"सिद्धारुढ स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १:
==श्री सिध्दारुढ स्वामी==
हे एक ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मज्ञानी असे महान संत होऊन गेले. कर्नाटकातील [[हुबळी]] ह्या शहरी त्यांचा मोठा आश्रम (सिध्दाश्रम) तसेच त्यांची समाधि आहे.
गुरुशांतप्पा (वडिल) आणि देवमल्लम्मा (आई)(काही लोक फक्त मल्लम्मा असे सुध्दा म्हणतात)ह्या अत्यंत पापभीरु, देवभक्त आणि धार्मिक आचरण करणार्‍या दंपतीच्या पोटी त्यांचा जन्म इ.स. १८३६ साली चळकापूर ([[बीदर जिल्हा]]) ह्या गावी कर्नाटकात झाला (श्री सिध्दारुढ स्वामींचे एक प्रख्यात शिष्य श्री शिवराम चंद्रगिरी ह्यांनी लिहिलेल्या "श्री सिध्दारुढ कथामृत" मध्ये स्वामी निजामाच्या राज्यातील वंशदुर्ग ह्या ठिकाणी शके १७५८ दुर्मुखनाम संवत्सर मध्ये जन्मले होते). काही लोक त्यांचे जन्मस्थान बिदरकोटी आहे असेसुध्दा सांगतात. अगदी लहानपणापासून त्यांनी अध्यात्मिक शास्त्रामध्ये रुची दाखवायला सुरुवात केली तसेच बालपणीच गुरुदीक्षा घेण्यापूर्वीच अनेक चमत्कार केले. एकदा अगदी लहान असताना त्यांनी म्हैस न हलल्याने तिला शाप दिला त्यासरशी ती मरुन पडली; परंतु त्यांच्या आईच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्या म्हशीला पुन्हा जिवंत केले. त्यांच्या कुटुंबाचे कुलगुरु श्री वीरभद्रस्वामी हे दररोज त्यांच्या घरी येऊन त्या दंपतिकरिता प्रवचन आणि धार्मिक चर्चा करित, त्यावेळी ते त्यांना अनेक प्रश्न विचारीत. एकदा वीरभद्रस्वामींनी त्यांना प्रवचनात सांगितले की प्रलय झाल्यावर संपूर्ण पृथ्वी, पंचमहाभूते, स्वर्ग तसेच अन्य लोक (जेथे देवता राहतात) सुध्दा पाण्यात बुडुन जातील आणि नष्ट होतील; प्रत्येक मनुष्यप्राणी नष्ट होईल. कुलगुरुंचे शब्द ऐकून बालसिध्द म्हणाला, "आकाश कसे नष्ट होईल?" आश्चर्याने थक्क झालेल्या वीरभद्रस्वामींनी त्याला सांगितले की ह्या प्रश्नाचे उत्तर केवळ सदगुरुच देऊ शकतील. हे ऐकून बाळसिध्दाने सदगुरुचा शोध घेण्याकरिता अल्पवयातच घर सोडले. पहिल्याप्रथम ते श्रीशैल येथे गेले; तेथे त्यांना कळले की अध्यात्मिक क्षेत्रातील एक थोर अधिकारी असे सत्पुरुष श्री गजदंडस्वामी हे गुडीगंटे ह्या गावी राहतात. बाळसिध्द गुडीगंटे येथे गेला आणि श्रीगजदंडस्वामींना भेटला; त्यांनी सिध्दाची परीक्षा घेतल्यानंतर त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारला. सदगुरुंच्या आश्रमामध्ये सदगुरुंचीच नव्हे तर त्यांच्या शिष्यांची देखिल कामे ते शांततेने, प्रामाणिकपणाने आणि मन लावून करू लागले. सदगुरुंच्या आश्रमाची झाडलोट, त्यांचे व शिष्यांचे तळ्यावर जाऊन कपडे धुणे, स्वयंपाक करणे, घोड्यांचा तबेला स्व्च्छ ठेवणे, भांडी घासणे इत्यादि सर्व कामे ते मोठ्या प्रेमाने करित; ह्याच्याव्यतिरिक्त त्यांचा अध्यात्मिक अभ्यास देखिल अविरत चालला होता. सर्व शास्त्रांचा परिपूर्ण अभ्यास त्यांनी केला. त्यांच्या तपस्चर्येचे फळ म्हणूनच की काय अखेर गजदंडस्वामींनी त्यांना 'सिध्दारुढ' (म्हणजे सात्विक, राजसी, तामसी हे त्रिगुण आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू ह्यांच्यावर आरुढ झालेला अर्थात त्यांच्यावर विजय मिळविलेला) हे नाव बहाल केले आणि स्रर्व् भारतभर तीर्थयात्रा करुन लोकोध्दार करण्याचा आदेश दिला.
पहिल्याप्रथम ते श्रीशैल येथे गेले; तेथे त्यांना कळले की अध्यात्मिक क्षेत्रातील एक थोर अधिकारी असे सत्पुरुष श्री गजदंडस्वामी हे गुडीगंटे ह्या गावी राहतात. बाळसिध्द गुडीगंटे येथे गेला आणि श्रीगजदंडस्वामींना भेटला; त्यांनी सिध्दाची परीक्षा घेतल्यानंतर त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारला. सदगुरुंच्या आश्रमामध्ये सदगुरुंचीच नव्हे तर त्यांच्या शिष्यांची देखिल कामे ते शांततेने, प्रामाणिकपणाने आणि मन लावून करू लागले. सदगुरुंच्या आश्रमाची झाडलोट, त्यांचे व शिष्यांचे तळ्यावर जाऊन कपडे धुणे, स्वयंपाक करणे, घोड्यांचा तबेला स्व्च्छ ठेवणे, भांडी घासणे इत्यादि सर्व कामे ते मोठ्या प्रेमाने करित; ह्याच्याव्यतिरिक्त त्यांचा अध्यात्मिक अभ्यास देखिल अविरत चालला होता. सर्व शास्त्रांचा परिपूर्ण अभ्यास त्यांनी केला. त्यांच्या तपस्चर्येचे फळ म्हणूनच की काय अखेर गजदंडस्वामींनी त्यांना 'सिध्दारुढ' (म्हणजे सात्विक, राजसी, तामसी हे त्रिगुण आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू ह्यांच्यावर आरुढ झालेला अर्थात त्यांच्यावर विजय मिळविलेला) हे नाव बहाल केले आणि स्रर्व् भारतभर तीर्थयात्रा करुन लोकोध्दार करण्याचा आदेश दिला.