"श्री गोविन्दाष्टकम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १५:
 
'''गोपालं भूलीलाविग्रहगोपालं कुलगोपालं गोपीखेलनगोवर्धनधृतिलीलालालितगोपालम् ।'''
'''गोभिर्निगदितगोविन्दस्फुटनामानं बहुनामानं गोधीगोचरदूरं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥४॥'''
 
जो गायींचा पालक आहे, ज्याने पृथ्वीवर क्रीडा करण्यासाठी गोपाल-शरीर धारण केले, ज्याने गोपाल वंशात जन्म घेतला, गोपीं बरोबर खेळणें, गोवर्धनपर्वत करंगुळीवर धारण करणे इ. लीलांनी ज्याने गोप-जनांचे लालन पालन केले, वेदांनी किंवा गायींनी देखील 'गोविंद गोविंद म्हणून ज्याच्या नामाचा स्पष्ट उच्चार केला, ज्याची अनेक नामे आहेत, जो वाणी आणि बुद्धी ह्यांच्या विषयांपासून दूर आहे अशा त्या परमानंदरूप गोविंदाला नमस्कार करा. ॥४॥
 
'''गोपीमण्डलगोष्ठीभेदं भेदावस्थमभेदाभं शश्र्वद्गोखुरनिर्धूतोद्धतधूलीधूसरसौभाग्यम् ।'''
'''श्रद्धाभक्तीगृहीतानन्दमचिन्त्यं चिन्तितसदभावं चिन्तामणिमहिमानं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥४॥॥५॥'''
 
जो गोपीसमुदायातील गोष्टींमध्ये विराजमान होणारा आहे, जो तत्त्वतः अभिन्न (एकरूप) असूनही भिन्न भिन्न अवस्था धारण करणारा आहे, वरचेवर गायींच्या खुरामुळे उडणाऱ्या धुळीने धुळकट होण्यात जो स्वतःला भाग्यवान समजतो, श्रद्धा आणि भक्तीने ज्याचा आनंद प्राप्त करता येतो, चिन्तन करण्यास अशक्य असूनही ज्याच्या सत्स्वरूपाचे चिन्तन केले जाते, ज्याचा महिमा चिन्तामणी प्रमाणे आहे (जो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो) त्या परमानंदस्वरूप गोविंदाला प्रणाम करा. ॥५॥