"विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{सूचना|या पानावरचे संकेत विकिपीडिया सदस्यांनी चर्चा करून सहमतीने ठरवले आहेत. या पानात बदल करायचे असतील तर कृपया आधी [[{{TALKPAGENAME}}|चर्चा पानावर लिहा]].}}
 
लेखांची आणि पानांची नावे शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपी) असावीत.अगोदर सहमती न केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत.ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे आणि लेखन कसे करावे याची माहियती नाही त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य सहाय्य पाने इतर(इंग्रजी) भाषेत उपलब्ध ठेवली आहेत.इंग्रजी माध्यमातून शालेय शीक्षण घेतलेल्या मराठी लोकांनी त्यांच्या सहाय्यास्तव योग्य पाने तयार केली जातील परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.
 
आंतरविकि संपर्क करू इचीणार्^या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे.चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसार मुभा सर्वांनाच आहे तरीपण तेथे सुद्धा शक्यतो मराठीचा वापरकरणे अपेक्षीत आहे.
 
 
* सर्वसाधारण संकेत
**#मराठी शीर्षक/ [[देवनागरी|देवनागरी लेखनपद्धती]] वापरा: लेखांची शीर्षके शक्यतो '''मराठी देवनागरीमध्ये''' लिहा. उदा. Calcium असे रोमन लिपीत लिहिण्याऐवजी 'कॅल्शियम' असे देवनागरीत लिप्यंतर (transliteration) करून लिहावे. तसेच, लेखाचे नाव '''मराठी देवनागरी''' लिपीतील वर्णमाला वापरून लिहावे. 'हिंदी देवनागरी'प्रमाणे काही अक्षरांखाली नुक्ता देणे वगैरे पद्धती 'मराठी देवनागरीमध्ये' प्रचलित नसल्याने वापरू नयेत. उदा.: 'गुलज़ार' असे न लिहिता 'गुलजार' असे लिहावे. अपवाद: जागतिक मान्यता पावलेल्या/ जगभर व्यवहारात वापरल्या जाणार्‍या रोमन लिपीतील नावांबाबत हा संकेत पाळण्याची गरज नाही. उदा. "MPEG-4", "ADSL" "G.7xx" वगैरे ITU-T अथवा 3GPP अथवा ISO मानकांची (standards/ protocols etc. शब्द बरोबर आहे का??) नावे जगभरात तशीच प्रचलित असल्याने रोमनमध्ये लिहिण्यास हरकत नाही.
**#शीर्षक निःसंदिग्ध हवे: लेखांची शीर्षके शक्य तितकी [[निःसंदिग्ध]] लिहावीत. शीर्षकांमध्ये येणारी [[विशेषनाम|'विशेषनामे']] कोणत्या संदर्भात लिहिली आहेत हे शीर्षकावरून समजेल असे पाहावे. उदा. 'अरबी' असे शीर्षक बनवण्याऐवजी अरबी भाषेबद्दल लेख लिहायचा असल्यास 'अरबी भाषा' असे शीर्षक लिहावे; अरबी समुद्राबद्दल लेख लिहायचा असल्यास 'अरबी समुद्र' असे शीर्षक लिहावे. थोडक्यात, विशेषनामाबरोबरीने संदर्भसूचक शब्दांचा वापर करून शीर्षक अचूक अर्थबोध होईल असे लिहावे. (हा मुद्दा खरे तर सविस्तर लिहावा लागेल.. कारण संदर्भसूचक शब्दांचा क्रम, विशेषनामाआधी/नंतर लिहिणे, मध्ये स्वल्पविराम, कोलन(अपूर्णविराम? काय म्हणतात ";" याला?) टाकणे वगैरे बाबींचे संकेत लिहावे लागतील. उदा. "गोदावरी नदी", "स्पॅनिश भाषा", "अरबी समुद्र", "ययाति, पुस्तक", "बटाट्याची चाळ, पुस्तक" आणि "बटाट्याची चाळा, नाटक", "माणूस, चित्रपट" या संकेतांमागची मीमांसा तिथे लिहावी लागेल.)
**#संक्षिप्त रूपांऐवजी पूर्ण रूपाला प्राधान्य द्या: एखाद्या नावाच्या संक्षिप्त रूपापेक्षा पूर्ण रूपास शीर्षकलेखनात प्राधान्य द्या. अपवाद: संक्षिप्त रूप पूर्ण रूपापेक्षा जास्त प्रमाणात प्रचलित असल्यास/ व्यवहारात संक्षिप्त स्वरूपातच वापरले जात असल्यास संक्षिप्त रूपास प्राधान्य द्यावे. उदा. "भाजप" असे शीर्षक न लिहिता "भारतीय जनता पक्ष" असे शीर्षक लिहावे. परंतु "टीव्ही", "नाटो" इत्यादी नावांबाबत संक्षेपास प्राधान्य द्यावे.
**#रोमन नावाद्यांचे मराठी देवनागरी लिप्यंतर: [[रोमन लिपी|रोमन लिपीत]] एखाद्या नावाची नावाद्ये (initials) प्रचलित असतील व ती नाव मराठीत जशीच्या तशी व्यवहारात वापरली जात असतील तर रोमन लेखनपद्धतीनुसार देवनागरीतही त्यांचे लेखन करावे. उदा.: MSN या नावाचे लेखन "एम्‌.एस्‌.एन्‌." असे करण्याऐवजी "एम्‌एस्‌एन्‌" असे करावे; मात्र "H. G. Wells" याचे लेखन मधल्या पूर्णविरामचिन्हांसह "एच्‌. जी. वेल्स" असे करावे. (रोमन लिपीतून मराठी देवनागरीत लिप्यंतर कराताना पाळायचे संकेत हा विषय खरे तर स्वतंत्र लेखाकरिता पात्र आहे. इथे त्या लेखाचा दुवेजोड देऊन संक्षेपाने आशय लिहिणे अपेक्षित आहे.)
 
: ''संक्षिप्त रूपांऐवजी पूर्ण रूपाला प्राधान्य द्या''
 
: याला काहीही अपवाद ठेवण्याची गरज नाही. संक्षिप्त नावाचे पान संपूर्ण नावाच्या पानाकडे प्रतिनिर्देशित करावे. असे केल्याने शीर्षक निवडताना थोडा कमी विचार करावा लागेल.
 
==सहमती झालेलेले लेखन संकेत==
===व्यक्ति नांवांब्द्दलचे शीर्षक संकेत===