"ताडोबा राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''ताडोबा राष्ट्रीय उद्यान''' हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. याचे मुख्य वैशिट्य आहे येथील आढळणार्‍या मगरी-सुसरी आणि गवा.
अलिकडेच याचे नामकरण ताडोबा आंधारी व्याघ्रप्रकल्प झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी. इतके आहे आणि इथले जंगल ५०९ चौ.कि.मी. एवढे आहे . याचे जंगल हे विषववृतीय पानगळी प्रकाराचे आहे.

आजमितीस अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे. गवे आणि मगरी-सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेच त्याचबरोबर वाघ्र्यप्रकल्पामुळे वाघांचे आकर्षणही वाढले आहे. आजच्या घडीला उद्यानात ५० वाघ आहेत. त्याबरोबर [[बिबट्या]] , [[अस्वल]] , जंगली कुत्री अथवा [[कोळसून]] , [[तरस]] , [[उदमांजर]] विविध प्रकारच्या [[रानमांजर | रानमांजरी]]. हरणांच्या जातीत, [[नीलगाय]] , [[सांबर]] , [[चितळ]] , [[भेकर]], कोल्हे, चौशिंगा, ससे व खास विदर्भात आढळणारी [[पिसुरी]] नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येते

इथे जवळजवळ १८१ जातींचे पक्षी पाता येतात. मच्छिमार, [[गरुड]], [[करकोचा|करकोचे]], [[बगळा|बगळे]], [[ससाणा|ससाणे]], रानकोंबड्या, धनेश, भृंगराज, रॉबिन गोल्डन ओरिओल, भारद्वाज, [[मोर]] हे त्यापैकी काही.

ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. साग, बांबू, ऍन, हलई, धावडा, बिबळा, तेंदू, मोहा, खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते
<ref>आपली सृष्टी आपले धन भाग- ४ निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे
[[माझी मुलूखनिरी]], मिलिंद गुणाजी</ref>.