"समुद्री प्रवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
 
पृष्ठभागांवरील प्रवाहातून महासागरांतील १०% पाणी वाहते. वरच्या ४०० मीटरपर्यंतचे प्रवाह पृष्ठभागावरील प्रवाह समजले जातात. या प्रवाहांना [[स्वेर्डप]] (sv) या एककानिशी मोजले जाते. एक स्वेर्डप म्हणजे १०६ घनमीटर प्रतिसेकंद प्रवाह आहे.
 
==प्रवाहांबद्दलची माहिती व परिणाम==
समुद्री प्रवाह हे अनंत काळापासून वाहत आलेले आहेत. या प्रवाहांतून त्याच दिशेने प्रवास करणार्‍या जहाजांना इंधन व वेळ कमी लागतात तर विरुद्ध दिशेने जाणार्‍या जहाजांना जास्त. म्हणून खलाशांनी समुद्री प्रवाहांचे ज्ञान पूर्वीपासून आत्मसात केलेले आहे. उलट दिशेने प्रवास करायचा झाल्यास खलाशी थोडेशी वाट बदलून एखादा प्रवाह पकडतात व वेळ वाचवतात. शिडाची गलबते असताना हे जास्त महत्वाचे होते. उदा. [[पोर्तुगाल|पोर्तुगीझ]] शोधकांना [[आफ्रिका|आफ्रिकेच्या]] किनार्‍यालगतच्या [[अगुल्हास प्रवाह|अगुल्हास प्रवाहामुळे]] आफ्रिकेला वळसा घालणे अवघड झाले व त्यामुळे त्यांचे भारतात आगमन होण्यास अनेक वर्षे जास्त लागली. हाच प्रवास आफ्रिकेचा किनारा सोडून किंचित पश्चिमेकडून केला असता अनेक आठवड्यांचे वेळ वाचतो. [[डीझेल]] किंवा [[अणुशक्ती]]वर चालणारी जहाजे व पाणबुड्याही या प्रवाहांचा उपयोग करतात.
 
समुद्री प्रवाहांमुळे पृथ्वीच्या विविध भागातील प्रजातींचे आवागमन होत राहते. [[समुद्री ईल]] व [[सामन]] माश्यांचे जीवन याचे उदाहरण आहेत.
 
समु्द्रातील अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी प्रवाहांची माहिती आवश्यक आहे. तसेच या अवशेषांवरुन प्रवाहांचाही अभ्यास होतो.
 
== महासागरांतील मुख्य प्रवाह ==