"बुद्ध अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
 
[[en:Buddha]]
बुद्ध धर्माचा संस्थापक सिद्धार्थ गौतम ( संस्कृत; पाली: सिद्धाथ्थ गोतम ) हा भारतीय उपखंडाच्या उत्तर विभागातील अध्यात्मिक गुरू. बौद्धमतानुयायी याला वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात. त्याच्या जन्माचा व मृत्यूचा नेमका काळ निश्चितपणे सांगता येत नाही. विसाव्या शतकातल्या इतिहासकारांच्या मते, इसपू. 563 ते इसपू. 483 हा त्याचा जीवनकाळ. अलिकडील काळातील संशोधक विद्वानांनी ठामपणे व्यक्त केलेल्या मतानुसार, बुद्धाच्या मृत्यूचा सन इसपू. 400 च्या अल्याड किंवा पल्याड 20 वर्षे असा असावा, तथापि यावरही मतैक्य नाही.
शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) -हे गौतमाचेच दुसरे नांव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. त्याची जीवनकहाणी, त्याची प्रवचने, आणि त्याने घालून दिलेले मठवासाचे नियम पवित्र मानून अनुयायांनी त्याच्या मृत्यूनंतर संकलित केले आणि मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केले . गौतमाच्या मानल्या जाणाऱया विविध शिकवणुकीचा ठेवा पाठांतराद्वारे एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे सुपूर्द होत गेला. त्याच्या मृत्यूनंतर साधारण 400 वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेला. या लिखाणांत प्रस्तुत केलेले बुद्धचरित्र ऐतिहासिक सत्य म्हणून मानण्याचा पूर्वीच्या पाश्चिमात्य विद्वानांचा दृष्टिकोन आताच्या विद्वानांच्या फारसा पचनी पडत नाहीसे दिसते. नवे विद्वान या लिखाणांतून प्रतीत होणारे बुद्धाचे चरित्र व शिकवण सरसकटपणे इतिहास म्हणून मानण्यास तयार नाहीत.