"लगान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३८:
 
==कथानक==
चित्रपटातील नायक भुवन हा चंपानेर गावचा गावकरी असतो. चंपानेर हे मध्य भारतातील एक काल्पनिक खेडे चित्रित केले आहे. या प्रांतात कित्येक वर्षे पाउस न झाल्याने गावात दुष्काळ पडलेला असतो. त्यामुळे गावतील लोक चिंतेत असतात. गावाच्या बाहेर ब्रिटीशांची छावणी असते व कॅप्टन रसेल हा तिथला अधिकारी असतो. एकेदिवशी कॅप्टन रसेल शिकार करत असताना भुवन कॅप्टन रसेलचे सावज पळवून लावतो. तेव्हापासून रसेल व भुवनमध्ये एक विचित्र आढा निर्माण झालेला असतो. कॅप्टन रसेल हा अधिकारी दिवसेंदिवस अधिकाधिक मस्तवाल होत असतो. एके दिवशी चंपानेर चे महाराजांचाही तो जबरदस्ती मांस खाण्याची आदेश देउन त्यांचा अपमान करतो. संपूर्ण प्रांत राजापासून रंकापर्यंत कॅप्टन रसेलच्या मस्तवालपणाचा व दहशतीचा सामना करत असतात.
 
==उल्लेखनीय==
"https://mr.wikipedia.org/wiki/लगान" पासून हुडकले