"अतुल कहाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''अतुल कहाते''' यांची नव्या पिढीचे लाडके लेखक म्हणून सगळ्यांनाच ओळख आहे. त्यांनी संगणकशास्त्र, आयटी, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास या विषयांवर लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, तरुण भारत, सामना इत्यादि वृत्तपत्रे तसेच नियतकालिकांमध्ये विपुल लेखन केले आहे. अतिशय ओघवती शैली आणि सखोल माहिती ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. त्यांनी अनेक ठिकाणी अनेक विषयांवर भाषणेही दिली आहेत. त्यांनी इंग्रजीमध्ये २० पुस्तके लिहिली असून ती जगभरात टेक्स्टबुक्स म्हणूनही वापरली जातात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १४ वर्षांचा दांडगा अनुभव आहे. तसेच सिंबायोसिस, इंदिरा, एमआयटी, फर्ग्युसन, गरवारे, इत्यादि अनेक महाविदयालयांमध्ये त्यांनी `गेस्ट लेक्चरर` म्हणून काम केले आहे. त्यांचे टीव्हीवर तंत्रज्ञान अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणारे कार्यक्रमही अतिशय लोकप्रिय झाले आहेत. ते मूळचे सोलापुरचे आहेत.
{{विकिकरण}}