराग्य होते तसेच सर्वश्रेष्ठ परमहंस संन्यासी होते. शिवरात्रीच्या निमित्ताने एक फार मोठा रथोत्सव सिध्दाश्रमात साजरा होत असे. त्यावेळी भक्तमंडळी स्वामींना वस्त्रालंकार तसेच सोन्याचा मुकुट घालून त्यांना
 
==संदर्भ==