"शब्द व्युत्पत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎संदर्भ: added category marathi vyakaran and category apurn lekha
Mahitgar (चर्चा | योगदान)
sandhani
ओळ १:
व्युत्पत्ति
* या लेखात मुळ लेखकाचे शुध्दलेखनात बदल टाळले आहेत त्यामुळे सध्याच्या प्रचलित नियमांनुसार नाहीत.
 
'''शब्द-घटना'''
==="तत्सम" शब्द ===
मराठीमध्यें विशेषेंकरून [[संस्कॄत भाषा|संस्कॄत ]],देशी,[[अरबी भाषा|अरबी]],भाषा फारशी,ह्या भाषांचे शब्द आढळतात; आणि [[हिंदी भाषा|हिंदी]],[[गुजराथी भाषा|गुजराथी ]],[[तेलगू भाषा|तेलगू]],[[कानडी भाषा|कानडी ]][[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]ह्या भाषांचे शब्दहि बरेच आलेले आहेत.[[मराठी भाषा|मराठी]] संस्कृतोत्पन्न असल्यामुळें व संस्कृतांत नवीन शब्द बनविण्याला [[उपसर्ग]],[[प्रत्यय]],[[धातु]][[समास]] यांमुळे फारच मदत होत असल्यामुळें,त्यांयोगें संस्कृत शब्द बनतात.अशा प्रकारें बनलेले पुष्कळच संस्कृत शब्द मराठींत जसेच्या कांही फरक ने होता टिकून राहिले आहेत; आणि तसे ठेवण्याची मराठीची प्रवृत्तिहि अजून जोंरात आहे.अशा संस्कृत शब्दांना "तत्सम" शब्द असे म्हणतात.
उदा>-देव,माता,पिता,कवि,गुरु,शत्रु,मित्र,इ.
==="तद्भव" शब्द ===
जे शब्द संस्कृत श्ब्दांच्या मूळ रूपांत फरक होऊन मराठींत आलेले आहेत,त्यांस "तद्भव" शब्द असे म्हणतात उदा.- घर(गृह),हात(हस्त),पाय(पाद),कान(कर्ण),पान(पर्ण),कांटा(कंटक),इ.
==="देशी" शब्द===
मराठींत असे काही शब्द आहेत कीं,ते तत्सम,तद्भव,यवनी वगैरे नसून कोठून उअत्पन्न झाले असावे,हें कांहीच सांगतां येत नाहीं.ते मूळचेच येथल्या पूर्वीच्या महाराष्ट्रांत वसती करून राहिलेलेया लोकांचे असावे आणि ते आपल्या मराठींत दृढमूल झाले असावे, असें दिसतें; अशा शब्दांना "देशी" शब्द असें म्हणतात.उदा.- झाड,धकटा,लेकरूं इ.
[टीप- मराठी,गुजराथी,हिंदी,बंगाली,इ. देशांत सध्यां चालू असलेल्या भाषांनाही देशीभाषा किंवा देशभाषा असें म्हणतात; पण त्या अर्थाने येतेहे देशी हा शब्द वापरला नसून महाराष्ट्रांत मूळ राहणाऱ्या लोकांचे जे शब्द मराठींत जसेच्या तसे शिल्लक उरले आहेत,ते 'देशी' शब्द, ह्या अर्थानेंच '''हेमचंद्र''' वगैरे पूर्वव्याकरणकार तो शब्द वापरितात,तसा येथें वापरिला आहे.]
==शब्दांची साधनिका==
जे शब्द मराठींत-ते तत्सम असोत,तद्भव असोत,देशी असोत ,- त्या शब्दांची साधनिका काय,त्यांचे पूर्वस्वरूप व सध्यांचें ह्यात फरक कोणत्या प्रकारें व कोणत्या कारणानें झाला,त्यांचें कांही अर्थांतर झालें कीं काय, तें कां झालें,इ. गोष्टींविशयीं आपल्या भाषेसंबधीं स्थूल अभ्यास करणारांसहि थोडी-फार माहिती असणें अवश्य आहे.तिच्या योगानें चिकित्सक बुद्धि वाढते; यापूर्वीचे समाज,त्यांच्या चालीरिति इत्यादिकांवर प्रकाश पडतो; मानवी संस्कृतीचें पाऊल कसकसें पुढें पडत गेंलें, त्याची कल्पना येते;आणि एकंदरींत ह्या गोष्टी पाहात असतां कांहिं चमत्कारिक माहिती मिळून मनाला आंनंदहि होतो.
 
येथे प्रथम संस्कृतसाधित शब्द, नंतर मराठी सादित शब्द आणि शेवटीं यवनी म्हणजे अरबी ब फारशी भाषांतील व हिंदी, गुजराथी, कानडी व मराठीच्याअ सहचर भाषांतील मराठींत आलेले शब्द,यांचा क्रमानें विचार करूं.
मराठींत येणारे बरेचसे संस्कृत शब्द जसेच्या तसे येतात, ते शब्द मूळ संस्कृअत धातूंना केव्हां मागें '''उपसर्ग''' व केव्हां पुढें प्रत्यय लावून बनतात व केव्हां दोन्ही लागून बनतात.
 
जीं अव्ययरूप अक्षरें धातूच्या मागें लागून, बरेच वेंळा त्या धातूचा अर्थ फिरवतात, त्यांस '''उपसर्ग''' असें म्हणतात.उदा.-'ह' धातूचा मूळ अर्थ हरण करणें;परंतु आ-हार=खाणें,वि-हार=खेळणें,सं-हार=ठार मारणें,प्र-हार=तडाखा देणें,याप्रमाणें मागे लागलेल्या अक्षरांमुळें त्या धातूच्या अर्थंत बदल झाला आहे.असेंच इअतर धातूंविषयीं समजावें.उपसर्ग हे स्वतंत्रपणें केव्हांच येंऊ शकत नाहींत.कोणत्या उपसर्गामुळें कोणते अर्थ उत्पन्न होतात , ह्याच्या समजुतीसाठीं ते उपसर्ग व त्यांनी युक्त असे शब्द देतों.
===संस्कृत उपसर्ग===