"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २६:
हरी पाटील, बंकटलाल आगरवाल, पितांबर, बाळाभाऊ प्रभू, बापुना काळे, भाऊसाहेब कवर, पुंडलिक भोकरे, बायजाबाई, भास्कर पाटील हे महाराजांचे काही श्रेष्ठ भक्त होते. तेथून ते वेगाने निघून् गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागल्याने महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले.
* '''श्रीधर गोविंद काळे''' - श्रीधर गोविंद काळेला हे इंग्लिश शाळेत शिक्षण घ्यायला गेले पण मॅट्रिक नंतर इंटर नापास झाल्याने वर्तमानपत्रे वाचीत वेळ घालवित असताना त्यांनी टोगो आणि यामा ह्या जपानी व्यक्तिंच्या जीवनचरित्राविषयी वाचले आणि आपणही मायदेश सोडून विलायतेला जाऊन नाव आणि पैसा कमवावा असे त्यांना वाटू लागले. परंतु पैशाची व्यवस्था होईना त्यामुळे ते निराश झाले आणि कोल्हापूरला जाताना वाटेवर शेगावला थांबून ते महाराजांना भेटायला गेले असताना सर्वज्ञ असलेल्या महाराजांनी त्यांचे मनोगत जाणले आणि परदेशी जाण्यापासून त्यांना परावृत्त केले. त्यानंतर महाराजांच्या कृपेने त्याची उत्तम भौतिक प्रगति झाली. त्याचवेळी महाराजांनी त्यांना बहूमोल उपदेश दिला की अतिशय पुण्य केल्याखेरीज भारतात जन्म होत नाही आणि योगापेक्षा अध्यात्मविचार श्रेष्ठ आहे. सरतेशेवटी महाराज त्याला म्हणाले, "कोठे न आता जाईयेई|."
* '''त्र्यंबक उर्फ भाऊ कवर''' - त्र्यंबकला घरी भाऊ असे प्रेमाने म्हणत असत, परंतु ही गोष्ट फक्त जवळच्या माणसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही माहिती नव्ह्ती. जेव्हा महाराजांची कीर्ति सर्वदूर पसरली, कवरला त्यांना भेटण्याची तीव्र तळमळ लागली. त्याप्रमाणे त्याने तीनवेळा शेगावला भेटी दिल्या परंतु तिन्ही भेटींमध्ये सदगुरुमहाराजांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले; कवर मनोमनी दु:खी झाला. अखेरची एक भेट घ्यावी म्हणून कवर शेगावला गेला आणि भक्तांच्य गर्दीत जाऊन बसला. थोड्या वेळात महाराज सरळ त्याच्याकडेच आले आणि म्हणाले, "काय भाऊ, एकटाच चिकण सुपारी खातोस होय? तुझ्या खिशातली सुपारी दे बरं मला थोडी!" कवराला आश्चर्याचा धक्कच बसला. ह्यांना माझे नाव कसे कळले, ह्यांना कसे कळले की माझ्या खिशात चिकण सुपारी आहे? ह्या घटनेतूनच भाऊ कवराला महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली. त्याक्षणापासून् भाऊ कवर त्यांच्या श्रेष्ठ भक्तांपैकी एक झाला. [[अकोला|अकोल्याचा]] त्र्यंबक उर्फ भाऊ कवर हा महाराजांचा परम भक्त होता; तो त्यावेळी [[हैदराबाद|हैदराबादमध्ये]] डॉक्टरी शिकत होता. सुटीमध्ये घरी आला असता त्याला वाटले की महाराजांचे आवडीचे पदार्थ करुन घेऊन त्यांना जेवण नेऊन द्यावे. त्याप्रमाणे त्याने भाकरी, आंबाड्याची भाजी, हिरव्या मिरच्या, कांदे, लोणी असे पदार्थ बरोबर घेतले; पण तो स्टेशनवर येण्याअगोदर गाडी निघून गेली. कवराला अतोनात दु:ख झाले, गुरुमहाराज जेऊन घेतील आणि आपण आणलेली शिदोरी वाया जाईल या विचाराने तो व्यथित होऊन स्टेशनवर तसाच बसून राहिला. परंतु भक्तवत्सल महाराज त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य