"स्पेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१६९ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
(संदर्भ, संदर्भयादी आणि तळटीप)
{{main|प्रागैतिहासिक स्पेन}}
 
सुमारे ३५,००० वर्षांपूर्वी आधुनिक मानवाने क्रो-मॅग्नन मानवाच्या रुपात इबेरियन द्वीपकल्पावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. आधुनिक मानवाच्या सुरूवातीच्या वसाहती पिरेनिस पर्वतांमध्ये होत्या. उत्तर स्पेनमध्ये कान्ताब्रिया संघातील आल्तामिरा गुहा अशा वसाहतींपैकी आहे. ही गुहा आपल्या भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या भित्तिचित्रांची निर्मिती सुमारे १५,००० वर्षांपूर्वी केली गेली असावी असा अंदाज आहे. आधुनिक मानवाच्या आगमनापूर्वी काही१२ लाख वर्षे या प्रदेशात निअँडरथल मानवाची वस्ती असल्याचे पुरावे आतापुएर्सा येथील उत्खननात मिळाले आहेत..<ref>{{cite news|url=http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/6256356.stm|title='First west Europe tooth' found|publisher=BBC|date=30 June 2007|accessdate=2008-08-09}}</ref>
 
''इबेरियन'' आणि ''केल्ट'' ह्या रोमनपूर्व काळात स्पेनमधील मुख्य जमाती होत्या. इबेरियन लोक दक्षिणेस भूमध्य समुद्राच्या किनारी प्रदेशात व केल्ट उत्तरेस अटलांटिक समुद्राच्या किनारी प्रदेशात रहात होते. द्वीपकल्पाच्या मध्यभागात या दोन्ही जमातींच्या मिश्र वस्त्या होत्या ज्या ''केल्टायबेरियन'' म्हणून ओळखल्या जातात. स्पेनमधल्या अनेक शहरांची नावे या जमातींच्या मूळ वसाहतींच्या नावांवरून अस्तित्वात आली आहेत. उदा.- एल्चे (मूळ लिसि), लेरिदा (मूळ लेर्दा). स्पेनमधल्या सर्वात लांब नदीला एब्रो हे नावदेखील इबेरियन लोकांमुळे पडले. ह्या दोन मुख्या जमाती वगळता इतर वंशिक समूहांच्या वस्त्या सध्याच्या आंसालुसिया संघातील मैदानी प्रदेशात होत्या.
१,५९०

संपादने