बाजूला सारून तसेच उपाशी बसले होते. शेवटी जेव्हा कवर चार वाजता शेगावच्या मठात आला, तेव्हा महाराज म्हणाले, "तुझ्या भाकेत गुंतलो | मी उपाशी राहिलो | आण तुझी शिदोरी||." त्यावेळी कवराला काय वाटले असेल ह्याची कल्पना एक् भक्तच करु शकेल. इतर भक्त म्हणाले, "भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे." '''बापुना काळे''' - बापुना काळे हे पाटीलांच्याकडे हिशेबनीस म्हणून काम बघत होत कारण ते आकडेमोड आणि तोंडी हिशोबात तरबेज होते. त्यांनी उपनिषदांचा अभ्यासही केलेला होता. जेव्हा महाराज बापुना काळे आणि अन्य भक्तांसोबत आषाढी एकादशीला [[पंढरपूर|पंढ‍रीला]] गेले तेव्हा स्नानाला गेलेल्या बापुनाला दर्शनाला जायला उशिर झाल्याकारणाने सबंध दिवसभर दर्शन मिळू शकले नाही. बापुनाचे विठ्ठलाकडे लागलेले मन, इतर भक्तांनी त्याची केलेली चेष्टा हे सर्व पहात असलेल्या महाराजांनी त्याला विठ्ठलाचे दर्शन करविले. बापुना खरोखर धन्य झाला. दासगणू म्हणतात, "संत आणि भगवंत | एकरुप साक्षात | गुळाच्या त्या गोडीप्रत | कैसे करावे निराळे?||." ह्या विठ्ठलदर्शनावे फळ म्हणूनच की काय बापुनाला एक मुलगा झाला, ज्याचे त्याने नामदेव असे नामकरण केले. पुढे हा मुलगा प्रख्यात किर्तनकार बनला. बापुना दररोज न चुकता एक शेर धान्य दान करित. अशा ह्या महाराजांच्या थोर भक्ताने १९६४ला देह सोडला. <ref name=dasganu/> मरणाच्या दारात असलेल्या कवठे बहादुरच्या वारकर्‍याला मरीच्या रोगापासून वाचविले. सोवळे ओवळे पाळणे, घडाघडा मंत्र म्हणून बराच वेळ देवपूजा करणे (एकंदरीत सांप्रदायिक कर्मकांडे करणे) म्हणजेच देवभक्ति करणे असे समजणार्‍या एका कर्मठ ब्राह्मणाचा, एक प्रहरापूर्वी मेलेल्या कुत्र्याला केवळ स्वतःच्या पदस्पर्शाने त्याच्या समोर जीवंत करुन, त्याचा कर्माभिमान गलीत केला. दासगणू म्हणतात, "समर्थ साक्षात भगवंत | ऐसी प्रचिती आली तया ||."<ref name=dasganu />
 
* '''श्रीमंत गोपाळराव बुटी''' - श्रीमंत गोपाळराव बुटी हे [[नागपुर|नागपुरचा]] कुबेर म्हणवून घेण्याइतपत धनवंत होते; तेही महाराजांचे भक्त होते. नागपुरच्या सिताबर्डी ह्या भागात त्यांचा ५२ खोल्यांचा आलिशान आणि भव्य असा वाडा होता. त्यांच्या श्रीमंतीविषयीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. ते सावकारी करीत त्यामुळे दरमहिन्याला त्यांना व्याज अथवा मुद्दलरुपात मिळणार्‍या धनाने भरलेल्या गोण्या लादलेल्या बैलगाड्यांची रांग त्यांच्या घरापासून् कित्येक किलोमीटर दूरपर्यंत असे. अर्थात त्यांनी त्यांच्या पैशाचा संतसेवेकरिता योग्य असा विनियोग केला हेही तितकेच खरे आहे. त्यांच्या आग्रहामुळे महाराज १९०८ला नागपुरच्या सीताबर्डी भागात त्याच्या आलीशान वाड्यात त्याच्या भावनांचा मान राखण्याकरिता गेले. महाराज त्याच्या वैभवाला भुलून मुळीच गेले नव्हते, ते तर अनेक भक्तांचा उध्दार करण्याकरिता तेथे गेले होते. महाराजांना तो महालात कोंडून ठेऊ शकला नाही; महाराज नागपुरात सर्वत्र हिंडून लोकोध्दार करित. शेवटी मनगटाच्या बळावर{{संदर्भ हवा}} हरी पाटलांनी त्यांना परत शेगावी आणले.